Shani Jayanti 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनि देवाला न्याय देवता आणि कर्मफळ दाता सुद्धा म्हटले जाते. शनि देव व्यक्तीला कर्मानुसार फळ प्रदान करतात. जेव्हा शनि त्याची चाल बदलतो, तेव्हा काही राशींवर शनिची साडेसाती आणि दुष्परिणाम दिसून येतात. त्या लोकांना आयुष्यात समस्यांचा सामना करावा लागतो. शनिदोषचा सामना करत असलेले लो शनि जयंतीच्या दिवशी शनिची पूजा करतात. तुम्हाला माहिती आहे का, शनि जयंती कधी आहे? आज आपण शुभ मुहूर्त आणि तिथिविषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत. (Shani Jayanti 2024 Date Auspicious Timings tithi muhurta and shani mantras)
शनि जयंती कधी आहे?
शनि जयंतीची सर्व जण आतुरतेने वाट पाहतात. यंदा शनि जयंती ही ६ जून रोजी साजरी केली जाणार.
शनि जयंती तिथि आणि शुभ मुहूर्त
वैदिक पंचागनुसार ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्या तिथीची सुरूवात ५ जून २०२४ ला सायंकाळी ७ वाजून ५३ मिनिटांनी होणार आणि अमावस्या तिथी ६ जून सायंकाळी ६ वाजून ६ मिनिटांनी समाप्त होणार. त्यामुळे शनि जयंती ही ६ जूनला साजरी केली जाणार आहे.
हेही वाचा : पैसाच पैसा! गुरू ग्रहाच्या कृपेने ६ जूनपासून या चार राशींच्या लोकांना मिळणार सुख, समृद्धी अन् संपत्ती
शनि जयंतीचे महत्त्व
शनि जयंतीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्यपुत्र शनिदेवाचा जन्म झाला होता, त्यामुळे या शनि जयंती साजरी केली जाते. शनी जयंती काही लोकांसाठई अतिशय भाग्यशाली आणि फायदेशीर ठरणार ठरू शकते. शनिदेवाची आपल्यावर कृपा राहावी यासाठी शनि मंत्राचा जप तुम्ही करू शकता. आपण शनि मंत्रांविषयी जाणून घेणार आहोत.
१. ॐ प्राँ प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः ॥
या मंत्राचा जप केल्यामुळे जीवनातील अनिश्चिततेवर तुम्ही मात करता येऊ शकता, अशक्य गोष्ट शक्य करू शकता.
२. ॐ शं शनैश्चराय नमः ||
या मंत्राचा जप केल्यामुळे तुम्हाला शांतता मिळू शकते आणि तुम्ही आध्यात्माच्या मार्गावर जाऊ शकता.
३. ॐ प्राँ प्रीं प्रौं सः शनैश्चराय नमः ॥
या मंत्राचा जप केल्यामुळे तुम्ही अनिश्चिततेवर मात करता येऊ शकता. कठीण वाटणाऱ्या गोष्टी सोपी होतील.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)