शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी लोक विविध उपाय करतात. यासाठी शनिवार, शनी जयंती आणि शनी अमावस्या हे दिवस विशेष मानले जातात. दरवर्षी शनी जयंती जेष्ठ महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. शास्त्रानुसार या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला होता. यावर्षी ३० मे शनी जयंती साजरी होतेय. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून शनी जयंती खूप महत्वाची मानली जाते. यावेळी शनी जयंतीला सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत आहे. त्यामुळे या दिवशी साडे साती, धैय्या आणि शनी स्थितीपासून मुक्ती मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात विशेष उपाय सांगण्यात आले आहेत. जाणून घेऊया या उपायांबद्दल…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या उपायांचे पालन केल्याने साडे साती आणि धैय्यापासून मुक्ती मिळते

या गोष्टी दान करा:
शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी व्रत करता येते. यामुळे शनी ग्रह बलवान मानला जातो. यासोबतच शनी जयंतीच्या दिवशी काही दान करावे. काळे कपडे, काळे जोडे, काळी मसूर दान करणे उत्तम मानले जाते.

शनिदोषापासून मुक्ती मिळेल:
शनीची साडे साती किंवा धैय्या चालू असेल तर शनी जयंतीच्या दिवशी काळ्या चामड्याचे जोडे किंवा चप्पल घालून शनी मंदिरात जावे आणि अनवाणी पायांनी घरी परतावे. असे मानले जाते की शनिदोषांपासून मुक्ती मिळते. तसेच मागे वळून पाहू नका. दुसरीकडे मंदिरावर काळा कुत्रा असल्यास त्याला रस्क देखील खाऊ घालू शकता. यामुळे तुमचे शनी, राहू-केतू हे तिन्ही ग्रह सकारात्मक राहतील.

आणखी वाचा : शनी जयंतीला बनतोय सर्वार्थ सिद्धी योग, या उपायांनी शनिदेवाला करा प्रसन्न, संकटांपासून सुटका मिळेल

अशा प्रकारे करा पिंपळाच्या झाडाची पूजा:
सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. शनिदेवाला आशीर्वाद देण्यासाठी आणि प्रसन्न करण्यासाठी शनी जयंतीच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला मोहरीच्या तेलात लोखंडी खिळा अर्पण करा. पिंपळाच्या झाडाभोवती कच्चा सूत ७ वेळा गुंडाळा आणि शनी मंत्राचा जप केल्याने शनिदेव आशीर्वाद देतात. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच झाडाखाली शनी चालिसाचे पठण करावे. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन सर्व संकटांपासून मुक्त होतात.

आणखी वाचा : Shani Jayanti 2022: ३० वर्षांनंतर होणार शनी जयंतीला विशेष योगायोग, साडेसातीपासून मुक्ती मिळवण्यासाठी करा हे उपाय

या मंत्रांचा जप करा:
शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या मंत्रांचा जप : ओम ॐ प्रं ॐ ॐ शनिश्चराय नमः आणि ॐ शनिश्चराय नमः १०८ वेळा करा. असे केल्याने शनिदेवाच्या वाईट प्रभावापासून मुक्ती मिळते. तसेच सर्व कामे होतात.

या उपायाने शनिदेव प्रसन्न होतात.
शनी जयंतीच्या दिवशी पितळेच्या भांड्यात मोहरीचे तेल भरून त्यात तुमचा चेहरा पहा आणि मंदिरातील ब्राह्मण किंवा गरजूला द्या. असे केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देतात. यासोबतच शनिदोषापासूनही मुक्ती मिळते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani jayanti 2022 significance shubh yog pujan vidhi shubh muhurt and remedy prp 9