ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवता शनिदेव जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण करतात., तेव्हा काही राशींना साडेसाती आणि अडीचकीचा प्रारंभ होतो. तर काही राशींना शनि प्रभावापासून मुक्ती मिळते. शनिदेव कर्मानुसार फळ देतात, असं मानलं जातं. त्यामुळे ग्रहांमध्ये शनिला न्यायाधीशाचे स्थान आहे. २९ एप्रिल रोजी शनि ग्रह स्वतःच्या राशीत कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. शनिचा कुंभ राशीत प्रवेश होताच दोन राशींवर शनिची अडीचकी सुरू होईल. २९ एप्रिलपर्यंत २०२२ पर्यंत मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर शनि अडीचकीचा प्रभाव असेल. यानंतर कर्क आणि वृश्चिक राशीच्या लोकांवर अडीचकी सुरू होई. हा प्रभाव १२ जुलैपर्यंत राहील. अडीचकी म्हणजे शनिग्रहाचा प्रभाव अडीच वर्षे असतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शनि वक्री अवस्थेत संक्रमण

१२ जुलैपासून शनिदेव पुन्हा एकदा आपल्या पूर्वीच्या राशीत मकर राशीत वक्री स्थितीत प्रवेश करणार आहेत. मकर राशीत शनि राशी येताच मिथुन आणि तूळ राशीच्या लोकांवर पुन्हा शनि अडीचकीच्या प्रभावाखाली येतील. १७ जानेवारी २०२३ पर्यंत शनिच्या कठोर कालावधीला सामोरे जावे लागेल. शनिची अडीचकी सुरू झाल्यामुळे या लोकांना करिअर आणि व्यवसायात अपयशाला सामोरे जावे लागू शकते. काही महत्त्वाची कामे अडकू शकते. व्यवसायात चांगला फायदा होणार नाही. निराशा होऊ शकते.

१८ वर्षानंतर तूळ राशीत केतु ग्रह करणार प्रवेश, ‘या’ राशींना मिळणार नशिबाची साथ

हे उपाय तुम्हाला शनिदोषापासून दिलासा देऊ शकतात

  • साडेसाती आणि अडीचकी सुरु होते तेव्हा शनिवारी उडीद डाळ, काळे कापड, काळे तीळ आणि काळे हरभरे यासारख्या काळ्या वस्तू एखाद्या गरीब व्यक्तीला दान कराव्यात. असे केल्याने शनिदेवाची कृपा कायम राहते.
  • शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, असे केल्याने आर्थिक समस्या दूर होतात. त्याचबरोबर आरोग्यही चांगले राहते.
  • ‘ओम प्रां प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः’ आणि ‘ओम शं शनिश्चरायै नमः’ या मंत्राचा जप करा
  • शनिदेवाची साडेसाती किंवा अडीचकी सुरु आहे, अशा लोकांनी शनिवारी हनुमानाची पूजा करावी. हनुमान चालिसा किंवा सुंदरकांडचा पाठ करावा. यामुळे शनिदेवाचे नकारात्मक परिणाम कमी होतात.
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani grah change rashi after 30 months rmt