Shani In Guru Nakshatra: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह वेळोवेळी गोचर करून अन्य राशीत व नक्षत्रात प्रवेश करत असतो. शनी हा ग्रहमालेतील सर्वात महत्त्वाचा ग्रह असून त्यास कलियुगातील न्याय व कर्मदेवता म्हणून ओळखले जाते. शनीदेव सर्व राशींच्या कर्मानुसार त्यांना फळ देत असतात. शनीचा वेग हा अत्यंत कमी असला तरी प्रभावाची तीव्रता उच्च असते. एखाद्या राशीत प्रवेश केल्यावर शनी किमान अडीच तर कमाल साडेसात वर्षं वास्तव्य करतो. अनेक दिवसांनी आता शनीच्या नक्षत्र परिवर्तनाचा योग जुळून येत आहे. ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार येत्या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये ७ तारखेला शनी देव गुरुच्या पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश घेणार आहे. शनी व गुरूचा प्रभाव एकत्र आल्याने निश्चितच १२ पैकी काही राशींवर शुभ प्रभाव होण्याची चिन्हे आहेत. गुढीपाडव्याच्या आधी व होळीच्या नंतर होणारा हा बदल तुमच्या राशीत काही लाभ घेऊन येणार का हे पाहूया..

गुढीपाडव्याच्या आधी शनी- गुरु देणार ‘या’ राशींना अपार धन

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

मेष हे गुरूच्या स्वामित्वाची रास मानली जाते. त्यामुळे शनीच्या वक्रदृष्टीपासून बृहस्पती गुरु आपल्या अधिपत्याखालील राशीचे रक्षण करू शकतात. असं असलं तरी शनीच्या रूपात या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात वेग वाढू शकतो. जी कामे रखडली होती त्यांना दिशा, गती मिळू शकते यामुळे अडकून पडलेले धन सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचू शकते. संततीप्राप्तीसाठी केलेले प्रयत्न फळाला येतील. तर काहींना त्यांच्या मुलांच्या माध्यमातून अगदी आनंदाची व अभिमानाची स्थिती अनुभवता येईल. धनलक्ष्मी तुमच्यावर कृपादृष्टी ठेवेल पण तुम्हाला संचय सुद्धा करणे आवश्यक आहे. मेष राशीस येत्या काळात नव्या सुरुवातीची संधी मिळू शकते आपले जुने विचार काळानुसार बदलावे लागतील. नवीन सवयी व व्यक्तींमुळे आर्थिक फायदा संभवतो.

Numerology number 8
Numerology : ‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते शनीची कृपादृष्टी, मान-सन्मानासह कमावतात प्रचंड संपत्ती; भाग्यापेक्षा असतो कर्मावर विश्वास
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ketu nakshatra parivartan 2024
आजपासून ‘या’ ३ राशींची चांदी; केतूच्या नक्षत्र परिवर्तनाने कमावणार भरपूर पैसा आणि मानसन्मान
Shani gochar in kumbh shash rajyog 2024
२०२५ पर्यंत ‘या’ राशींचे लोक होतील मालामाल; शनीच्या शश राजयोगामुळे कमावतील चिक्कार पैसा अन् जगतील राजासारखे जीवन
swapan sashtra dream interpretation about money gold silver
स्वप्नात भरपूर पैसा, सोन्या-चांदीचे दागिने दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या काय सांगतं स्वप्नशास्त्र
Sun Rashi Parivartan 2024
सूर्य करणार मालामाल; वृश्चिक राशीतील राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
shukra gochar 2024
डिसेंबर महिन्यात शुक्र दोनदा करणार गोचर, ‘या’ तीन राशींचे पालटणार नशीब, मिळणार अपार पैसा अन् धन
Dev Diwali 2024
देव दिवाळीला गजकेसरी योगामुळे ‘या’ राशीच्या लोकांचे नशीब उजळणार! अचानक धनलाभाचा योग, मिळेल पैसाच पैसा

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

शनी देवांनी पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करताच वृषभ राशीचे अच्छे दिन सुरु होणार आहेत. शनी आपल्या राशीत कर्मभावी भ्रमण करणार असून आपण कळत नकळत केलेल्या प्रत्येक कृतीचा आपल्याला मोबदला मिळणार आहे. तुमच्या निस्वार्थी कृतीचा दुप्पट फायदा तुमच्या पदरात पडू शकतो. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर या कालावधीत एखादी उत्तम संधी चालून येऊ शकते. व्यवसायात सुद्धा गुंतवणूक करण्याची संधी मिळू शकते. वडिलांसह नाते सुधारण्यात मदत होईल. या कालावधीत घरातील वाद संपून शांतता व समाधान अनुभवता येईल. वाहन व घराच्या खरेदीचे मानस पूर्ण होऊ शकतात.

हे ही वाचा<< ३० वर्षांनी शनीने महायुती केल्याने ‘या’ राशींचे आयुष्य होईल कुशल मंगल! प्रेम, पैसे, प्रपंच, कशी असेल कुंडली?

मिथुन रास (Gemini Rashi Bhavishya)

शनीचे पूर्व भाद्रपद नक्षत्रातील परिवर्तन मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. कारण या कालावधीत मिथुन राशीवरील शनीचा प्रभाव नवव्या स्थानी सुरु होणार आहे. नव्या कामाची सुरुवात होऊ शकते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने एखादी मोठी आर्थिक गुंतवणूक करू शकता ज्यातून भविष्यात सुद्धा धनलाभाच्या भक्कम संधी उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांना या कालावधीत मन एकाग्र करण्यासाठी अनुकूल वातावरण लाभेल. मित्र, शेजारी अशा जोडलेल्या कुटुंबातून मानसिक धैर्य लाभेल ज्यामुळं तुम्ही या कालावधीत एखाद्या मोठ्या समस्येचे निवारण करू शकता. धनलाभासाठी तुमच्या जोडीदाराची साथ अत्यंत आवश्यक असणार आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)