Shani Gochar 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रात शनी महाराज हे कलियुगातील कर्म व न्याय देवता मानले जातात. याचा अर्थ असा की मानवाला त्याच्या कर्मानुरूप न्याय व शिक्षा देण्याचे काम शनी महाराज करतात. एखाद्या व्यक्तीला दुःखातून सावरण्यासाठी किंवा दुःख सहन करायला लावण्यासाठी शनीचे त्याच्या कुंडलीतील अस्तित्व खूप महत्त्वाचे ठरते. शनीचे एखाद्या राशीच्या गोचर कुंडलीत असणारे स्थान हे त्या राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात उलथापालथ घडवून आणते. सामान्य मान्यतेनुसार शनीचा सहवास हा त्रासदायक मानला जात असला तरी काही राशींना मात्र शनीच्या प्रभावाने वेगाने प्रगती व लाभ अनुभवता येऊ शकतो. याचे एक कारण म्हणजे त्या व्यक्तीचे कर्म व दुसरे म्हणते शनीचे स्वामित्व. असं म्हणतात की शनी स्वराशींना साडेसातीच्या कालावधीत सुद्धा फार क्लेशदायक अनुभव देत नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार सध्या शनी देव हे जानेवारी २०२३ पासून मूळ त्रिकोण राशीत म्हणजेच कुंभेत स्थिर आहेत. तर येत्या नववर्षी म्हणजेच २०२५ मध्ये शनी महाराज हे मीन राशीत गोचर करणार आहेत. मीन ही गुरु ग्रहाच्या स्वामित्वाची रास मानली जाते. २९ मार्च २०२५ ला शनीचे मीन राशीत गोचर होईल तर ३ जून २०२७ पर्यंत शनी याच राशीत विराजमान असतील. या स्थानामुळे काही राशींना शनीच्या साडेसातीतुन मोकळीक मिळणार आहे. शनी व गुरूच्या एकत्रित प्रभावामुळे या राशींना प्रचंड यश व धनलाभ होण्याची शक्यता आहे. एकूणच अच्छे दिन जगण्याची संधी शनी महाराज काही मंडळींना देणार आहेत, या नशीबवान राशी कोणत्या चला पाहूया..

२०२७ पर्यंत ‘या’ राशींना सोन्यासारखं सुख लाभण्याची शक्यता

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

सिंह राशीसाठी शनीचे मीन राशीतील अस्तित्व हे लाभदायक सिद्ध होणार आहे. मागील काही वर्षांमध्ये आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणी या शनीच्या गोचराने दूर होऊ शकतील. शनी जेव्हा मीन राशीत प्रवेश करतील त्याबरोबरच तुम्हाला कामाची कोडी, प्रेमाची नाती सहज होताना दिसू लागतील. यश तुमच्या पायाशी लोटांगण घालत येईल. काही वेळा तुम्ही तुमच्याच यशाने व वैभवाने भारावून जाल. जगण्याची नवी उमेद व कामासाठी आवश्यक आत्मविश्वास घेऊन हे शनी गोचर तुमच्या राशीत प्रभावी असणार आहे. कामाच्या ठिकाणी एखादी मोठी जबाबदारी आपल्या हाती सोपवली जाईल, नाही म्हणणे टाळावे. यामुळे आपल्याला करिअरमध्ये प्रगतीची शिडी चढता येईल. नव्या नोकरीच्या संधी चालून येतील. व्यवसायात आपले नशीब तपासून पाहू शकता. वैवाहिक जीवन सुखकर होईल. हुरळून जाणे मात्र नियंत्रणात ठेवावे लागेल.

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

तूळ राशीला सुद्धा शनीचे मीन राशीतील गोचर अनुकूल प्रभाव देतील. २०२५ नंतर आपल्याला हळूहळू पूर्वकर्माची फळे प्राप्त होतील. जुन्या गुंतवणुकीचे परतावे मिळू शकतात. वाडवडिलांच्या संपत्तीतून लाभ संभवतो. इच्छापूर्तीची सुरुवात होईल. अध्यात्माच्या दिशेने वळाल. मंगलकार्यात सहभागी व्हाल. बेरोजगारांना नोकरीच्या संधी चालून येऊ शकतात. तुम्हाला काही आयुष्य बदलून टाकणारे निर्णय घ्यावे लागू शकतात. कामाच्या निमित्ताने वास्तव्याचे ठिकाण बदलू शकते. तुम्हाला विमानप्रवासाची संधी लाभेल. जोडीदाराच्या प्रेमाने भारावून जाल. शेअर बाजारातून प्रचंड धनलाभ संभवतो.

हे ही वाचा<< ४५ दिवसांनी शनी १८० अंशात वळणार; ‘या’ राशींना नोव्हेंबर २०२४ पर्यंत प्रचंड श्रीमंतीची संधी; घरातील भांडण होईल दूर

मीन रास (Pisces Rashi Bhavishya)

मीन राशीतच शनीचे गोचर होणार असल्याने या राशीतील ढैय्या प्रभाव सुरु होणार आहे. शनी तुमच्या आयुष्याची गती वाढवतील व तुमच्या राशीचे स्वामी गुरुदेव तुम्हाला दिशा दाखवतील. योग्य दिशेत वेगाने पुढे गेल्यास मिळणारा प्रभाव हा नक्कीच लाभदायक असू शकतो. कित्येक वर्षांपासून अडकून पडलेली कामे पूर्ण होऊ शकतील. भौतिक सुखाची प्राप्ती होईल. वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करू शकाल. कलाक्षेत्रातील जातकांना अधिक लाभ होऊ शकतो. खासगी आयुष्य काही दिवस थांबवून ठेवावे लागेल व त्याऐवजी कामावर सर्व शक्ती एकवटून लक्ष केंद्रित करावे लागेल. संभाषण कौशल्याच्या विकासावर भर द्या. आर्थिक स्थिती सुधारण्याची शक्यता आहे त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसांशी संपर्क जुळवून घ्यावे लागतील.

(टीप: वरील लेख गृहीतके व सामान्य ज्ञानावर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani maharaj finally to leave kumbh rashi at 2025 till 2027 these three rashi achhe din to begin money success shower love svs