Shani Effect Till 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा सर्वात कमी गतीने भ्रमण करणारा ग्रह मानला जातो. कलियुगातील दंडाधिकारी म्हणून शनीला खूप महत्त्व आहे. शिवाय शनी महाराज हे न्याय व कर्माचे देवता म्हणूनही ओळखले जाते. २०२३ च्या सुरुवातीलाच म्हणजे १७ जानेवारी २०२३ ला शनीने तब्बल ३० वर्षांनी आपल्या स्वामित्वाची रास कुंभ मध्ये प्रवेश केला होता. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी शनीला किमान अडीच वर्षांचा कालावधी तरी आवश्यक असतो. अलीकडेच शनीने कुंभ राशीत एक वर्ष पूर्ण केले आहे. यानुसार २०२५ च्या मध्यावरील महिन्यांमध्ये शनीचा प्रभाव बदलणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनी हा दंडाधिकारी असल्याने त्याचा प्रभाव अशुभ असतो असा गैरसमज अनेकांच्या मनी असतो पण मुळात शनिदेव हे प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ देत असतात फक्त त्याचा प्रभाव कर्मानुरूप शुभ अशुभ असू शकतो. यानुसार आता २०२५ साली शनीच्या प्रभावाखालील राशी बदलतील पण तत्पूर्वी पुढील १५-१६ महिने काही राशींना अत्यंत सुखाचे दिवस अनुभवता येऊ शकणार आहेत. प्रचंड धनलाभ व प्रगतीच्या संधींसह या राशी एखाद्या करोडपतीचे जीवन जगू शकतात. या नशीबवान राशी कोणत्या हे ही पाहूया..

शनीकृपेने ‘या’ राशींना मिळेल गडगंज श्रीमंती?

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

२०२३ च्या सुरुवातीलाच शनीचा प्रभाव मिथुन राशीतून कमी झाल्याने त्यांच्यावरील साडेसाती संपुष्टात आली होती. २०२५ पर्यंत हे सुख कायम असू शकते. या कालावधीत तुम्हाला मिळत असलेली कोणतीही संधी सोडू नका. शनी देव आपल्या कुंडलीत नवव्या स्थानी भ्रमण करत आहेत. आपल्याला नशिबाची तगडी साथ लाभू शकते. विवेक राखावा. परदेश यात्रेची संधी मिळू शकते, प्रवासाच्या दरम्यान होणाऱ्या ओळखी नीट विचारपूर्वक पद्धतीने हाताळल्यास यातून भविष्यातही प्रचंड लाभ होऊ शकतो. मीडिया किंवा वाणीशी संबंधित व्यवसायात असलेल्यांना लाभाचे संकेत आहेत.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

कुंभेचा शनी मकर राशीला लाभ स्थानात येतो. कौटुंबिक सुखात होणारे मतभेद पंचमातील गुरु व षष्ठातील राहू वाढू देणार नाहीत पण अति हट्टीपणा हेकेखोरपणाला मुरड घालण्यातच आपले हित आहे. या मंगळाच्या वृश्चिक राशीला शनीचा कायम विरोध राहील. शनीशी होणारा शुभयोग कौटुंबिक कलह दूर करील. स्थावर इस्टेट मालमत्ता शेती वाडीच्या खरेदीविक्रीतून फायदा होईल. कोर्टकचेरी निकालात यश लाभेल. आरोग्याकडे लक्ष द्यावे.

हे ही वाचा<< २२ जानेवारी पंचाग: शुभ नक्षत्रात अमृत सिद्धी योग, मेष ते मीन ‘या’ १२ राशींना आज कसे लाभेल सुख? हाती येईल अधिकार

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

आपल्या दशम स्थानात शनीचे आगमन खूप यशदायक ठरेल. पण व्यवहार आणि भावना यांचे समीकरण जपा. पैशाचा अपव्यय टाळा. उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या निर्णय क्षमतेचा उपयोग मोलाचा ठरेल. यामुळेच येत्या काळात प्रचंड धनप्राप्ती होऊ शकते. कौटुंबिक जीवनांत बद्धपणे वागू नका. त्यातून जीवनांतील आनंद हरवेल. सारे काही समजुतीने घेणे हिताचे ठरेल. अशा वेळी मायेची नाती खूप महत्त्वाची मोलाची ठरतील. स्तुतीपाठकापासून दोन हात दूर रहा. मात्र मैत्री जपा.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani golden feet for 16 months in these rashi lucky people to get life of millionaire money achhe din from today astrology marathi svs