Shani Gochar In 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह हा एका ठराविक वेळी गोचर करतो ज्याचा प्रभाव कमी अधिक प्रमाणात सर्व १२ राशींवर पडतो. शनी हा सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह आहे त्यामुळे शनीला आपले राशी किंवा नक्षत्र गोचर करण्यासाठी किमान अडीच वर्षांचा कालावधी लागतो. २०२३ च्या सुरुवातीला शनीने स्वतःच्या राशीत म्हणजेच कुंभमध्ये प्रवेश घेतला आहे आणि सध्या शनिदेव हे वक्री अवस्थेत आहेत. ज्योतिष तज्ज्ञांच्या माहितीनुसार, २०२५ मध्ये शनी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहेत.

शनिदेव हे दंडाधिकारी असल्याने ज्यांच्या राशीत त्यांचे वास्तव्य असते त्या राशीला कष्ट सहन करावे लागणार असा समज असतो. पण काही राशींवर शनी महाराजांचा विशेष आशीर्वाद असू शकतो. अशाच काही राशींना शनिदेव कुंभ राशीतील वास्तव्यादरम्यान प्रचंड धनलाभ व प्रगतीची संधी देऊ शकणार आहेत. २०२५ पर्यंत म्हणजे पुढील दीड वर्ष या राशी सोन्याहून पिवळा सुखाचा काळ अनुभवतील. या राशी कोणत्या व त्यात तुमचा समावेश आहे का हे पाहूया…

Mangal Gochar 2024 Mars will enter Moons house after 18 months three lucky zodiac signs will get immense money and wealth
१८ महिन्यानंतर मंगळ करणार चंद्राच्या घरात प्रवेश, ‘या’ तीन राशींचे नशीब पालटणार, मिळणार अपार पैसा अन् धनसंपत्ती
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
venus and saturn ki yuti
शनी-शुक्र देणार बक्कळ पैसा; ३० वर्षानंतर कुंभ राशीत ग्रहांची युती, ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे चमकणार भाग्य
diwali 2024 rajyog shash rajyog 2024, budhaditya rajyog, ayushman rajyog
लक्ष्मीच्या कृपेने दिवाळीत ‘या’ राशींचे लोक होतील करोडपती! ३० वर्षांनंतर जुळून येणाऱ्या तीन राजयोगाने होईल भरभराट
Shani And Rahu Nakshatra Parivartan
५० वर्षानंतर राहु आणि शनि एकत्र, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब , मिळू शकतो बक्कळ पैसा
Shardiya Navratri 2024
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ‘या’ गंभीर चुका टाळा अन् देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ‘या’ गोष्टी करा
Numerology News IN Marathi : People get Wealth and Success after the age of 42
‘या’ जन्मतारखेला जन्मलेल्या लोकांना वयाच्या ४२ व्या वर्षानंतर मिळतो धनसंपत्ती, पैसा अन् यश
guru vakri 2024 | Jupiter Vakri In Taurus in Navratri after 12 years
१२ वर्षानंतर नवरात्रीमध्ये गुरू होणार वक्री, ‘या’ तीन राशींचे नशीब चमकणार, मिळणार अपार धनलाभ

पुढील दीड वर्ष ‘या’ राशींची होणार चांदी?

मेष रास (Aries Zodiac Horoscope)

शनी अकराव्या अर्थात लाभ स्थानात येत आहे. हा शनी वर्षभर आपल्याला उत्तम साथ देईल. उद्योगधंद्यात राजकारणात पुढे येण्याची संधी प्राप्त करून देईल. नवीन परिचय, नवीन गाठी भेटीतून होणारा आनंदाचा स्पर्श मनाला उभारी देईल. जागोजागी मदतीचे हात पुढे येतील. त्यातूनच आपणास संयम सावधानता आणि विनय या गुणांची खऱ्या अर्थाने ओळख होईल. इतकेच नव्हे तर हे आयुष्यभराचे मार्गदर्शक ठरतील.

वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)

आपल्या दशम स्थानात शनीचे आगमन खूप यशदायक ठरेल. पण व्यवहार आणि भावना यांचे समीकरण जपा. पैशाचा अपव्यय टाळा. उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या निर्णय क्षमतेचा उपयोग मोलाचा ठरेल. मात्र कौटुंबिक जीवनांत बद्धपणे वागू नका. त्यातून जीवनांतील आनंद हरवेल. सारे काही समजुतीने घेणे हिताचे ठरेल. अशा वेळी मायेची नाती खूप महत्त्वाची मोलाची ठरतील. स्तुतीपाठकापासून दोन हात दूर रहा. मात्र मैत्री जपा.

सिंह रास (Leo Zodiac Horoscope)

सिंह राशीला शनी सप्तम स्थानातून जात आहे. उद्योगधंद्यात भागीदारी, कौटुंबिक सौख्यात अडचणी येतील. पण कुंभेतील स्वगृहीच्या शनीमुळे यातून उत्तम बचाव होईल.या काळात स्वमनाशी होणारा संवाद कठीण समस्याचे रुप साधे सोपे करील. आरोग्य सांभाळा पोटाचे विकार आजार यासाठी पथ्य पाणी आवश्यक ठरेल. क्रोध, अति विचार गैरसमज यापासून कटाक्षाने दूर रहा. विशेष म्हणजे शुक्र बुधाचे विशेष कृपा छत्र लाभेल त्यातून समस्या दूर होतील.

तूळ रास (Libra Zodiac Horoscope)

या राशीला शनी पाचवा येत आहे. तूळ- कुंभ या दोन्ही वायूंनी बौद्धीक राशी त्यामुळे विज्ञानशाखेच्या लोकांना या वर्षात उत्तम संधी प्राप्त होतील. नवे संशोधन नवे विचार पुढे येतील. प्रगतीशील कामे होतील. समाजकार्यांत, राजकारणात संधी प्राप्त होतील. शेअर्स, म्युच्युअल फंड यात केलेली गुंतवणूक फायदेशील ठरेल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षणात विशेष प्रगती दिसून येईल.

हे ही वाचा<< शनी-सूर्य ७ व्या घरातून समोरासमोर; समसप्तक योग बनवून ‘या’ राशींच्या नशिबाला देणार कलाटणी, लाभेल लक्ष्मीकृपा

वृश्चिक रास (Scorpio Zodiac Horoscope)

कुंभेचा शनी वृश्चिक राशीला चतुर्थ स्थानात येतो. कौटुंबिक सुखात होणारे मतभेद पंचमातील गुरु व षष्ठातील राहू वाढू देणार नाहीत पण अति हट्टीपणा हेकेखोरपणाला मुरड घालण्यातच आपले हित आहे. या मंगळाच्या वृश्चिक राशीला शनीचा कायम विरोध राहील. शनीशी होणारा शुभयोग कौटुंबिक कलह दूर करील. स्थावर इस्टेट मालमत्ता शेती वाडीच्या खरेदीविक्रीतून फायदा होईल. कोर्टकचेरी निकालात यश लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)