Shani Gochar 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनीचा स्वभाव सर्वांत क्रूर मानला जातो; पण त्याच शनिदेवाच्या कृपादृष्टीने गरीब माणूसही राजा बनू शकतो, अशीही वदंता आहे. शनी हा सर्वांत संथ गतीने फिरणारा ग्रह मानला जातो. या परिस्थितीत प्रत्येक राशीच्या लोकांना कधी ना कधी शनीच्या साडेसातीचा सामना करावा लागतो. २०२५ मध्ये शनी मीन राशीत प्रवेश करणार आहे. ते पाहता, काही राशींच्या लोकांची कुंडली शनीच्या कृपाशीर्वादाने बदलू शकते. पण, नेमक्या कोणत्या राशींना या स्थितीचा विशेष लाभ मिळू शकतो ते आपण जाणून घेऊ…
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या व्यक्तींच्या जन्मराशींमध्ये शनी दुसऱ्या, पाचव्या वा नवव्या घरात असेल, त्या राशींवर शनिदेवाचा आशीर्वाद असतो. ही पार्श्वभूमी लक्षात घेता, शनी २०२५ मध्ये मीन राशीत प्रवेश करेल आणि त्यामुळे १२ राशींपैकी तीन राशींना मोठा फायदा होईल. विशेष म्हणजे शनिदेवाचे २०२७ पर्यंत मीन राशीत राहील.
शनीचा मीन राशीतील प्रवेश ‘या’ राशींना करेल मालामाल
कुंभ
शनिदेवाचा मीन राशीतील प्रवेश कुंभ राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरू शकतो. या काळात कुंभ राशीच्या लोकांना मोठा लाभ मिळू शकतो. २०२५ मध्ये तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते आणि प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. नोकरदारांना विशेष लाभ मिळू शकतो. बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. तसेच, तुम्हाला २०२७ पर्यंत नोकरीत कोणतीही अडचण येणार नाही. त्यासह मोठा आर्थिक नफाही मिळू शकतो. पदोन्नतीसोबत पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे. परदेशात जाण्याचीही संधी मिळू शकते. सरकारी कामात सुरू असलेल्या अडचणी आता संपू शकतात. त्यासह उत्पन्नाचे अनेक नवीन स्रोत निर्माण होतील आणि त्यामुळे तुमच्या आयुष्यात आनंदाचे अनेक क्षण येतील.
कर्क
शनीचा मीन राशीतील प्रवेश कर्क राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण घेऊन येऊ शकतो. या काळात नोकरदारांना पगारवाढीसह पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचीही संधी मिळू शकते. प्रत्येक कामात कोणत्या ना कोणत्या मार्गाने येणारे अडथळे आता दूर होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. या काळात शनी आणि राहूमध्ये होणाऱ्या बदलांमुळे या राशीच्या लोकांची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. जर तुम्ही काही काळापासून खूप मेहनत करीत असाल, तर तुम्हाला त्याचे बरेच फायदे या काळात मिळू शकतात.
वृश्चिक
मीन राशीत होणारा शनीचा प्रवेश वृश्चिक राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंदाचे क्षण येतील. त्यांना भौतिक सुख मिळू शकते. तुम्ही स्वतःसाठी काही वेळ देऊ शकता. तुम्ही आत्मपरीक्षण कराल, तर तुम्हाला या काळात स्वतःमध्ये बरेच बदल करता येऊ शकतात. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. या काळात तुम्हाला तुमच्या पूर्वीच्या कामाचे, कष्टाचे चांगले फळ मिळू शकते. पदोन्नतीची शक्यता आहे. पगार वाढण्याचीही शक्यता आहे. परदेश प्रवासाच्या मार्गात येणारा कोणताही अडथळा आता संपुष्टात येऊ शकतो. तुम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकता. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुम्ही योग्य मार्गाने चालाल, तर तुम्हाला समाजात मान-सन्मान मिळू शकतो. वाहन, मालमत्ता इत्यादी खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.