उल्हास गुप्ते
Numerology Predictions: संख्याशास्त्रात आपण माणसाच्या जन्मतारखेवरून त्याची मानसिकता, स्वभाव, यश-अपयश, आर्थिक बाजू, वैवाहिक सौख्य अशा अनेक गोष्टींचा अंदाज संख्याशास्त्राच्या साहाय्याने करू शकतो. तसेच त्यांचे पूर्ण नाव, त्या नावाच्या स्पंदनातून व जन्मतारखेच्या साहाय्यातून आपण त्यांच्या उत्कर्षाचा आलेख मांडू शकतो.
मूलांक म्हणजे काय?
मूलांक म्हणजे मूळ अंक, जे एक ते नऊपर्यंत मर्यादित आहेत.उदा. १२-११-१९९० या जन्मतारखेत १२ तारखेचा मूलांक १ + २ = ३ हा जन्मतारीख १२ चा मूलांक आहे. संख्याशास्त्रात प्रत्येक अंकावर एका ग्रहाचा अंमल असतो.
जसे की,
मूलांक १ = रवी, मूलांक २ = चंद्र, मूलांक 3 = गुरु, मूलांक ४ = हर्षल, मूलांक ५ = बुध, मूलांक ६ = शुक्र, मूलांक ७ = नेपच्यून, मूलांक ८ = शनी, मूलांक ९ = मंगळ.
मागील लेखात आपण मूलांक १ ते ४ चे स्वभाव गुण व शुभ काळ यांची माहिती घेतली आणि आज आपण मूलांक ५ ते ९ चे तपशील जाणून घेणार आहोत. चला तर मग तुमच्या मूलांकाचे गुणधर्म पाहू.
मूलांक ५
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ५, १४, २३ तारखेला जाला असेल तर अशा लोकांचा मूलांक पाच असतो या पाच अंकावर बुध ग्रहाचा अंमल असतो. हा मूलांक अतिशय बुद्धीवादी आहे. त्यामुळे यांनी आपली मानसिकता सांभाळून आपल्या बुद्धीचा जर चांगला उपयोग केला तर यांनी निवडलेल्या क्षेत्रात यांना उत्तम यश मिळू शकते. मात्र खूप वेळा यांचे यांच्या आर्थिक गर्चावर नियंत्रण नसते. केवळ पैसा खिशात आहे तो खर्च करायचा यातून खूप वेळा ते आर्थिक अडचणीत येतात तेव्हा अशा लोकांनी पैसा जपून वापरावा. मात्र उद्योग धंद्यात यांचा हिशोबी स्वभाव उत्तम कामगिरी पार पाडत असतो. उत्तम वक्तृत्व आणि संशोधन वृत्ती यांना याच्या कर्तत्ववाला अधिक उजाळा देते. धार्मिक तसेच अध्यात्मत यांना खूप समाधान लाभत असते. त्यातूनच प्रवासाचे योगही येतात. राजकारणात सामाजिक क्षेत्रात शत्रुत्व, सुडाने वागू नये. जमत नसेल तर दूर होणे फायदेशीर ठरते. त्यात मानही राहतो. व वादही मिटतात.
मूलांक ६
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्यातील ६, १५, २४ तारखांना झाला असेल तर अशा लोकांचा मूलांक सहा येतो. शरीरातील उर्जा शक्ती आणि कामशक्ती यावर शुक्र ग्रहाच अंमल असतो. भावना सौंदर्य आनंद सुख संतुष्टता हे सारे गुणधर्म या मूलांकात दिसूनयेतात. साहित्य संगीत कला यावरही शुक्राची कृपा दिसून येते. खूपशी संगीत क्षेत्रातील सिनेनाट्य क्षेत्रातील मंडळीचा मूलांक सहा आढळतो. हा अंक तसा नम्र प्रेमळ सात्विक आहे. आईच्या शुद्ध पवित्र प्रेमाची ओढ या अंकाात प्रामुख्याने दिसून येते. तर प्रेयसी ते पत्नी अशा नाजूक प्रवासाची खुणगांठही या अंकाच्या आकारात दिसून येते. या मूलांकाच्या व्यक्ती निरागस असतात. यांना वादविवाद भांडण तंटे कोर्टकचेरी बिलकुल आवडत नाही. मात्र यांच्या मोकळ्या वागण्यातून खूप वेळा गैरसमज पसरत असतो. पण वेळीच ही माणसे स्वत:ला सावरून आपला नियमित मार्ग स्विकारतात. गरीबांबद्दल यांना खूप सहानूभुती असते. त्यामुळे यांच्याहातून खूपच दानधर्म होत असतो. एकंदरीत यांचे निरागस व्यक्तीमत्व बोलणे, आदी गोष्टी लोकांनाही आवडत असतात. त्यामुळे यांची लोकप्रियता चिरकाल टिकते.
