Shani jayanti 2023: कलियुगातील न्यायाधिकारी शनिदेवाची यंदाची जयंती १९ मे २०२३ ला जुळून आली आहे. योगायोगाने हा दिवस अत्यंत शुभ व लाभदायक असल्याचे वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासक सांगतात. याच दिवशी तब्ब्ल पाच मोठे राजयोग जुळून आले आहेत. लक्ष्मी नारायण राजयोग, बुधादित्य राजयोग यामुळे येत्या काळात काही राशींच्या आयुष्यात अनेक बदल घडून येण्याची चिन्हे आहेत. यंदाची शनी जयंती नेमक्या कोणत्या राशीला लाभदायक सिद्ध होऊ शकते हे पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

शनी जयंतीपासून ‘या’ राशी होतील मालामाल?

वृषभ रास (Taurus Zodiac)

वृषभ राशीचे स्वामी शुक्रदेव आहे. शुक्र व शनी यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. यामुळेच शनिदेव हे वृषभ राशीवर नेहमीच मेहेरबान असल्याचे मानलेजाते . शनी जयंती ही वृषभ राशीला अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकते. विशेषतः मानसिक सौख्य लाभल्याने तुम्हाला आयुष्यात प्रगती करण्यास मदत होऊ शकते. येत्या काळात आपल्याला समाजात मान- सन्मान प्राप्त होऊ शकतो. तसेच आनंददायी हसा हा काळ ठरू शकतो.

तूळ रास (Libra Zodiac)

तूळ राशीचे स्वामी सुद्धा शुक्रदेव आहेत. या राशीत शनिदेव उच्च स्थानी आहेत. परिणामी तुम्हाला मेहनतीचे व कष्टाचे दुप्पट फळ मिळण्याचा असा हा कालावधी ठरू शकतो. शनिदेवाच्या कृपेने आपण इतके समृद्ध होऊ शकता की आपल्या माध्यमातून गरजूंना मदत होण्याची चिन्हे आहेत. या काळात शनिदेव लक्ष्मीच्या कृपेसह तुमच्या कुंडलीत विराजमान होणार आहेत.

कर्क रास (Cancer Zodiac)

कर्क राशीच्या मंडळींवर सुद्धा शनिदेव मेहेरबान राहू शकतात. या काळात तुम्हाला आई वडिलांचा पाठिंबा व साथ लाभल्याने खूप महत्त्वाची कामे पार पाडता येऊ शकतात. करिअरमध्ये प्रगतीचा असा हा कालावधी असणार आहे. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून धनलाभाचे योग आहेत. तुमच्या कुटुंबात एखादा नवा पाहुणा येण्याची सुद्धा चिन्हे आहेत.

कुंभ रास (Aquarius Zodiac)

कुंभ ही स्वतः शनीच्या स्वामित्वाची रास असल्याने कुंभ राशीत शनिदेवाची कृपा कायम अनुभवता येऊ शकते. यंदा ३० वर्षांनी पहिल्यांदाच शनीदेव जयंतीला आपल्या स्व- राशीत असणार आहेत. यामुळे तुमच्या कुंडलीत साडेसाती सुरु असतानाही प्रचंड धनलाभ होण्याचा योग आहेत. तुम्हाला तुमच्या प्रेमाचा माणूस सापडू शकतो.

हे ही वाचा<<शनीच्या केंद्र त्रिकोण राजयोगात लक्ष्मीचे बळ वाढून ‘या’ राशी होतील मालामाल? सहा महिने प्रचंड पैसा कमावू शकता

मकर रास (Capricorn Zodiac)

शनी हे मकर राशीचे सुद्धा स्वामी आहेत, या राशीवर शनिदेवाची प्रेमळ दृष्टी असल्याने तुम्हाला येत्या काळात लाभ मिळवता येऊ शकतो. मकर राशीला एखाद्या ठिकाणी नेतृत्वाची संधी मिळू शकते. या संधीचे सोने करण्यासाठी आपल्याला व्यक्तिमत्वात सुधारणा करण्यावर विशेष भर द्यावा लागेल. तुमचे संवाद कौशल्य सुधारल्यास तुम्हाला प्रचंड धनलाभ मिळू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)