June 2024 Marathi Monthly Horoscope: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्यात ग्रहांचे मोठे बदल अपेक्षित आहेत. तसेच काही नक्षत्र सुद्धा या महिन्यात जागृत होऊ शकतात. यामुळे १२ राशींवर नक्कीच कमी-अधिक, शुभ- अशुभ स्वरूपात प्रभाव दिसून येऊ शकतो. महिन्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जून ला मंगळ ग्रह मेष राशीत गोचर करणार आहे. तर १२ दिवसांनी शुक्र मिथुन राशीत प्रवेश घेणार आहे. १४ जूनला बुध ग्रह मिथुन राशीत गोचर करून स्थिर होतील तर १५ जूनला स्वतः ग्रहांचे महाराज सूर्य मिथुन राशीत येणार आहेत. ३० जून पासून शनीच्या बहुप्रतीक्षित वक्री चालीचा आरंभ होईल. तर जूनच्या पहिल्याच आठवड्यात म्हणजे ६ जूनला शनी जयंती असणार आहे. थोडक्यात जून महिन्यावर शनी महाराजांचे प्रभुत्व असेल असे म्हणायला हरकत नाही. याशिवाय अन्य ग्रहांच्या गोचरासह तुमच्या राशीवर नेमका काय व कसा प्रभाव होऊ शकतो हे आता आपण पाहणार आहोत. प्रसिद्ध ज्योतिषतज्ज्ञ सोनल चितळे यांनी सांगितलेली मेष ते मीन राशींचे जून महिन्याचे राशी भविष्य वाचा.

१ ते ३० जून मराठी राशी भविष्य

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

१ जूनला आपला राशीस्वामी मंगळ आपल्या राशीत प्रवेश करेल. प्रचंड बळ आणि उत्साह देईल. हर्षलही १ जूनला वृषभ राशीत प्रवेश करेल. शब्द जपून वापरावेत असा इशारा देणारा हा ग्रहबदल आहे, हे कायम ध्यानात असू द्या. मंगळावर शनीची दृष्टी असल्याने स्वतःवर ताबा ठेवणे शक्य होईल. विद्यार्थी वर्गाला बाहेरगावी किंवा परदेशी शिक्षणाची कवाडे उघडी होतील. संधीचे सोने कराल. नोकरी व्यवसायाला रवी आणि शनीची जोड मिळाल्याने कामकाजात गती येईल. आत्मविश्वास वाढेल. इतरांना योग्य मार्गदर्शन कराल. हवेतील प्रदूषणामुळे फुप्फुसाचे आरोग्य बिघडेल. वैवाहिक जीवन सुखकर होईल.

Sun God has entered the sign of Venus
सूर्य देवाने शुक्रच्या राशीमध्ये केला प्रवेश! ‘या’ ३ राशींच्या लोकांना मिळणार अपार धन और पद-प्रतिष्ठा
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Budh Gochar 2024
५ वर्षांनंतर धनत्रयोदशीला निर्माण होईल लक्ष्मी नारायण राजयोग! ‘सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार
A day in the life of Samantha Ruth Prabhu
“रात्री ९.३० वाजता ध्यान करते अन् १० वाजता झोपते”, समंथा रुथ प्रभुच्या दिनचर्येबाबत काय म्हणाले तज्ज्ञ?
Surya transit in tula rashi
सूर्य देणार नुसता पैसा; राशीपरिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यात येणार मानसन्मान अन् पैसा
6th october rashi bhavishya panchang in marathi
६ ऑक्टोबर पंचांग : अश्विन महिन्यातील विनायक चतुर्थी अन् देवी कुष्मांडाचा दिवस; आज १२ पैकी ‘या’ राशींवर होईल धन-संपत्तीचा वर्षाव
Shardiya Navratri 2024
Shardiya Navratri 2024 : नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ‘या’ गंभीर चुका टाळा अन् देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी ‘या’ गोष्टी करा
gold price hike in during Navratri festival
ऐन नवरात्राच्या तोंडावर सोन्याच्या दरात बदल… आता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्रॅम…