मूलांक ७
ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ७,१६, २५ तारखेला झाला असेल अशा लोकांचा मूलांक सात असतो. सात मूलांकावर नेपच्यून या ग्रहाचा अंमल असतो. अशा व्यक्ती सोज्वळ व शांत स्वभावाच्या असतात. यांचे वागणे बोलणे जरी हळूवार असले तरी यांची बौद्दाीक पातळी वैचारीक बैठक खूपच वरच्या स्तरावरची असते. समुद्रकिनारी नदीकाठ ही यांची आवडती ठिकाणे तिथे बसून मानसिक स्वास्थ मिळवणे हा एक त्याचा छंदच असतो. सद्भावना प्रेम सहानुभूती अशा अनेक सद्गुणांशी यांचे जवळचे नाते असते. इच्छाशक्ती परिपूर्णता गुढशक्तीचा विकास या बाबतीत हा अंक खूपच प्रगतीशील दिसूनयेतो. मूलांक दोन व सात याचे एक अतूट गूढ नाते आहे. त्यामुळे दोन्ही अंकात खूपसे साम्य दिसूनयेते. विशेषत या व्यक्ती अतिशय कल्पनाप्रिय असतात. उत्तम चिंतन अध्यात्मिक अभ्यास यात यांना खूप समाधान लाभते. त्यामुळे उद्योगधंद्यात नोकरीत यांच्या सद्शील वागण्यामुळे या व्यक्ती सर्वांना जवळच्या वाटतात. ‘आहे ते जीवन सुखाने जगू या’ अशा आशयाचा एक वेगळा सूर यांच्या वागण्यात दिसून येतो.
मूलांक ८
ज्या लोकांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या ८,१७, २६ तारखेला झाला असेल तर अशा लोकांचा मूलांक आठ असतो. आठ अंकावर शनी ग्रहाचा अंमल असतो. शनी हा ग्रह मऊ मेणाहून मऊ तर कधी कठीणाहून कटीण अशा दोन टोकात यांची मानसिकता विभागली जाते. म्हणून अशा लोकांच्या स्वभावाचा खरा थांगपत्ता लागत नाही अशा व्यक्ती खूपच मेहनती साहसी व पराक्रमी असतात. अतिशय सेवाभावी वृत्तीने काम करतील मुख्य म्हणजे कमी बोलणे , अंतर्मुखी, कामाची जाहिरात न करता काम करून दाखवणे नको त्या जबाबदाऱ्या घेणे आपल्या पदरचे पैसे खर्चून दुसऱ्याची कामे करणे त्यामुळे अशा लोकांना समाजात खूपच आदराची वागणूक मिळत असते. गंभीर स्वभाव स्वतंत्र विचारसरणी नी अति निष्ठावंत त्यामुळे सहसा यांच्या स्वभावात बदल होत नाही पण जर का एखाद्याविषयी गैरसमज झाला तर हा माणूस त्याच्या विरोधात ठामपणे उभा राहतो. मग तिथे दया माया उरत नाही. एकंदरीत यांच्या अशा या बहुरुपी मानसिकतेला लोक जुळवून घेतात कारण यांच्यातील खरा चांगुलपणा विसरता येत नाही.
हे ही वाचा<< ‘या’ दिवशी गुरुपुष्यमृत योग बनून तुमची रास होणार गडगंज श्रीमंत? विष्णू-लक्ष्मी कृपेने होऊ शकता कोट्याधीश
मूलांक ९
ज्या स्त्री – पुरुषाचा जन्म कोणत्याही ९, १८, २७ या तारखांना होतो. अशा लोकांचा मूलांक नऊ असतो. नऊ मूलांक मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली
येतो. या व्यक्ती खूपच वेगळ्या मानसिकतेच्या असतात प्रचंड आक्रमक पराक्रमी साहसी नी तितक्याच वेगाने खाली येऊन हळव्या संवेदनशील भावनाशील होतात. खऱ्या नात्याला मैत्रीला जागणाऱ्या असतात. यांची कोणी प्रेमप्रकरणात आर्थिक बाबतीत कोणी फसवणूक केली तर या व्यक्ती शांत बसत नाहीत. अशा मूलांकाच्या व्यक्ती सैन्य दलात पोलीस खात्यात सरकारी कामात वरच्या हुद्यावर असतात. राजकारणात सामाजिक क्षेत्रात यांचा नावलौकीक यांच्या कर्तृत्वातून होत असतो. शूर धाडसी स्वभाव त्यामुळे समाजात या व्यक्ती खूप लोकांना आपल्या जवळच्या वाटतात. एक मोठे संरक्षण मोठा आधार वाटतो. त्यामुळे ही माणसे विश्वासास पात्र ठरतात नी लोकही याच्यावर पूर्ण भरवसा ठेवतात. नऊ हा अंकातील शेवटचा अंक परोपकार उदार हमी अशा सकारात्मक वागण्यातून यांची एक ठशीव प्रतिमा कायम लक्षात राहते.