ज्योतिषशास्त्रात शनि गोचराला खूप महत्त्व आहे. कारण शनि ग्रह अडीच वर्षांनंतर राशी बदल करतो. नऊ ग्रहांपैकी शनि हा सर्वात मंद चाल असलेला ग्रह आहे. शनि प्रभावामुळे मानवी जीवनावर प्रभाव पडत असतो. कुंडलीत शनिची स्थिती व्यवस्थित नसल्यास त्रास जाणवतो. शनि महादशा, शनि अंतर्दशा, शनि साडेसाती, शनि अडीचकी या काळात प्रभाव दिसून येतो. त्यामुळे शनि आपल्या राशीला येणार म्हटलं की घाम फुटतो. तर काही जणांना शनि आपल्या राशीतून जाणार म्हटलं की दिलासा वाटतो. साडेसात वर्षांनंतर धनु राशीची शनि सोडेसातीपासून सुटका होणार आहे. शनिदेवाला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागतात. त्यामुळे सुमारे ३० वर्षांनी शनि कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. २९ एप्रिलला शनिने कुंभ राशीत प्रवेश करताच शनि साडेसातीपासून धनु राशीची सुटका होणार आहे.
ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाधीशाचा दर्जा आहे. म्हणजे शनि ग्रह कर्मानुसार फळ देतो. शनि ज्या राशीत प्रवेश करतो त्या राशीसह मागच्या पुढच्या राशीला साडेसाती सुरु असते. आता शनि ग्रह कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे मकर राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा तर मीन राशीला साडेसातीचा पहिला टप्पा सुरु होणार आहे. तर धनु राशीचा साडेसातीपासून सुटका होणार आहे. तर तूळ आणि मिथून राशीला शनिची अडीचकी सुरु आहे. त्यांनाही २९ एप्रिलनंतर दिलासा मिळणार आहे.
Chanakya Niti: अशा लोकांना येतं अकाली वृद्धत्व, जाणून घ्या चाणक्य नीति
धनु राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल. मात्र १२ जुलै २०२२ रोजी शनि मकर राशीत वक्री होणार असल्याने पुन्हा तिन्ही राशी शनिच्या अधिपत्याखाली येतील. ही स्थिती १७ जानेवारी २०२३ पर्यंत राहील. मिथुन, तूळ आणि धनु राशीच्या लोकांना १७ जानेवारी २०२३ रोजी शनिपासून खऱ्या अर्थाने मुक्ती मिळेल.