Shani Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार शनि देव २८ मार्च २०२५ ला मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शनि देव या गोचरबरोबर चांदीच्या पायाने प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शनि देव प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतो.
शनि देवाची कृपा असेल तर गरीब सुद्धा राजा बनू शकतो. अशात शनि चांदीच्या पायाने मीन राशी मध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे कोणत्या राशींना चांगले दिवस येऊ शकतात, हे आज आपण जाणून घेणार आहोत. या लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रगती दिसून येईल. त्या राशी कोणत्या?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी चांगला काळ सुरू होत आहे. व्यवसायात आर्थिक लाभ मिळू शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना जुन्या गुंतवणूकीतून धनलाभ मिळू शकतो.
करिअरमध्ये उंची गाठू शकतात. याशिवाय या राशीच्या लोकांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. नवीन संधी मिळू शकतात. नात्यात घट्टपणा जाणवू शकतो. नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांना चांगली संधी मिळू शकते.

कन्या राशी

शनिने कन्या राशीमध्ये प्रवेश केल्याने कन्या राशीच्या लोकांना सुख समृद्धीच्या भरपूर संधी मिळू शकतात. कार्यक्षेत्रात मेहनतीचे फळ मिळेन. आर्थिक स्वरुपात मजबूती दिसून येईल.

बिझिनेस पार्टनरबरोबर व्यवसायात चांगला नफा मिळेल. घर कुटुंबात पहिल्यापेक्षा उत्तम स्थिती राहीन. कुटुंबात मंगलकार्य संपन्न होईल. कर्जापासून मुक्ती मिळेल. जमीनीशी संबंधिक कार्यांमध्ये धनलाभ मिळू शकतो.

मकर राशी

शनिच्या गोचरमुळे मकर राशीच्या लोकांना नशीबाची साथ मिळेल. या दरम्यान या लोकांना जबरदस्त नफा मिळू शकतो. या लोकांजवळ पैसाच पैसा येणार. हे लोक त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकतील. या लोकांच्या जीवनात आनंद दिसून येईल. विदेशात व्यवसाय करताना नफा मिळू शकतो.
अविवाहित लोकांचे लग्न जुळू शकते. नोकरी करणार्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. कार्यक्षेत्रात प्रगती दिसून येईल. कुटुंबात वडिल किंवा भावाचे आर्थिक सहकार्य मिळेल. दीर्घकाळापासून अडकलेले कामे पूर्ण होतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)