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

१ जूनला मंगळ व्ययस्थानातील मेष राशीत प्रवेश करेल तर हर्षल मेषेतून वृषभ राशीत प्रवेश करेल. महिन्याचा उत्तरार्ध अधिक उत्कर्षकारक ठरेल. घाईगडबडीत कोणालाही कोणतेही आश्वासन देऊ नका. अनावश्यक खर्च टाळणे अत्यंत गरजेचे आहे. शुक्र ,बुधाच्या सहकार्याने आर्थिकदृष्टय़ा लाभ हो ण्याच्या शक्यता आहेत. फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा सोबत व्यवहार ज्ञान असणे किती गरजेचे आहे याची प्रचिती येईल. विद्यार्थ्यांना नव्या संधी खुणावतील. प्रगती कराल. नोकरी व्यवसायात महत्वाचे निर्णय योग्य पद्धतीने घ्याल. विवाहोत्सुक मंडळींना मनपसंत जोडीदार मिळण्यास पूरक ग्रहमान आहे. विवाहीत दाम्पत्यांनी भविष्यासाठी पैसे साठवणे , गुंतवणे गरजेचे ठरेल.

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

१ जूनला मेष राशीतील हर्षल वृषभेत प्रवेश करेल. चटकन उलगडा होणार न होणाऱ्या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. १ जूनला लाभ स्थानात मंगळ प्रवेश करेल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. १४ जूनला रवी आणि बुधाचा मिथुन राशीत प्रवेश झाल्याने महिन्याचा उत्तरार्ध समाधानकारक असेल. मेहनत घेण्याची आणि युक्तिवाद लढवण्याची उमेद वाढेल. विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासूनच जोर लावणे आवश्यक आहे. नोकरी व्यवसायात कामाचे स्वरूप वा कामाचे ठिकाण बदलण्याचा संभव आहे. थोडीफार तडजोड करण्याची तयारी दाखल्यास आपल्याच हिताचे ठरेल. तरुणाईमध्ये प्रेमसंबंध बहरतील. स्वतःच्या जबाबदारीवर गुंतवणूकीची जोखीम पत्करावी लागेल. आरोग्य चांगले राहील.

कर्क रास (Cancer Rashi Bhavishya)

१ जूनला मंगळ दशमातील मेष राशीत प्रवेश करेल. तर याच दिवशी हर्षल मेषेतून वृषभेत लाभ स्थानात प्रवेश करेल. नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने हा मंगळ विशेष फळ देईल. हिमतीने सभा गाजवाल. उत्तम सादरीकरण कराल. खोचक प्रश्नांना सडेतोड उत्तरे द्याल. मित्रपरिवाराला मदत कराल. विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासून अभ्यासात मन एकाग्र करावे. खेळ, कला यातही प्राविण्य मिळवाल. विवाहित मंडळींनी अतिरिक्त खर्च प्रयत्नपूर्वक टाळावा. विवाहोत्सुक मुलामुलींनी वधुवर संशोधन करत राहावे. मनाजोगता जोडीदार मिळण्यात यश मिळेल. परदेशासंबंधित कामे मार्गी लागतील. परदेशी जाण्याची संधी देखील मिळेल. वायू प्रदूषणामुळे घसा आणि फुप्फुसे यांचे आरोग्य सांभाळावे.

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

१ जूनला हर्षल दशमातील वृषभ राशीत प्रवेश करेल आणि मंगळ भाग्य स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल. तसेच बुध आणि शुक्राच्या साहाय्याने महत्वाचे निर्णय घेताना योग्य पध्दतीने विचार विनिमय कराल. विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासून अभ्यासात रस घ्यावा. नवे विषय चटकन आत्मसात कराल. तंत्रज्ञानाचा खूप चांगला उपयोग होईल. नोकरी व्यवसायात गुरूच्या साथीने मोठे प्रश्न आणि समस्या सोडवाल. वरिष्ठांकडून आपल्या कामाची दखल घेतली जाईल. विवाहोत्सुक मंडळींनी प्रयत्न सुरू ठेवावेत. विवाहितांना जोडीदाराच्या समंजसपणाची साक्ष पटेल. गुंतवणूकदारांना भरपूर आर्थिक लाभ होईल. अतिहव्यास टाळावा. नियमित व्यायामाचे तंत्र सांभाळल्यास आरोग्य चांगले राहील.

