Shani Gochar Shash Rajyog 2024-25 : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीला कर्म फळदाता आणि न्यायाचा कारक ग्रह मानले जाते. शनी ठरावीक काळानंतर राशिबदल करतो, ज्याचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे परिणाम होतो. नवग्रहातील शनी हा एकमेव असा ग्रह आहे, ज्याला मुख्य अधिकार देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी शनीच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. तो व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतो. शनी क्रूर ग्रह मानला जात असला तरी तो गरिबाला राजा बनविण्यातही मागे हटत नाही. ज्योतिषशास्त्रानुसार शनी सध्या त्याच्या मूळ कुंभ राशीत विराजमान आहे; जिथे तो मार्च २०२५ पर्यंत राहील. अशा स्थितीत शनी आपल्या राशीत असल्यामुळे शश नावाचा राजयोग निर्माण होत आहे. शनीच्या शश राजयोगामुळे काही राशींचे लोक २०२५ पर्यंत मालामाल होऊ शकतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनीच्या शश राजयोगामुळे ‘या’ तीन राशी होणार धनवान

तूळ (Libra Horoscope)

शनीच्या कुंभ राशीतील परिवर्तनामुळे तयार होणारा शश राजयोग तूळ राशीच्या लोकांसाठी अनुकूल सिद्ध होऊ शकतो. या राशीच्या लोकांच्या आयुष्यात शनिदेव चांगले दिवस घेऊन येईल. त्यामुळे तूळ राशीच्या लोकांना खूप फायदा होणार आहे. त्यांच्या मान-सन्मानात वाढ होईल. नोकरदार लोकांसाठीही हा काळ खूप फायदेशीर ठरू शकतो. जे लोक नोकरी बदलण्याचा विचार करीत आहेत, त्यांच्यासाठी हा अनुकूल काळ आहे. नोकरदारांना पदोन्नतीबरोबर पगारवाढ मिळण्याचीही शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला आहे. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना फायदा मिळू शकतो. प्रत्येक क्षेत्रात यश मिळाल्याने भरपूर आर्थिक लाभ होऊ शकतो. एकूणच मार्च २०२५ च्या अखेरीस शनी या राशीच्या लोकांना खूप काही देऊन जाईल, अशी शक्यता आहे.

कुंभ (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचा शश राजयोग लाभदायक ठरू शकतो. या काळात कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात अनेक चांगले बदल घडून येऊ शकतात. या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकतात आणि भरपूर पैसा कमावू शकतात. अचानक आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे. नोकरीबरोबर तुम्हाला व्यवसायातही भरपूर नफा मिळू शकतो. न्यायालयीन प्रकरणांमध्येही यश मिळू शकते. तुमच्या आयुष्यात काही आनंदी क्षण येऊ शकतात. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. आयुष्यात येणाऱ्या अडचणींवर सहज मात कराल.

हेही वाचा – स्वप्नात भरपूर पैसा, सोन्या-चांदीचे दागिने दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या काय सांगतं स्वप्नशास्त्र

मकर (Capricorn Horoscope)

शनीचा शश राजयोग मकर राशीच्या लोकांसाठीदेखील खूप खास ठरू शकतो. या काळात मकर राशीच्या लोकांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो; परंतु शेवटी त्यांना खूप फायदा होईल. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला लवकरच मिळू शकेल. त्याचबरोबर परदेशात जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लोकांनाही यश मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ चांगला जाणार आहे. उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. प्रदीर्घ प्रलंबित कामे पुन्हा सुरू होऊ शकतात. वैवाहिक जीवनात येणारा कोणताही अडथळा या काळात संपुष्टात येऊ शकतो. त्यासह लग्नासाठी स्थळे येऊ शकतात.

(टीप- वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani gochar shash rajyog 2024 25 shani gochar in kumbh rashi saturn transit forming shash rajyog these zodiac sign get great opportunity and get more money astrology horoscope sjr