Saturn Transit in Pisces 2025: ज्योतिषशास्त्रामध्ये ९ ग्रहामध्ये शनि असा ग्रह आहे ज्याची भीती सर्वांना वाटते. कारण शनि हा कर्मदाता आहे. तो व्यक्तीला कर्मानुसार फळ देतो. त्यांच्या प्रत्येक चालीचा व्यक्तीच्या जीवनावर चांगला वाईट परिणाम होत असतो. त्यामुळे शनि गरीबाला राजा आणि राजाला गरीब बनवू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शनि ग्रह ३० वर्षानंतर गुरू ग्रहाची राशी मीनमध्ये प्रवेश करणार आहे. २९ मार्च २०२५ ला शनि कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शनिचा मीन राशीमध्ये गोचर मोठा बदल घडवून आणणार. याचा शुभ परिणाम तीन राशींवर दिसून येईल. या लोकांच्या करिअर, व्यवसाय अप्रत्यक्षपणे दिसू शकते. जाणून घेऊ या त्या नशीबवान राशी कोणत्या आहेत, ज्यांना शनि गोचरचा लाभ मिळू शकतो. (shani gochar in Pisces 2025 these three zodiac signs become rich get money wealth and success)

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनिची राशी परिवर्तन अत्यंत शुभ फळ देणारे ठरणार. या लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते. नोकरीमध्ये प्रमोशन मिळू शकते. अडकलेले कामे मार्गी लागतील. व्यवसायात अचानक लाभ होऊ शकतो. मन प्रसन्न राहू शकते. शत्रुंवर विजय मिळवू शकतात. लव्ह लाइफ, मॅरीड लाइफ उत्तम राहीन. या लोकांना आर्थिक फायदा होईल.

तुळ राशी

तुळ राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा दिसून येईल. न्यायालयीन कार्यात या लोकांना यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन किंवा पगारवाढ होऊ शकते. कोणताही मोठा प्रोजेक्ट मिळू शकतो. आर्थिक स्थितीमध्ये मोठा बदल दिसून येईल. कामाच्या ठिकाणी सकारात्मक वातावरण राहीन. सगळीकडे यांच्या कामाचे कौतुक केले जाईल.

मकर राशी

मकर राशीच्या लोकांसाठी शनि मोठा लाभ देणार. या लोकांचा आत्मविश्वास तसेच धाडस वाढेन. अचानक या लोकांना धनप्राप्ती होऊ शकते. अडकलेला पैसा या लोकांना मिळू शकतो. जीवनात खूप जास्त आनंद मिळू शकतो. मकर राशीच्या लोकांसाठी शुभ काळ सुरू होईल. या लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)