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

१ जूनला मंगळ अष्टमातील मेष राशीत प्रवेश करेल. उष्माघात , फोड पुटकुळ्या यांचा त्रास सतावेल. तसेच पोटाचे विकार बळावतील. १ जूनला हर्षल वृषभ राशीत म्हणजेच आपल्या भाग्य स्थानात प्रवेश करेल. बुध, शुक्र याच्या सहयोगाने महत्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घ्याल. याचा पुढील काळात खूप चांगला उपयोग होईल. विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणाच्या नव्या वाटा खुल्या होतील. कष्टाचे चीज होईल. नोकरी व्ययसायात बुध, शुक्राच्या साथीने आर्थिक परिस्थिती उंचावेल. बदतीचे वारे वाहतील. नव्या जबाबदाऱ्या पेलाल. विवाहोत्सुक मुलामुलींनी वधुवर संशोधन कार्यात विशेष रस घ्यावा. विवाहित दाम्पत्यांनी एकमेकांच्या साहाय्याने वैयक्तिक उत्कर्ष साधावा. हवेतील प्रदूषणामुळे श्वासनास त्रास होईल.

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

१ जूनला मंगळ सप्तमातील मेष राशीत प्रवेश करेल. धैर्य वाढेल, अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासातील महत्वाचे टप्पे पार करताना विशेष लक्ष केंद्रित करावे लागेल. १ जूनला हर्षल अष्टमातील वृषभ राशीत प्रवेश करेल, चालू कामात अडथळे येतील. नोकरी व्यवसायातील असे अडथळे दूर करता करता दमछाक होईल. पण टक्कर देण्याची हिंमत मंगळाकडून मिळेल. विवाहोत्सुक मंडळींनी घाईघाईने निर्णय घेऊ नये. सबुरीने घ्यावे. विवाहित मंडळींनी जोडीदारासह थोडे जुळवून घ्यावे. शब्दाने शब्द वाढवण्यात हशील नाही. गुंतवणूकदारांच्या मदतीला भाग्यातील बुध आणि शुक्र असल्याने तोटा होण्यापासून बचाव होईल. एकंदरीत तणावपूर्ण वातावरणाचा तब्येतीवर परिणाम दिसेल.

वृश्चिक रास (Scorpio Rashi Bhavishya)

१ जूनला हर्षल सप्तम स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. तर त्याच दिवशी मंगळ षष्ठ स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल. दोन्ही ग्रह बलाढ्य आणि मोठे ऊर्जा स्रोत आहेत. आपल्याला भरपूर ऊर्जा देतील. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल. मोठी चळवळ सुरू कराल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासातील तंत्रज्ञानाचे आकलन चटकन होईल. भाषा, परदेशी भाषा यांच्या अभ्यासात मन रमेल. नोकरी व्यवसायात आपण स्वतः पुढाकार घेऊन काही महत्वाच्या मुद्द्यांना वाचा फोडावी. निर्णय प्रगतिकाराक ठरेल. विवाहोत्सुक मुलामुलींच्या संशोधन कार्यास यश येईल. विवाहित मंडळींनी नाते जोपासावे, खुलवावे. एकमेकांवरील विश्वास दृढ करावा. गुंतवणूकदारांनी मोठी मजल मारू नये. उष्माघात, ताप, सर्दी यांचा त्रास सहन करावा लागेल.

