Shadashtak Yog 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठराविक कालावधीनंतर नवग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातात. ग्रहांच्या राशीतील बदल आणि त्यांच्या चालीमध्ये होणारा बदल खूप महत्त्वाचा असतो. ग्रहांच्या बदलाचा १२ राशींवर तसेच संपूर्ण मानवी जीवनावर प्रभाव पडतो. ज्योतिषशास्त्रानुसार, केतू दर दीड महिन्याला आपली राशी बदलतो. २०२४ मध्ये केतू कन्या राशीत राहणार आहे आणि शनि कुंभ राशीत स्थित आहे. अशा स्थितीत शुभ योग निर्माण होत आहे. शनि आणि केतू मिळून ‘षडाष्टक योग’ तयार करत आहेत. ज्योतिष शास्त्रात हा अतिशय शुभ योग मानला जातो. त्याचा परिणाम व्यक्तीच्या करिअरवर फारसा दिसून येतो. यावेळी तुम्हाला चांगल्या नोकरीच्या ऑफर मिळू शकतात. जाणून घ्या या काळात कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो.

‘या’ राशींना होणार फायदा?

वृषभ राशी

ज्योतिष शास्त्रानुसार, शनि आणि केतू यांच्या संयोगाने तयार झालेला षडाष्टक योग वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकतो. या राशीच्या लोकांना या योगाचा विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. वृषभ राशीच्या लोकांसाठी २०२४ हे वर्ष खूप भाग्यवान ठरु शकते. यावेळी या लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. यावेळी तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली होण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या करिअरमध्ये मोठे यश मिळवू शकता. जीवनात तुम्हाला खूप सन्मान मिळण्याची शक्यता आहे.

Surya-Shukra Yuti 2025
‘या’ तीन राशीच्या व्यक्तींचे नशीब फळफळणार; सूर्य-शुक्राची युती नव्या वर्षात करणार मालामाल
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Mangal Margi 2025
२०२५ मध्ये नुसता पैसा; मंगळ होणार मार्गी ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार पैसा अन् मानसन्मान
Saphala Ekadashi 2024
वर्षातील शेवटच्या एकादशीच्या दिवशी ‘या’ चार राशींना होणार मोठा धन लाभ, माता लक्ष्मीच्या कृपेने मिळणार अपार पैसा
shani gochar 2024 shash rajyog in marathi
शनीचा शश राजयोग ‘या’ ४ राशींना देणार प्रचंड धनलाभ? मार्च २०२५ पर्यंत अपार श्रीमंतीसह अनुभवू शकतात अच्छे दिन
Surya Grahan 2025 And Shani Gochar
१०० वर्षांनंतर निर्माण होणार शनी गोचर आणि सुर्य ग्रहाचा संयोग! ‘या’ राशीच्या लोकांचा सुरु होईल सुवर्णकाळ, करिअर आणि व्यवसायात मिळेल यश
shukra vakri 2025
२०२५ मध्ये शनीसह हे चार ग्रह देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींचा सुरू होणार सुवर्ण काळ
Shani Gochar 2024
पुढील १०३ दिवस शनी देणार बक्कळ पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार धनसंपत्ती आणि प्रत्येक कामात यश

(हे ही वाचा:वर्षाच्या अखेरीस ‘गजकेसरी योग’ आणि ‘गुरु पुष्य योग’ बनल्याने ‘या’ राशी २०२४ मध्ये होतील श्रीमंत? देवगुरु देऊ शकतात प्रचंड धन)

सिंह राशी

२०२४ हे वर्ष सिंह राशीच्या लोकांसाठी देखील खूप फायदेशीर ठरु शकते. या राशीच्या लोकांची सर्व प्रलंबित कामे या काळात पूर्ण होऊ शकतात. आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतात. एवढेच नाही तर संपत्तीतही वाढ होऊन आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढू शकते. वर्ष २०२४ मध्ये, तुम्ही सर्व कामे पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकता. घरातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे.

कन्या राशी

शनि आणि केतूच्या संयोगामुळे कन्या राशीच्या लोकांना २०२४ मध्ये मोठे यश मिळू शकते. यावेळी समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. करिअर आणि व्यवसायात खूप प्रगती होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्ही जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती करु शकता. एवढेच नाही तर जीवनात आनंद येईल. आर्थिक स्थितीत पूर्वीच्या तुलनेत सुधारणा होण्याची शक्यता आहे. षडाष्टक योगाच्या प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये अनेक नवीन संधी मिळू शकतात. सरकारी नोकरी मिळण्याचीही शक्यता आहे.

(हे ही वाचा: Numerology: ‘या’ तारखांना जन्मलेले लोकं असतात फार रागीट? पण कमी वयात होतात गडगंज श्रीमंत!)

तूळ राशी

षडाष्टक योगाचा शुभ प्रभाव तूळ राशीच्या लोकांवरही दिसून येऊ शकतो. या राशीच्या लोकांसाठी २०२४ हे वर्ष भाग्यशाली ठरु शकतं. या योगाच्या शुभ प्रभावामुळे या राशीतील लोकांचे नशीब उजळू शकते. एवढेच नाही तर तुम्हाला नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे. तूळ राशीच्या लोकांना नोकरीत बढती मिळू शकते. समाजात पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. घरात सुख-समृद्धी नांदू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन धनलाभ होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader