Shani Nakshtra Transit in 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मदेवता म्हणून ओळखले जाते. शनी आपल्या परिक्रमेत जेव्हा राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव राशीचक्रातील १२ राशींवर कमी- अधिक, शुभ- अशुभ स्वरूपात होत असतो. काहींना शनीच्या दृष्टीने प्रचंड लाभ अनुभवता येतो तर काहींना मात्र कष्टाचे डोंगर पेलून वाटचाल करावी लागते. अशातच जेव्हा शनीची आपल्या मित्र राशींसह म्हणजेच शुक्र, बुध , राहू- केतू यांच्यासह युती होते तेव्हा त्यातून दुप्पटीने लाभ होऊ शकतो. आज आपण २०२४ या येत्या वर्षातील शनीच्या महत्त्वपूर्ण हालचालींविषयीचे अंदाज पाहणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार २४ नोव्हेंबरला मित्र ग्रह राहूच्या शतभिषा नक्षत्रात प्रवेश घेतलेला शनी २०२४ मध्ये सुद्द्धा महत्त्वाचे नक्षत्र गोचर करणार आहे. एप्रिल महिन्यात शनीचे हे गोचर होणार असून तेव्हा शनी पूर्वा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश घेतील. शनीदेव जेव्हा नव्या ग्रहाच्या नक्षत्रात प्रवेश घेतील तेव्हा काही राशींचे भाग्य शंभर नंबरी सोन्यासारखे चमकणार आहे. यातील तीन महत्त्वपूर्ण व सर्वात लाभस्थानी असलेल्या राशी कोणत्या हे पाहूया..

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

शनी देवाच्या नक्षत्र गोचराचा थेट प्रभाव मेष राशीवर पडणार आहे. विशेष म्हणजे या कालावधीत तुम्हाला अत्यंत लाभदायक स्थिती अनुभवता येऊ शकते. नक्षत्राचा शुभ लाभ आपल्या आयुष्यात सुखाची नांदी घडवेल. शनीचं प्रभावाने विविध आर्थिक स्रोत बळावतील. आपल्याला मिळणाऱ्या आशीर्वादांचे मोल जाणा, कारण तुम्हाला वरिष्ठांच्या रूपातच अत्यंत मोठा धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. या काळात तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ घडवेल अशी महत्त्वपूर्ण घटना घडू शकते.

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वृषभ राशींच्या लोकांसाठी शनिदेवाचे नक्षत्र गोचर चांगले ठरु शकते. जर या राशीतील लोकांना परदेशात नोकरी किंवा शिक्षण घ्यायचे असेल तर तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. या काळात व्यवसायाशी संबंधित लोक चांगली कामगिरी करु शकतील. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता असून समाजात सन्मान देखील वाढू शकतो. नशिबाने साथ दिल्याने रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात आणि सरकारी योजनांचाही चांगला फायदा होऊ शकतो.

हे ही वाचा<< २०२४ वर सूर्य व शनीचा दांडगा प्रभाव! तुमच्या जन्मतारखेनुसार नाती, शिक्षण व धनाच्या फायद्या-तोट्याची गणितं, पाहा

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

सिंह राशीच्या मंडळींना शनी जयंतीपर्यंत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळू शकते. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार होऊ शकतो. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य मिळू शकते ज्यामुळे प्रचंड मोठे संकट दूर होईल. कोट्याधीश बनवणारी एखादी घटना घडू शकते. नव्या नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती सुधारु शकते. समाजातील तुमची प्रतिष्ठा वाढू शकते. कौटुंबिक सुख-शांती कायम राहू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)