Shani Blessing Rashi: शनीदेव हे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कर्मदेव व न्यायदेवता म्हणून ओळखले जातात. शनीचा प्रभाव हा नेहमीच वाईट असतो असे मानले जाते पण मुळात शनी हे प्रत्येक व्यक्तीला त्याच्या/ तिच्या कर्मानुरूप फळ देत असतात त्यामुळे प्रभाव चांगला पडणार की वाईट हे तुमच्याच कामावर अवलंबून असते. एक मात्र खरं की शनीच्या स्थितीनुसार प्रभाव कमी अधिक तीव्र व शुभ अशुभ स्वरूपात पडू शकतो. ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार मागील वर्षी म्हणजे २०२३ च्या १७ जानेवारीला शनीने ३० वर्षांनी आपल्या मूळ त्रिकोण राशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश घेतला होता. शनी एखाद्या राशीतील वास्तव्य हे किमान अडीच वर्ष तरी असतेच त्यामुळे शनी २०२५ पर्यंत तरी कुंभेतच स्थित असणार आहेत. शनीच्या अडीच वर्षीय वास्तव्याचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून आता पुढील ३३१ दिवस काही राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या मंडळींना आपल्या कर्मात सकारात्मकता आणल्यास शनीच्या स्थितीचा अत्यंत मोठा फायदा त्यांना धनलाभ,प्रगतीच्या रूपात होऊ शकतो. या राशी कोणत्या हे पाहूया…
३३१ दिवस शनीचे! ‘या’ मंडळींना होणार प्रचंड धनलाभ
मेष रास (Aries Rashi Bhavishya)
ज्योतिषीय अभ्यासकांच्या माहितीनुसार मेष राशीचं व्यक्तींना २०२४ हे वर्ष सर्वात लाभदायक ठरू शकते. वर्षाच्या सुरुवातीलाच आपल्या खांद्यावर मोठी जबाबदारी येईल पण त्यासह तुम्हाला धनलाभाचे सुद्धा योग आहेत. मार्चच्या सुमारास आपलयाला व्यवसायाच्या निमित्ताने प्रवासाचे योग आहेत. आपल्याला कार्यस्थळी मान सन्मान लाभण्याची शक्यता आहे. जर तुमचे काम एखाद्या परदेशी कंपनीशी संबंधित असेल तर तुम्हाला येत्या काळात बोनस रूपात प्रचंड धनलाभ होऊ शकतो.
तूळ रास (Libra Rashi Bhavishya)
३३१ दिवस तूळ राशीवर शनिदेवाची विशेष कृपा राहील. या काळात तुम्हाला कौटुंबिक जीवनाचा आनंद अनुभवता येईल. या काळात तुम्ही वाहन किंवा घर खरेदी करू शकता. जे लोक शिक्षण क्षेत्राशी निगडित आहेत त्यांना याकाळात शनिदेवाची साथ मिळणार आहे. तसंच या काळात तुमच्याकडे भरपूर पैसा येऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती यावेळी मजबूत राहील. यासोबत रखडलेली कामही यावेळी पूर्ण होतील.
हे ही वाचा << लक्ष्मी नारायण योगाने फेब्रुवारीचे ‘हे’ ८ दिवस होतील सोन्याचे; ‘या’ राशी गडगंज श्रीमंतीसह अनुभवतील आयुष्य बदलणारी घटना
सिंह रास (Leo Rashi Bhavishya)
पॉवरफुल शनीदेव आपल्या राशीच्या कुंडलीत शुभ स्थानी आल्याने तुम्हाला हा येणारा कालावधी सुद्धा लाभाचा सिद्ध होऊ शकतो. एखादा वादातीत असणारा मुद्दा तुम्हाला खरं सिद्ध करून तुमचा समाजातील मान- सन्मान वाढवू शकतो. आजारातून मुक्ती मिळवून देणारा असा हा कालावधी आहे. तुमच्या आयुष्यात एखाद्या नव्या पाहुण्याची एंट्री होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सुद्धा शुभ वार्ता कानी येऊ शकते. एखाद्या मैत्रिणीच्या/मित्राच्या रूपात अचानक लक्ष्मीचे आपल्यावरील आशीर्वाद आणखीन वाढू शकतात.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)