धनु रास (Sagittarius Rashi Bhavishya)

१ जूनला मंगळ आणि हर्षल यांचे राशी बदल होतील. मंगळ पंचम स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल. हर्षल षष्ठ स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. आपल्या म्हणण्याला, मुद्द्याला आणखी जोर येईल. इतरांवर छाप पाडाल. विद्यार्थी वर्गाने शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच शिस्त अंगी बाणवावी. आवडीच्या अभ्यासक्रमात विशेष प्रगती कराल. शैक्षणिक संस्थांचे पाठबळ मिळेल. नोकरी व्यवसायातील आपले निर्णय जास्तीत जास्त लाभदायक ठरतील. वरिष्ठांकडून याची चांगली पोचपावती मिळेल. विवाहित दाम्पत्यांच्या सहजीवनाचे सूर जुळतील. एकमेकांच्या सगळ्या गोष्टी पटल्या नाहीत तरी जुळवून घेणे महत्त्वाचे असते. उत्सर्जन संस्थेवर अतिरिक्त ताण येईल. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

१ जून रोजी हर्षल पंचम स्थानातील वृषभेत प्रवेश करेल. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या शिक्षणासाठी चालना देणारा असा हा राशीबदल असेल. १ मे रोजी मंगळ चतुर्थातील मेष राशीत प्रवेश करेल. जमीनजुमला, मालमत्ता, प्रॉपर्टी या बाबतच्या गोष्टींना पुष्टी मिळेल. खरेदी विक्रीच्या दृष्टीने नव्या संधी उपलब्ध होतील. विद्यार्थी वर्गाने घेतलेले कष्ट फळास येतील. मनाजोगता अभ्यासक्रम शिकण्यासाठी प्रवेश मिळेल. नोकरी व्यवसायात स्वतःच्या हिमतीच्या जोरावर अडथळे पार करत यशाचे झेंडे फडकवाल. हार मानणाऱ्यातील आपण नव्हेच! कठोर परिश्रम आपल्या रक्तातच भिनलेले आहेत. विवाहोत्सुक मंडळींना सुयोग्य जोडीदार मिळेल.

कुंभ रास (Aquarius Rashi Bhavishya)

१ जून रोजी हर्षल चतुर्थातील वृषभ राशीत प्रवेश करेल. तसेच मंगळ तृतीय स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल. हिंमत आणि आत्मविश्वास यांच्या बळावर अनेक कामे यशस्वीपणे पूर्ण कराल. साडेसातीमुळे विलंब झाला तरी चिकाटी टिकवून ठेवाल. विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासूनच कंबर कसून मेहनत घ्यावी. शनी कर्मकारक ग्रह असल्याने मेहनतीचे योग्य फळ देईल. नोकरी व्यवसायात आपले मत ठामपणे मांडाल. हितशत्रूंना दणदणीत शह द्याल. विवाहोत्सुक मंडळींना गुरूचा राशीबदल तितकासा अनुकूल नाही. त्यामुळे धीराने घ्यावे. विवाहित दाम्पत्यांचे सहजीवन विश्वासाच्या पायावर खुलेल, बहरेल. घर, मालमत्तेसंबंधी व्यवहार फलदायी ठरतील. ओटीपोटाचा त्रास वाढेल.

हे ही वाचा<< ६ जूनला शनी जयंतीपासून 5 राशींच्या नशिबाला मिळेल कलाटणी; पावसाआधी बरसणार धन व सुख, तुम्ही आहात का नशीबवान?

मीन रास (Pisces Rashi Bhavishya)

१ जूनला हर्षल तृतीयेतील वृषभ राशीत प्रवेश करेल. आपल्यातील धाडस वाढेल. नवे करार करताना नियम अटी, छुप्या गोष्टी यांचा बारकाईने अभ्यास करावा. विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक वर्षात नवा जोश येईल. अभ्यासातील शंका वेळच्या वेळी दूर कराव्यात. पालक, शिक्षक, मार्गदर्शक आपल्या पाठीशी उभे आहेत. नोकरी व्यवसायात जुन्या संबंधित व्यक्तींची गाठभेट होईल. भावी जीवनात याचा लाभ होईल. विवाहोत्सुक मंडळींना सुयोग्य जोडीदाराच्या निवडीसाठी ग्रहबल चांगले आहे. विवाहित दाम्पत्यांचे सहजीवन चांगले असेल. एकमेकांच्या साथीने महत्वाचे निर्णय घ्याल. घराच्या, मालमत्तेच्या कागदपत्रांची तपासणी करावी. कायदेशीर गोष्टी वेळेत पूर्ण कराव्यात. खांदे, दंड आणि छाती यांचे आरोग्य जपावे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)