Shani Jayanti 2023: दरवर्षी शनी जयंती जेष्ठ महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. शास्त्रानुसार या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला होता असे मानले जाते. सूर्य व छाया यांच्या पुत्राचा म्हणजेच शनिदेवाची जयंती यंदा १९ मे ला शनी जयंती साजरी होणार आहे. ज्योतिष अभ्यासक व पंचांगानुसार शनी जयंती १८ मे २०२३ ला रात्री ९ वाजून ४२ मिनिटांनी सुरु होणार आहे. तर १९ मे ला रात्री ०९ वाजून २२ मिनिटांपर्यंत शनी जयंती तिथी कायम असणार आहे. यंदाची शनी जयंती खास असण्यामागे अनेक कारणे आहेत जसे की, यावेळी तब्बल ३० वर्षांनी शनिदेव स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत स्थिर आहेत.

वैदिक पंचांगाच्या माहितीनुसार, १७ जानेवारी २०२३ मध्ये तूळ व मिथुन राशींना साडेसातीतून मुक्ती मिळाली आहे, तसेच धनु राशीतही शनिचा प्रभाव कमी होऊन साडेसाती संपुष्टात आली आहे. शनीच्या साडेसातीचा प्रभाव मकर, कुंभ व मीन राशीवर सुरु झाला असला तरी या राशी शनीच्या प्रिय राशी मानल्या जातात त्यामुळे त्यांना साडेसातीतही लाभाचे संकेत आहेत. दरम्यान, शनी जयंती पर्यंत कुंभ राशीतील शनिदेव काही राशींना प्रचंड धनलाभ मिळवून देऊ शकतात. या राशी कोणत्या जाणून घेऊया…

कर्क रास (Karka Rashi)

२०२३ या वर्षात शनीच्या प्रभावाने कर्क रास बक्कळ धनलाभ व प्रगती मिळवण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला काही प्रमाणात साडेसातीचा प्रभाव जाणवू शकतो. लाभ स्थानातील स्वगृहीचा शुक्र आर्थिक लाभ करून देईल. दशमातील उच्चीचा रवी अधिकारपद भूषवेल. त्याच्यासह राहू हर्षल असल्याने स्पर्धेला सामोरे जावे लागेल. विद्यार्थ्यांना आपल्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळेल. जोडीदाराची मनस्थिती समजून घ्यावी. २१ एप्रिलला* गुरू आपल्या दशमातील मेष राशीत प्रवेश करेल. महत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडाल. मुलांच्या समस्या सोडवताना भावनिक दृष्टिकोन बाजूला ठेवून विवेकी विचार करावा. हे मुलांच्याही फायद्याचे ठरेल.

मिथुन रास (Mithun Rashi)

मिथुन राशीची २०२३ च्या सुरुवातीलाच शनीच्या साडेसातीतून मुक्ती झाली आहे. शिवाय आता शनी तुमच्या राशीत पॉवरफुल असल्याने प्रगतीचा मार्ग खुला होऊ शकतो. प्रलंबित कामे व नोकरीच्या समस्या कमी झाल्याने आयुष्यात आनंद व समृद्धीचे वातावरण निर्माण होण्याची चिन्हे आहेत. मुख्यतः प्रॉपर्टीच्या बाबत जर तुमचे काही काम अडून असेल तर ते मार्गी लागण्यात शनिचे स्थान मदत करू शकेल. जर आपण नवीन नोकरी शोधत असाल तर प्रगतीची संधी आहे, तुमच्या व्यापारात धनलाभाचे संकेत शनि घेऊन येणार आहे.

तूळ रास (Libra Rashi)

भाग्य स्थानातील मंगळ आर्थिक गणिते पुन्हा स्थिर स्थावर करेल. नव्या संकल्पना यशस्वी होतील. नोकरी व्यवसायातील प्रकल्प मार्गी लागतील. २१ एप्रिलला होणारा गुरूचा मेष राशीतील प्रवेश लाभकारक ठरेल. जोडीदारासह मिळते जुळते घेण्यासाठी ज्येष्ठ मंडळी मध्यस्थी करतील. विद्यार्थी वर्गाने घेतलेल्या जीवापाड मेहनतीचे चीज होईल. हिमतीने पुढे जाल. डोळे आणि डोकं यांचे आरोग्य सांभाळावे. गुंतवणूकदारांनी फसव्या तेजीला भुलू नये.

हे ही वाचा<< अखंड साम्राज्य राजयोग बनल्याने ‘या’ राशी होतील करोडपती? अक्षय्य तृतीयेपासून वर्षभर बक्कळ धनलाभाची संधी

शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवाच्या मंत्रांचा जप : ओम ॐ प्रं ॐ ॐ शनिश्चराय नमः आणि ॐ शनिश्चराय नमः या मंत्रांच्या जपाला भाविकांमध्ये विशेष महत्त्व दिले जाते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader