Tirgrahi Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह वेळोवेळी राशी, नक्षत्र बदल करतात, ज्यामुळे राजयोग आणि त्रिग्रही योग तयार होतात; ज्याचा परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मानवी जीवनावर होतो. यात मार्चमध्ये मीन राशीत त्रिग्रही योग तयार होणार आहे. सूर्य, बुध आणि शनी यांच्या युतीमुळे हा योग तयार होईल. नवीन वर्षातील पहिला त्रिग्रही योग काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकतो. तसेच या राशींचे नशीब उजळू शकते. चला तर जाणून घेऊया, या भाग्यवान राशी कोणत्या आहेत…
त्रिग्रही योग ‘या’ तीन राशींना करेल मालामाल ( Shani Surya Budha Will Make Tirgrahi Yog 2025 )
मीन
त्रिग्रही योग मीन राशीसाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुमचे व्यक्तिमत्व सुधारू शकते. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि तुमची प्रतिमा सकारात्मक होईल, पण तु्म्ही योग्य कामावरच मेहनत खर्च करा, इतरांच्या भावनांचा आदर करा. कुटुंब आणि वैवाहिक जीवनात शांती आणि सुसंवाद राहील. या काळात तुम्हाला आर्थिक फायदा होईल. जोडीदाराच्या शोधात असलेल्या लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.
मिथुन
त्रिग्रही योग मिथुन राशीसाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात बेरोजगारांना नवीन नोकऱ्या मिळू शकतात. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला कामावर काही नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायाशी संबंधित लोकांना अनेक नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय वेगाने प्रगती करेल. तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभदेखील मिळू शकतो. तसेच या काळात तुमचे तुमच्या वडिलांशी असलेले नाते अधिक घट्ट होईल.
धनु
धनु राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योगाची निर्मिती फायदेशीर ठरू शकते. या काळात तुमच्या सुखसोयी वाढतील. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ शुभ राहील. तुम्हाला सर्जनशील आणि आध्यात्मिक क्षेत्रात यश मिळेल. तुमचा कल आत्मनिरीक्षण आणि ध्यानाकडे असेल, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल. यावेळी तुम्ही वाहन आणि मालमत्ता खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता. या काळात तुमचे तुमच्या आईबरोबर असलेले नाते अधिक घट्ट होईल.