Shash Mahapurush Rajyog: ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कर्म, न्याय आणि धर्माचं कारक मानला जातो. तो मानवला त्याच्या कर्मानुसार फळं देतो. शनिदेव हा संथ गतीने आपली स्थिती बदलतो. तो एका राशीत अडीच वर्ष विराजमान असतो. सध्या शनिदेव स्वगृही कुंभ राशीत विराजमान आहेत. आता शनिदेवाचा येत्या मार्च महिन्यात उदय होणार आहे. ज्यामुळे ‘शश महापुरुष राजयोग’ निर्माण होत आहे. हा राजयोग काही राशींसाठी शुभ परिणाम घेऊन येणारा ठरु शकतो. त्यांना आयुष्यात अपार यश मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या राशींचे चांगले दिवस येऊ शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ राशींना होणार धनलाभ?

मेष राशी (Aries Zodiac)

मेष राशींच्या लोकांसाठी शश महापुरुष राजयोग फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. करिअर आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे. शैक्षणिक स्पर्धेच्या क्षेत्रातही अपेक्षित यश मिळू शकतो. करिअरच्या बाबतीत या वेळी तुम्हाला कुठूनतरी चांगली बातमी मिळू शकते. तुमची अनेक रखडलेली कामे पुन्हा रुळावर येऊ शकतात. अचानक मोठा धनलाभ होऊ शकतो. एकंदरीत हा काळ तुमच्यासाठी खूप चांगला आणि उत्साही असू शकतो.

(हे ही वाचा : ५० वर्षांनी सूर्य-मंगळ एकत्र येताच फेब्रुवारीमध्ये ‘या’ राशींच्या घरात येईल चांगला पैसा? माता लक्ष्मीच्या कृपेने होऊ शकतात श्रीमंत )

मिथुन राशी (Gemini Zodiac)

शश महापुरुष राजयोग बनल्याने मिथुन राशींच्या लोकांना चांगले दिवस अनुभवायला मिळू शकतात. तुमच्या कामाच्या जोरावर तुम्हाला यश मिळू शकते. तुम्हाला उच्च पद आणि मोठा पगार मिळण्याची शक्यता आहे. अनेक नवीन सुवर्णसंधीही मिळू शकतात. व्यवसायासाठी हा काळ प्रगती घेऊन येणारा ठरु शकतो. अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला मुलाच्या बाजूने काही चांगली बातमी मिळू शकते. धार्मिक कार्याकडे तुमचा कल वाढू शकतो.

तूळ राशी (Libra Zodiac)

तूळ राशीच्या लोकांसाठी शश महापुरुष राजयोग काही सुखद आणि सकारात्मक बदल आयुष्यात आणणारा ठरु शकतो. व्यवसायात किंवा नोकरीत आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शनिदेवाच्या कृपेने कृपेने तुम्हाला भरपूर संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. मोठे पद आणि मान-सन्मानात वाढ होऊ शकते. अविवाहित लोकांचे लग्न ठरण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंदी आनंद असण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani gochar saturn made in shash mahapurush rajyog positive impact on these zodiac signs bank balance to raise money pdb