Shani Gochar 2025: ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटले जाते. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीला शुभ फळ तर वाईट कर्म करणाऱ्यांवर नकारात्मक प्रभाव पाडतो. शनी सध्या त्याच्या मूळ त्रिकोण राशी कुंभ राशीमध्ये उपस्थित असून, १५ नोव्हेंबरपर्यंत वक्री असणार आहे. तसेच तो २८ मार्च २०२५ पर्यंत याच राशीत असेल. त्यानंतर तो मीन राशीत प्रवेश करील. दरम्यान, तोपर्यंत हा १५३ दिवसांचा काळ काही राशींच्या व्यक्तींसाठी भाग्यकारी सिद्ध होईल. या काळात तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ राशीच्या व्यक्तींवर शनीची शुभदृष्टी

मिथुन

कुंभ राशीतील शनी मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी असेल. १५३ दिवसांचा काळ तुमच्यासाठी खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. कुटुंबीयांबरोबरचे संबंध चांगले होतील. धार्मिक स्थळांना भेट द्याल. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल. वैवाहिक जीवनही खूप आनंददायी असेल.

मेष

कुंभ राशीतील शनी मेष राशीच्या व्यक्तींसाठी पुढील १५३ दिवस शुभ परिणाम घडवून आणेल. या काळात तुमची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. समाजात पद-प्रतिष्ठा वाढेल. नेहमी सकारात्मक राहाल. स्पर्धा परीक्षेत उत्तम यश मिळेल. वैवाहिक जीवन सुखमय राहील तसेच जे अविवाहित आहेत, त्यांचे लग्न ठरेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. तुमची आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील.

सिंह

कुंभ राशीत विराजमान असलेला शनी सिंह राशीच्या व्यक्तींसाठी खूप भाग्यकारी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला आई-वडिलांची खूप साथ मिळेल. आर्थिक स्थैर्य लाभेल. तुमच्या आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. कर्ज फेडण्यास मदत होईल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीही हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच पदोन्नतीही मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनाही यशाचे गोड फळ लाभेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे.

हेही वाचा: नुसता पैसाच पैसा! २०२५ मध्ये गुरू करणार तीन वेळा राशीपरिवर्तन; ‘या’ ३ राशीच्या व्यक्तींना मिळणार धनसंपत्तीचे सुख

तूळ

शनीची कुंभ राशीतील उपस्थिती तूळ राशीच्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरेल. हा १५३ दिवसांचा काळ तूळ राशीधारकांसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात फक्त तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्या. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. या काळात तुमच्यात साहस निर्माण होईल. कामाच्या ठिकाणी कामाचे खूप कौतुक होईल. मान-सन्मान वाढेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani gochar 25 for the next 153 days lakshmi will give abundant life these four zodiac signs will earn a lot of money sap