Shani Jayanti 2024: शनिदेवाला न्यायाचा देवता मानले जाते. शनिदेव कर्मांच्या आधारावर फळ देतात. शनिला सूर्यदेवाचा पुत्र म्हटलं जातं. शनिजयंती वैशाख अमावस्येला साजरी केली जाते. शनि जयंती वर्षातून दोनदा साजरी केली जाते. शनि जयंती आज बुधवारी, ८ मे २०२४ रोजी वैशाख महिन्यात साजरी केली जात आहे. शनि जयंतीच्या दिवशी रविपुत्राची पूजा करण्याची परंपरा आहे. यंदा शनि जयंतीचा दिवस खास ठरणार आहे. कारण आज शनि जयंतीच्या दिवशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुभ योग जुळून आला आहे. सर्वार्थ सिद्धी योग आज बनतोय. तसेच, शनी सध्या आपल्या मूळ कुंभ राशीत स्थित आहे त्यामुळे आजचा दिवस अनेक राशींच्या लोकांसाठी लाभदायक ठरू शकतो. काही राशींच्या आयुष्यात अनेक बदल घडून येण्याची चिन्हे आहेत. यंदाची शनी जयंती नेमक्या कोणत्या राशीला लाभदायक सिद्ध होऊ शकते हे पाहूया..
‘या’ राशींवर शनिदेवाची कृपा?
मेष राशी
मेष राशींच्या लोकांवर शनिदेवाची विशेष कृपा राहण्याची शक्यता आहे. तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. या काळात तुमच्या संपत्तीत अनेक पटींनी वाढ होण्याची शक्यता आहे. जे नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत त्यांनाही फायदा होऊ शकतो. तुमचं आरोग्यही चांगलं राहण्याची शक्यता आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. नोकरीत प्रगती होऊ शकते. पदोन्नती होऊन मोठं पद मिळू शकतं. तुम्ही पैशाची चांगली बचत करू शकाल.
मिथुन राशी
शनिदेवाच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांसाठी धनलाभाचे जोरदार योग आहेत. नवीन घर किंवा जमीन खरेदी करु शकाल. मेहनतीचे पूर्ण फळ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायाशी संबंधित लोकांची आर्थिक स्थिती सुधारू शकते. व्यवसायात नफा कमावण्यासाठी चांगली संधी मिळू शकेल. तुमची कमाई वाढवण्यासाठी तुम्हाला नवीन स्रोत सापडू शकतात. जीवनातील सुख-शांतीमुळे घरातील वातावरण देखील प्रसन्न राहण्याची शक्यता आहे. या काळात एखाद्या छोट्या सहलीलाही जाण्याची शक्यता आहे.
कुंभ राशी
शनिदेवाच्या कृपेने कुंभ राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. तुम्हाला व्यवसायात मोठ्या यशासह आर्थिक लाभही मिळू शकतो. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रगती होऊ शकते. नोकरीत असलेल्यांना पदोन्नती आणि पगारवाढीचा लाभ मिळू शकतो. यासह व्यवसायातही मोठा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक स्थिती सुधारू शकते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)