Shani Jayanti 2023: आर्थिक स्थिती, मानसिकता, वैवाहिक सुख, गुन्हेगारी, शिक्षा, अपंगत्व या साऱ्या गोष्टी शनी ग्रहावरून ओळखता येतात. शनी जर पत्रिकेत सुस्थितीत असेल तर पैसा, वैवाहिक सौख्य, सुख- समाधान उत्तम प्राप्त होते. त्यामुळे कुंडलीशास्त्रात शनी ग्रहाला खूप महत्व प्राप्त झाले आहे. कलियुगातील न्यायाधिकारी शनीदेव यांची यंदा १९ मेला जयंती आहे. येत्या शनी जयंतीला तब्बल ३० वर्षांनी काही शुभ योग तयार होत आहे यामुळे या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार सध्याची ग्रहस्थिती पाहता शनी जयंतीपर्यंत लक्ष्मी नारायण राजयोग तसेच हंस, पंचग्रह व गजकेसरी राजयोग कायम राहू शकतो. प्रभावी काही राशींना येत्या काळात प्रचंड धनलाभ व यश मिळू शकते. या भाग्यवान राशी तसेच यंदाच्या शनी जयंतीची तिथी, शुभ मुहूर्त काय आहे हे पाहूया..
शनि जयंती शुभ मुहूर्त (Shani Jayanti Shubh Muhurta)
शनी जयंती तिथी प्रारंभ: १८ मे २०२३ रात्री ९ वाजून ४३ मिनिटे
शनी जयंती तिथी समाप्ती: १९ मे २०२३ रात्री ९ वाजून २३ मिनिट
उदयतिथीनुसार शनी जयंती ही १९ मेला साजरी केली जाणार आहे.
शनी जयंती शुभ मंत्र
‘निलाज्नन समामासं रवि पुत्रम् यमाग्रजम छाया मार्तण्ड सम्भूतं तं नमामि शनैश्चरम्’
शनी जयंतीपासून ‘या’ राशींना बक्कळ धनलाभ?
मिथून (Gemini Zodiac)
आपल्या नवम स्थानात कुंभेचा शनी आपल्या भाग्य स्थानात आहे. हा शनीमुळे उद्योगधंद्यात, नोकरीत आपल्या विचारांचे व सल्ल्याचे स्वागत होईल. धर्मादाय कामात सार्वजनिक कामात आपला सहभाग मोलाचा ठरेल. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. वर्षभर कार्यमग्न रहाल. राजकारणात वा सामाजिक कामात कायद्याची कक्षा जरुर पाळावी. शारिरीक ताकदीपेक्षामनाचे बळ खूप मोठे असते. अशावेळी आपली खरी मानसिकता आपल्या जिभेवर घोळत असते. त्यामुळे विचारपूर्वक बोलणे हिताचे ठरेल.
सिंह (Leo Zodiac)
सिंह राशीला शनी सप्तम स्थानातून जात आहे. उद्योगधंद्यात भागीदारी, कौटुंबिक सौख्यात अडचणी येतील. पण कुंभेतील स्वगृहीच्या शनीमुळे यातून उत्तम बचाव होईल. मुख्य म्हणजे एप्रिलनंतर होणारा गुरू सहवास खूप मदतीचा ठरेल. या काळात स्वमनाशी होणारा संवाद कठीण समस्याचे रुप साधे सोपे करील. आरोग्य सांभाळा पोटाचे विकार आजार यासाठी पथ्य पाणी आवश्यक ठरेल. क्रोध, अति विचार गैरसमज यापासून कटाक्षाने दूर रहा. विशेष म्हणजे शुक्र बुधाचे विशेष कृपा छत्र लाभेल त्यातून समस्या दूर होतील.
धनु (Sagittarius Zodiac)
कुंभ राशीचा शनी धनु राशीच्या पराक्रमात (तृतीयस्थानात) जात आहे आणि त्याच बरोबर धनु राशीची साडेसाती संपते ही एक लक्षणीय बाब आहे हा शनी स्वराशीत शुभदायक आला आहे. त्यामुळे नोकरी उद्योगधंद्यात नवीन संधी चालून येतील. प्रवासाचे योग येतील. आर्थिक बाबतीतली उलाढाल समाधानकारक घडेल. जुन्या समस्या संपुष्टात येतील. एकूण खूप दिवसांनी आलेला हा सुखद काळ आनंद देईल. पण मात्र या सर्वात कुठेही भावनेचा अतिरेक टाळा. भरवसा अतिविश्वास ठेवू नका. स्वत: सक्रीय रहा. व स्वत:वर नियंत्रण ठेवा.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)