Shani gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे महत्त्व आहे. या ग्रहामध्ये एक शनि आहे, ज्याला सर्वात जास्त शक्तिशाली ग्रह मानतात. शनि प्रत्येक अडीच वर्षानंतर राशी परिवर्तन करतात ज्याचा परिणाम राशी चक्रातील १२ राशींवर दिसून येतो. जीवनात कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिसून येतो.
२९ मार्च रोजी न्याय देवता शनि गुरूच्या राशीमध्ये म्हणजेच मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरूच्या राशीमध्ये शनिने प्रवेश केल्याने काही राशीच्या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. या राशींना प्रत्येक क्षेत्रात अपार यश तसेच भरपूर धन लाभ मिळू शकतो. जाणून घेऊ या शनिच्या राशी परिवर्तनामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वैदिक पंचांगनुसार, शनि २९ मार्च २०२५ रोजी रात्री ११ वाजून १ मिनिटांनी मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. ज्या राशीमध्ये शनि २, ५ आणि ९ व्या भावात प्रवेश करतो तेव्हा तो चांदीच्या पायाने प्रवेश करतो. यामुळे तीन राशींना भरपूर लाभ मिळू शकतो.

कर्क राशी (Kark Zodiac)

चंद्राची राशी कर्क राशीमध्ये न्याय देवता शनि प्रवेश करणार आहे. मीन राशीमध्ये प्रवेश करून या राशीच्या भाग्य भावामध्ये विराजमान राहणार. भाग्य भावामध्ये विराजमान राहिल्याने या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. या लोकांच्या जीवनात येणारी आव्हाने समाप्त होऊ शकतात. तसेच नोकरी व्यवसायात भरपूर लाभ मिळू शकतो.

या लोकांना मेहनतीचे फळ मिळेल. शनि देवाच्या कृपेने या राशीच्या लोकांना शारीरिक आणि मानसिक तणावातून मुक्तता मिळेल, तसेच या लोकांचे काम पाहून यांचे बॉस यांच्यावर मोठी जबाबदारी देऊ शकतात. तसेच ज्या लोकांना उच्च शिक्षण घ्यायचे आहे त्यांना यश प्राप्त होऊ शकते. उच्च शिक्षणासाठी हे लोक विदेशात जाऊ शकतात. बिझिनेसमध्ये या लोकांना नफा मिळू शकतो.

कुंभ राशी (Kumbh Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी शनिचा गुरूच्या राशीमध्ये मीन राशीमध्ये प्रवेश आनंद घेऊन येऊ शकतो. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. जीवनात सुख शांती नांदू शकते. तसेच दीर्घ काळापासून अडकलेले कार्य पूर्ण होऊ शकते. नोकरी करणाऱ्या लोकांवर शनि देवाची विशेष कृपा दिसून येईल ज्यामुळे या लोकांना भरपूर लाभ मिळू शकतो. आकस्मिक धन लाभ मिळण्याचे योग जुळून येईल.

वृश्चिक राशी (Vrashchik Zodiac)

या राशीच्या लोकांसाठी शनिचा मीन राशीमध्ये प्रवेश लाभदायक ठरू शकतो. या राशीमध्ये शनि पाचव्या स्थानी विराजमान आहे, अशात या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात अपार यश मिळू शकते. जीवनात दीर्घ काळापासून अडकलेल्या अडचणी समाप्त होऊ शकते. याशिवाय हे लोक स्वत:वर खूप जास्त लक्ष केंद्रित करतील ज्यामुळे ते स्वत:मध्ये परिवर्तन घडवून आणतील.

तसेच नोकरी करणाऱ्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी येणार्‍या अडचणी दूर होतील. तसेच या लोकांचा पगार वाढ होऊ शकतो. या लोकांना वाहन, संपत्ती, कार खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.