Maharashtra Weather Astrology Predictions: १ मे १९६० साली स्थापन झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या धनु लग्नाच्या कुंडलीमध्ये गेल्या तीन वर्षात मोठी खळबळ उडालेली आहे. आता तापलेल्या राजकीय वातावरणाला टक्कर देण्यासाठी निसर्गाचे वारे सुद्धा बदलण्याचे योग आहेत. ज्योतिष तज्ज्ञ उदयराज साने यांनी ग्रहताऱ्यांची स्थिती व महाराष्टाच्या कुंडलीनुसार वर्ष २०२३ मधील हवामानाचे अंदाज वर्तवले आहेत.२०२३ मधील थंडीचे महिने सरताना हळूहळू उन्हाच्या झळा वाढू लागल्या आहेत. थंडीची लाट यंदा जितकी तीव्र होती तितका उन्हाळा व पावसाळा जोरदार असणार का हे आपण जाणून घेऊयात.
२०२३ मध्ये महाराष्ट्रात उन- पावसाळा कसा असणार?
नव्या वर्षात बुध हा अग्नी राशीत वक्री राहणार आहे, त्यामुळे उन्हाळा हा चांगलाच कडक राहणार असला, तरी त्याचसोबत अवकाळी पाऊसही जोरदार राहणार असल्याने पिकांची नासाडी होणार आहे. हा अवकाळी पाऊस नगर-सांगली–कोल्हापूर-कोकण-विदर्भ-मराठवाडा या प्रदेशांना चांगलाच फटका देणारा आहे. एकीकडे पाऊस चांगलीच ओढ देणार असून, दुसरीकडे हा अवकाळी पाऊस मोठे नुकसान करणार असल्याचे दिसून येईल.
शिंदे सरकारसमोर मोठं आव्हान
महाराष्ट्रात उद्योग क्षेत्रांना लागणारी वीज-पाणी-वाहतूक व्यवस्था सुधारणा करण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील नवे सरकार जोरदार प्रयत्न करेल. त्यात या सरकारला चांगले यश मिळेल असे योग आहेत. गुरु एप्रिल महिन्यात मेष राशीत येणार असून, महाराष्ट्राच्या कुंडलीतील रवी-बुध-शुक्रा वरून त्याचे भ्रमण होणार असल्याने राज्याला हे भ्रमण उपयुक्त ठरणार आहे. पण या गुरु भ्रमणाची शक्ती कमी करणारा दुसरा कुयोग म्हणजेच राहू-प्लूटोचा केंद्रयोग जून पासून सुरु होऊन थेट २८ नोवेंबर पर्यंत राहणार आहे. हा योग उद्योग क्षेत्राचं नुकसान करणार आहे. हया वर्षात महाराष्ट्रात अवकाळी पाऊस चांगलाच धुमाकूळ घालणार आहे. हवामान बदल सर्वत्र झाल्याने महाराष्ट्राला सुद्धा त्याचा फटका बसणार आहे.
एकीकडे महाराष्ट्राची आर्थिक विस्कटलेली घडी सुधारण्याचा चंग नव्या सरकारने घेतला आहे. अशातच आर्थिक बाजूचा मुख्य स्तंभ असणारे उद्योग क्षेत्र, जागतिक मंदी व त्यात निसर्गाची वक्रदृष्टी या सर्व समस्यांना सरकारला तोंड द्यावे लागू शकते.