Shani Dev Vakri In Kumbh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनी देव हे न्याय व कर्म दाता म्हणून ओळखले जातात. कलियुगातील दंडाधिकारी अशी ओळख असलेले शनी देव हे २९ जूनला आपली मूळ त्रिकोण रास कुंभमध्ये वक्री होणार आहे. शनी वक्री होणे म्हणजे ३६० अंशात गोल फिरून शनी उलट पावलांनी चालणार आहे. २०२५ पर्यंत अनेक राशींना शनीच्या या वक्री चालीचा फायदा होण्याची शक्यता आहे. या राशींच्या धन-दौलतीत अपार वाढ होणार आहे. करिअर मध्ये सुद्धा वेगळ्या संधी या राशींना मिळू शकते. या नशीबवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होऊ शकतो हे पाहूया..

शनी देवाची वक्री चाल ‘या’ राशींना २०२५ पर्यंत करेल मालामाल

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

वृषभ राशीसाठी शनीची वक्री चाल लाभदायक असणार आहे. शनी देव आपल्या राशीच्या कर्म भावी वक्री स्थितीत प्रभावी असणार आहेत. या कालावधीत आपल्या कामाला गती लाभेल. प्रगतीच्या संधी आपल्या वाट्याला येऊ शकतील, नोकरीच्या शोधात असणाऱ्या मंडळींना जुन्या ओळखी वापरून काम पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. या कालावधीत एखाद्या मोठ्या प्रोजेक्टची जबाबदारी आपल्या खांद्यावर येऊ शकते. तुम्हाला प्रसिद्धी व पैसे मिळवून देणारा हा कालावधी असेल. वडिलांसह सुरु असलेले वाद संपुष्टात येऊ शकतात. वाडवडिलांच्या कृपेने जुन्या गुंतवणुकीचे लाभ मिळू शकतात.

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

शनी देव वक्री झाल्याने मेष राशीच्या मंडळींना आनंदी आनंद अनुभवता येणार आहे. शनीदेव आपल्या राशीच्या आय व लाभ स्थानी असणार आहे. या कालावधीत आपल्याला जबरदस्त आर्थिक फायदा होणार आहे. आर्थिक मिळकतीचे नवे स्रोत निर्माण होणार आहे. आपल्याला कुटुंबाची व विशेषतः जोडीदाराची साथ लाभणार आहे. नात्यांमध्ये सुधार होतील. गुंतवणुकीसाठी शुभ कालावधी आहे. शेअर बाजारात गुंतवलेल्या पैशांचा मोबदला मिळेल.

हे ही वाचा<< Vat Purnima 2024 : यंदा वटपौर्णिमा कधी आहे? जाणून घ्या नेमकी तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

मकर रास (Capricorn Rashi Bhavishya)

आपल्याला सुद्धा शनीच्या उलट चालीचा फायदा होऊ शकतो. शनी देव आपल्या राशीच्या धन व वाणीच्या स्थानी वक्री होणार आहे. या कालावधीत आपल्याला वाणीवर प्रभुत्व मिळवता येईल व वाणीच्याच बळावर आपण धनलाभ मिळवू शकणार आहात. नोकरदार मंडळींना या कालावधीत पगारवाढ व पदोन्नतीची संधी मिळू शकते. तुम्हाला जोडीदाराच्या मदतीने एखादा नवा व्यवसाय करता येऊ शकतो किंवा सामाजिक उपक्रम राबवता येऊ शकतो. दोन्ही मार्गातून आपल्याला मान- सन्मान, धनलाभ प्राप्त होऊ शकतो. संतती सुख प्राप्त होण्याची शक्यता आहे. अडकून पडलेले पैसे परत मिळतील या अवधीत प्रॉपर्टी व वाहन खरेदीची संधी आहे.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)