Shani Gochar 2025 : शनिचे नक्षत्र गोचर २ फेब्रुवारी २०२५ ला वसंत पंचमीच्या दिवशी होणार आहे. या दिवशी सकाळी ८.५१ मिनिटांवर शनि पूर्व भाद्रपदाच्या पहिल्या पदावरून दुसऱ्या पदावर गोचर करणार आहे. पूर्वभाद्रपद नक्षत्राचे स्वामी गुरू आहे जे भाग्याचे कारक मानले जातात.
वसंत पंचमीच्या दिवशी शनि नक्षत्र गोचर तीन राशींसाठी भाग्याचे ठरणार आहे. या लोकांना धनलाभ होऊ शकतो. अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतात. त्या तीन कोणत्या राशी आहेत, हे आज आपण जाणून घेणार आहोत. (Shani Gochar 2025 shani transit in a purva bhadrapada nakshatra three zodiac signs get money wealth and success)

मकर राशी

शनिचे नक्षत्र गोचर मकर राशीच्या लोकांसाठी फायद्याचे ठरू शकते. व्यवसायात या लोकांना चांगला नफा मिळू शकतो. मुलांकडून सुख प्राप्त होऊ शकते. आर्थिक अडचणी दूर होतील मानसिक त्रास सुद्धा कमी होईल. कमाईचे स्त्रोत वाढतील.
हे लोक कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकतील. धार्मिक कार्यात सहभाग घेतील. प्रवासाचे योग जुळून येत आहे. साडेसातीचा अशुभ प्रभावापासून हे लोक दूर राहतील.

कर्क राशी

वसंत पंचमीपासून शनि देव कर्क राशीच्या लोकांवर विराजमान राहतील. पूर्वभाद्रपद नक्षत्रामध्ये शनिचा गोचर फायद्याचा ठरू शकतो. नोकरीमध्ये प्रगती होऊ शकते. गुंतवणूकीसाठी हा काळ उत्तम राहीन.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिचा नक्षत्र गोचर शुभ ठरणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहीन. अतिरिक्त खर्च करणे टाळावा. जोडीदाराबरोबर संबंध दृञ राहतील. मिथुन राशीसाठी शनिचे नक्षत्र गोचर फायद्याचे ठरू शकते.

वसंत पंचमीच्या दिवशी शनि नक्षत्र गोचर करणार आहे. वसंत पंचमी ला सरस्वती जयंती सुद्धा म्हणतात. ज्ञान, विद्या आणि बुद्धीची देवी सरस्वतीला हा दिवस समर्पित केला जातो.

वसंत पंचमी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. माघ महिन्याच्या पाचव्या दिवशी देवी सरस्वती प्रकट झाली. हा दिवस वसंत ऋतुची सुरुवात मानला जातो, म्हणून या दिवसाला वसंत पंचमी म्हणतात, अशी मान्यता आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

Story img Loader