Shani Dev Asta Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार शनी हा सर्वात कमी वेगाने चालणारा ग्रह असला तरी त्याचा प्रभाव प्रत्येक राशीवर ठराविक वेळेनंतर बदलत असतो. शनी मार्गी होण्याचे, वक्री होण्याचे, अस्त व उदयामुळे काही राशींच्या कुंडलीतील साडेसाती किंवा ढैय्या (अडीच वर्षांच्या कालावधीतील) प्रभाव कमी होतो तर, काही राशींच्या कुंडलीत तीव्र होतो. नववर्षात ३ फेब्रुवारीला शनी महाराज अस्त झाले असून ९ मार्चपर्यंत याच स्थितीत असणार आहेत. ९ मार्चला पुन्हा कुंभ राशीत शनीचा उदय होणार आहे. तत्पूर्वी या वेळी शनी महाराज अस्त झाल्याने काही राशींवरील साडेसाती व ढैय्या प्रभाव संपुष्टात येत आहे. या राशींच्या भाग्यात आता श्रीमंतीचा मार्ग खुला होणार असून त्यांच्या नशिबाला एक सुखाची कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. या राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा व काय लाभ होणार आहे हे पाहूया..
शनी अस्तासह ‘या’ राशींना साडेसातीतून मिळणार मुक्ती
शनी अस्त झाल्याने मीन राशीच्या मंडळींना अशुभ प्रभावातून सुटका मिळण्याची चिन्हे आहेत. तसेच कुंभ राशीतील शनीच्या प्रभावाचा दुसरा टप्पा व मकर राशीत प्रभावाचा तिसरा टप्पा सुरु होणार असल्याने काही प्रमाणात कष्ट कमी होऊ शकतात. या तीन राशींना म्हणजेच मकर, कुंभ, मीन राशीला शनीच्या प्रभावातून मोकळी वाट मिळाल्याने त्यांच्या प्रगतीच्या संधी वाढतील. सर्वाधिक लाभ आपल्याला मानसिक आरोग्याच्या बाबत होऊ शकतो. आपल्या मनावरील ताण व तणाव दूर होऊन समाधानाने आयुष्य सुखकर होऊ शकते. जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ संभवतो. आरोग्य सुद्धा सुधारण्यास मदत होऊ शकते. आपल्याला या कालावधीत परदेश प्रवासाची संधी मिळू शकते तसेच नवीन संपर्क वाढून एखादी कामाची गोष्ट किंवा व्यवसायाची डील पूर्ण होऊ शकते.
हे ही वाचा << शनी- शुक्राने बनवलेले बलाढ्य राजयोग भरतील ‘या’ राशींची तिजोरी; कुंडलीत आहे श्रीमंती, पण मार्ग कोणता?
शनी अस्त झाल्याने ‘या’ राशींवरील ढैय्या प्रभाव होईल कमी
शनीचा कुंभ राशीत अस्त झाल्याने कर्क व वृश्चिक या दोन राशींवरील ढैय्या प्रभाव कमी होणार आहे. ढैय्या म्हणजे शनीचा अडीच वर्षांचा प्रभाव. कालावधी कमी असल्याने हा प्रभाव अधिक तीव्र असल्याचे सांगितले जाते. शनी कर्क राशीच्या ग्रह गोचर कुंडलीत ८ व्या स्थानी व वृश्चिक राशीच्या कुंडलीत चौथ्या स्थानी भ्रमण करत आहेत. ढैय्या कालावधी संपुष्टात आल्याने तुमची ती कामे मार्गी लागू शकतील जी यापूर्वी काही ना काही कारणाने पूर्ण होता होता राहिली होती. व्यवसायाला सुद्धा या कालावधीत गती लाभेल.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)