Shani Mahadasha: ज्योतिषशास्त्रामध्ये शनि अतिशय प्रभावशाली ग्रह मानला जातो. जो अत्यंत हळूवार चालतो. अशात प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनात शनिचा प्रभाव दीर्घ काळापर्यंत असतो. शनि व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. त्यामुळे तो गरीबाला राजा व राजाला गरीब बनवू शकतो.
शनि एकमेव असा ग्रह आहे ज्याच्या जवळ साडेसातीचा अधिकार आहे. तसेच कुंडलीमध्ये शनिची महादशा असेल तर व्यक्तीच्या जीवनावर खूप अडचणीचा सामना करावा लागतो. काही राशींच्या लोकांसाठी शनिची महादशा फायद्याची ठरते. जाणून घेऊ या काही राशींविषयी ज्यांच्यावर शनिची महादशा सकारात्मक परिणाम दाखवणार आहे.
हेही वाचा : Shukra Rahu Yuti 2025 : राहु-शुक्रची होणार युती, या राशींचे नशीब फळफळणार; मिळणार बक्कळ पैसा
ज्योतिषशास्त्रानुसार, शनिची महादशा १९ वर्षांपर्यंत असते. शनि व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनिच्या महादशामुळे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम दिसून येते. तसेच नोकरीमध्ये अडचणी, मानसिक आणि शारीरिक समस्या, वाईट आर्थिक स्थिती इत्यादी गोष्टींचा सामना करावा लागतो. आयुष्यात अनेक अडचणींना सामोरा जावे लागते.
शनिच्या महादशाचा परिणाम १२ राशींच्या जीवनावर वेगवेगळा पडतो. आज आपण अशा राशींविषयी जाणून घेणार आहोत, जिथे जर शनिची महादशा सुरू असेल तर त्यांना भरपूर लाभ मिळू शकतात.
कन्या राशी (Kanya Zodiac)
कन्या राशीच्या लोकांसाठी शनि पंचम भावाचे आणि षष्ठ भावाचे स्वामी आहे. ज्या लोकांच्या कुंडली मध्ये शनि कन्या राशीमध्ये असतात, ते शुभ मानले जाते. शनिदेवाच्या कृपेने या राशीचे लोक अतिशय शक्तिशाली आणि धनवान होतात. हे लोक अतिशय कमी बोलतात. त्यांच्या लेखन क्षमतेने ते इतरांची बोलती बंद करतात. तसेच शनिच्या महादशामुळे यशाबरोबर भरपूर लाभ मिळू शकतो.
तुळ राशी (Tula Zodiac)
शनि चतुर्थ आणि पंचम भावाचे स्वामी असून योग कारक ग्रह आहे. तुळ राशीमध्ये शनि खूप चांगले फळ देतात. हे लोक स्वाभिमानी असून खूप महत्वाकांक्षी असतात. हे लोक स्वातंत्र्य विचारांचे असतात. या लोकांची आर्थिक स्थिती अतिशय छान असते. तसेच मानसिक स्थिती सुद्धा चांगली असते.
धनु राशी (Dhanu Zodiac)
या राशीमध्ये शनि हे दुसर्या आणि तिसर्या भावाचे स्वामी असतात. अशात या राशीचे लोक अतिशय कष्टाळू तसेच चांगल्या विचारांचे असतात. जर शनिची महादशा सुरू असेल तर या राशीच्या लोकांना सुख आणि चांगल्या फळाची प्राप्ती होते. शैक्षणिक क्षेत्रात ते नाव कमवतात.
मीन राशी (Meen Zodiac)
या राशीमध्ये शनि बाराव्या स्थानावर असतात. अशात या राशीचे लोक गंभीर स्वभावाचे असतात. हे लोक थोडे महत्वाकांक्षी असतात. या राशीमध्ये शनिमुळे लोक प्रतिष्ठित असतात. या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम असते.