Shani Mahadasha 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांमध्ये शनीला कर्मदेव म्हणून ओळखले जाते. शनी देव प्रत्येक राशीला त्यांच्या कर्मानुरूप फळ देण्याचे काम करतात. अनेकदा शनीची दृष्टी ही नकारात्मक मानली जात असली तरी चांगल्या कर्मानुसार शनी देव न्याय देण्याचे कामदेखील करतात. त्यामुळे शनीला न्यायदेवता, असे म्हटले जाते. शनी देवाला वय, दुःख, रोग, वेदना, विज्ञान, तंत्रज्ञान, लोह, नोकर इत्यादींचा कारक मानले जाते. तो मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहे. तूळ राशी ही शनीची उच्च राशी आणि मेष राशी ही त्याची दुर्बल राशी मानली जाते. शनी देवाची महादशा १९ वर्षांपर्यंत असते.
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी देव अशुभ स्थितीत असेल, तर ती व्यक्ती आर्थिक आणि मानसिक समस्यांनी घेरली जाऊ शकते. त्यामुळे शनी नकारात्मक स्थितीत असेल, तर साडेसाती किंवा ध्येयादरम्यान अत्यंत गरिबीची परिस्थिती येऊ शकते. दुसरीकडे जर शनी देव कुंडलीत शुभ स्थितीत असेल, तर त्या व्यक्तीवर सुखाची बरसात होऊ शकते. त्यांना नोकरी-व्यवसायात यश मिळू शकते. त्यांचे आयुष्य सुखाने न्हाऊन निघू शकते. तसेच शनीच्या महादशेने जीवनात मोठे बदल होऊ शकतात.
शनीची नकारात्मक स्थिती
शनीची महादशा स्थिती प्रत्येक राशीवर १९ वर्षे टिकते. शनी देव एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कोणत्या स्थानी स्थित आहेत यावर काय फळ मिळणार हे अवलंबून असते. जर कुंडलीत शनी नकारात्मक स्थितीत असेल, तर त्या व्यक्तीला शनीच्या प्रभावामुळे मानसिक आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. तसेच, त्या व्यक्तीवर खोटे आरोप होऊ शकतात. त्या व्यक्तीला एकटे पाडण्याच प्रयत्न होऊ शकतो. व्यवसायात तोटा होऊ शकतो. जर कुंडलीत शनी देव सूर्यासह स्थित असेल, तर धनहानी होऊ शकते. सन्मान आणि आदर गमवावा लागू शकतो. जर कुंडलीत शनी देव मंगळासह स्थित असेल, तर आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. अपघात होण्याची शक्यता असते. कारण- शनी देव सूर्य आणि मंगळ यांच्यात वैरभाव आहे.
शनीची शुभ स्थिती
जर तुमच्या जन्मकुंडलीत शनी देव शुभ किंवा उच्च स्थानावर असेल, तर शनीच्या महादशेदरम्यान व्यक्तीला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता असते. तसेच व्यक्तीला खूप मालमत्ता मिळू शकते. पण, ती मालमत्ता वडिलोपार्जित असेल किंवा तुम्ही खरेदी केलेली असेल, तर त्या व्यक्तीचा समाजात एक वेगळा मान असू शकतो. कठोर परिश्रम केल्यास त्यांना नशिबाचीही साथ मिळू शकते. व्यवसायात चांगला नफा होऊ शकतो. राजकीय क्षेत्रात यश मिळू शकते. जर तुमचे काम शनी ग्रहाशी संबंधित असेल; जसे, की लोह, पेट्रोल, खनिजे, अल्कोहोल, तर तुमचे नशीब उजळू शकते. वकील, न्यायाधीश आणि खासगी कंपन्यांशी संबंधित लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो.