Shanigrah: ज्योतिष शास्त्रानुसार शनि ग्रह हा दु:ख आणि कष्टाचा कारक मानला जातो. याला कुंभ आणि मकर राशीचा स्वामी देखील म्हणतात . ज्या व्यक्तींच्या जन्म राशीत शनि भारी असतो, त्यांना त्रास सहन करावा लागतो. ऑक्टोबरमध्ये शनि ग्रहाचे भ्रमण होणार आहे. शनीच्या मार्गामुळे अनेक राशींवर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि अनेकांवर त्याचा चांगला परिणाम होऊ शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार अशा अनेक राशी आहेत ज्यांच्यावर या काळात शनिदेवाची विशेष कृपा असेल आणि हा काळ त्यांच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात कोणत्या राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा असेल, आम्ही त्या राशींबद्दल सांगणार आहोत.
मीन राशी
ज्योतिष शास्त्रानुसार या काळात मीन राशीच्या लोकांवर शनिदेवाची कृपा असेल. आर्थिक लाभासह उत्पन्न वाढू शकते. यामुळे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता. व्यवसायातही चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. यासोबतच उत्पन्नाचे नवे स्रोतही निर्माण होऊ शकतात, जिथून लाभ होण्याची शक्यता आहे.
( हे ही वाचा: दिवाळीपूर्वी ‘या’ ४ राशींच्या उत्पन्नात अचानक होईल वाढ; जाणून घ्या कोणत्या राशींचा आहे यात समावेश)
धनु राशी
या राशीच्या लोकांना अडकलेला पैसा मिळू शकतो. व्यवसायातही फायदा होऊ शकतो. प्रतिष्ठेतही वाढ होईल. करिअरमध्येही तुम्हाला चांगले परिणाम मिळू शकतात. या राशीच्या लोकांसाठी मेष राशीतील शनि ग्रहच लाभदायक ठरू शकतो . व्यवसाय आणि नोकरीच्या क्षेत्रात चांगले परिणाम मिळू शकतात. आर्थिक लाभासोबतच कामाच्या ठिकाणी कौतुकही होऊ शकते.
कर्क आणि वृश्चिक
कर्क राशीच्या लोकांच्या दीर्घकालीन समस्या दूर होऊ शकतात. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. दुसरीकडे, वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी ही सर्वोत्तम वेळ असू शकते. तसेच तूळ राशीच्या लोकांसाठी हा काळ चांगला असू शकतो. पैसा मिळण्यासोबतच करिअरच्या नवीन संधीही मिळू शकतात.