Four Rajyog In Horoscope: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह जेव्हा राशी व नक्षत्र परिवर्तन करतात तेव्हा प्रत्येक राशीच्या गोचर कुंडलीत प्रभाव दिसू लागतो. काहीवेळा ग्रहांच्या स्थितीनुसार राजयोग तयार होत असतात. काही राजयोग इतके दुर्मिळ असतात की ते अनुभवण्यासाठी शेकडो वर्ष वाट पाहावी लागू शकते. सध्या गुरु ग्रह हा मीन राशीत आहे तर शनी स्वघरी म्हणजेच कुंभ राशीत सूर्यासह विराजमान आहे. गुरूसह शुक्र सुद्धा मीन राशीत उच्च स्थानी आहेत. सूर्य, गुरु, शुक्र व शनीच्या संगमाने तब्बल ६१७ वर्षांनी अत्यंत दुर्लभ असे तीन राजयोग तयार झाले आहेत. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार येत्या काळात शश, मालव्य व हंस राजयोग तयार होत आहे. यामुळे चार राशींच्या भाग्यात बक्कळ धनलाभाचे योग तयार होत आहेत. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नेमका काय लाभ होणार हे पाहुयात..
कुंभ (Aquarius Zodiac)
कुंभ राशीच्या मंडळींसाठी शश महापुरुष राजयोग लाभदायक सिद्ध होऊ शकतो. शनिदेव आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत लग्न स्थानी स्थित आहेत. येत्या काळात आपल्याला आरोग्यातील सुधारणेच्या रूपात लाभ होणार आहेत. आपला आत्मविश्वास येत्या काळात प्रचंड वाढू शकतो. आपल्या जोडीदारासह नातेसंबंध दृढ होऊ शकतात. आपल्याला जोडीदाराकडून प्रचंड धनलाभ होऊ शकतो. शक्य होईल तितकी गुंतवणूक करण्यावर भर द्या. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांसह तुम्हाला ताळमेळ बसवावा लागेल. भविष्याच्या दृष्टीने मोठ्या योजना अंमलात आणता येतील. व्यवसायात धनलाभाचे योग आहेत.
धनु (Sagittarius Zodiac)
शुक्र ग्रहाच्या प्रभावाने गोचर कुंडलीने आपल्या राशीच्या चतुर्थ स्थानी मालव्य राजयोग बनत आहे. यामुळे आपल्याला भौतिक सुखाची प्राप्ती होऊ शकते. तुम्हाला वाहन व प्रॉपर्टी खरेदीचे योग आहेत. वाडवडिलांच्या संपत्तीचा लाभ होऊ शकतो. आर्थिक बाजू मजबूत होण्याची संधी आहे. वर्षभर धनलाभाची संधी आहे. आईसह तुमचे नाते सुधारू शकते. राजकारणाशी संबंधित व्यक्तींना इच्छेनुसार कर्माचे फळ मिळू शकते.
मिथुन (Gemini Zodiac)
गुरु व शुक्र ग्रहाच्या प्रभावाने आपल्या गोचर कुंडलीत हंस व मालव्य असे दोन राजयोग तयार होत आहेत. शुक्र ग्रह आपल्या राशीच्या गोचर कुंडलीत कर्म भावी उच्च स्थानावर विराजमान झाला आहे. आपल्याला येत्या काळात कामात प्रगतीची संधी आहे. बेरोजगारांना लवकरच नोकरीच्या संधी मिळू शकतात. भविष्यात तुम्हाला कर्माचे गोड फळ मिळू शकेल. व्यावसायिकांना लवकरच नवीन आर्थिक स्रोत लाभू शकतात. नोकरदार मंडळींना कामाची कक्षा वाढून पगारवाढ मिळू शकते.
हे ही वाचा<< पुढील १० महिन्यात ‘या’ राशींचे करिअर धरणार सुस्साट वेग; नव्या नोकरीसह तुम्हाला कधी मिळणार प्रचंड धनलाभ?
कन्या (Virgo Zodiac)
कन्या राशीसाठी मालव्य राजयोग शुभ फलदायी सिद्ध होऊ शकतो. हा बलाढ्य योग बनल्याने आपल्याला जुन्या गुंतवणुकीतून प्रचंड पैसे मिळू शकतात. आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. व्यापार वाढीची संधी आहे. जोडीदारासह आपल्याला परदेशवारीची संधी आहे.
(टीप: वरील लेख हा गृहितके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)