ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा जेव्हा एखादा ग्रह राशी बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम मानवी जीवनावर होतो. २०२२ मध्ये अनेक मोठे आणि लहान ग्रह राशी बदलणार आहेत. या यादीत कर्मफल देणारे शनिदेवाचे नाव देखील समाविष्ट आहे. जेव्हा जेव्हा शनि ग्रह मार्गस्थो होतो, तेव्हा कोणत्यातरी राशीवर साडेसती आणिअडीचकीचा प्रभाव सुरू होतो. तर काही राशींना साडेसाती आणिअडीचकीपासून मुक्ती मिळते. जाणून घेऊया की कोणत्या राशीच्या लोकांना साडेसाती आणि अडिचकीपासून मुक्ती मिळणार आहे. २४ जानेवारी २०२० पासून शनि मकर राशीत भ्रमण करत आहे. त्यामुळे मिथुन आणि तूळ राशीसाठी शनीची अडीचकी सुरू आहे. तर धनु, मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी शनी साडेसाती सुरू आहे. एकाच वेळी पाच राशींवर शनिचा प्रभाव आहे. धनु राशीच्या लोकांसाठी शनी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू आहे. मकर राशीचा दुसरा टप्पा, तर कुंभ राशीचा पहिला टप्पा सुरु आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा