Numerology Shani Blessing This Birthdate: २०२४ चे नववर्ष सुरु व्हायला आता २० दिवसच शिल्लक आहेत. त्यामुळे येणारे नववर्ष आपल्या राशीसाठी कसे असेल आणि पुढील वर्षात काय काय बदल होतील याविषयी अनेकांच्या मनात उत्सुकता आहे. आज आपण अंकशास्त्रानुसार येणारे वर्ष कोणासाठी फायद्याचे ठरू शकते हे पाहणार आहोत. अंकशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार, २०२४ या वर्षात मूलांक आठ हा सर्वात लाभदायक स्थिती अनुभवणार आहे. ८ हा शनीच्या प्रभावाचा मूलांक आहे त्यामुळे येणारे २०२४ हे वर्ष शनिकृपेचे असणार आहे. परिणामी ज्या व्यक्तींचा मूलांक हा ८ आहे त्यांना येत्या वर्षात प्रचंड यश- धनलाभ व प्रगती प्राप्त करता येऊ शकते. नेमका कोणाचा मूलांक आठ आहे आणि त्यांना २०२४ मध्ये काय लाभ होऊ शकतो हे पाहूया..

तुमचा मूलांक ८ आहे का?

मूलांक ही तुमच्या जन्मतारखेची जोड असते, म्हणजे जर एखाद्या व्यक्तीचा जन्म २५ ऑगस्ट २००१ रोजी झाला असेल, तर तुमचा मूलांक २+५ = ७ आहे. जर तुमची जन्मतारीख २० नोव्हेंबर २००५ असेल, तर तुमचा मूलांक २+० = २ आहे. कोणत्याही महिन्याच्या ८, १७, २६ तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक ८ असेल.

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Shani Budh Yuti 2025 astrology
Shani Budh Yuti 2025 : नवीन वर्षात सोन्याचा हंडा घेऊन लक्ष्मी ठोठावेल ‘या’ राशींच्या मंडळींचे दार? शनी-बुधाच्या संयोगाने होऊ शकाल लखपती
Mangal Vakri 2025
मंगळ देणार पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी; नव्या वर्षाच्या सुरूवातीला ‘या’ तीन राशींना मिळणार प्रत्येक कामात यश
Lucky Numerology 2025
Lucky Numerology 2025: ‘या’ तिथीला जन्मलेल्या लोकांचा नववर्षात होणार भाग्योदय, बँक बॅलन्स वाढणार, नोकरीत मिळणार यश
Kark Rashifal 2025
Kark Rashifal 2025: कर्क राशीसाठी कसे असेल नववर्ष २०२५? कोणत्या ग्रहाचे गोचर ठरणार लाभदायी, कोणाची होईल कृपा?
budh uday 2024
१२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख
Shukra Rahu Yuti Brings Wealth and Prosperity to These 3 Zodiac Signs
Shukra Rahu Yuti 2025 : राहु-शुक्रची होणार युती, या राशींचे नशीब फळफळणार; मिळणार बक्कळ पैसा

मूलांक ८ असणाऱ्या व्यक्तींचा स्वभाव कसा असतो?

मूलांक ८ असणारे लोक फार बोलके नसतात आणि त्यांना दिखावा करणे आवडत नाही. त्यांना फक्त त्यांच्या कामाची काळजी असते. शनीच्या संथ गतीमुळे या राशीच्या लोकांना जीवनात हळूहळू यश प्राप्त होते. जीवनातील आव्हानांचा ते विचार करत नाहीत; ते काम तन्मयतेने करतात, त्यातून त्यांना प्रत्यक्षात यश मिळते. शनी हा ग्रह मऊ मेणाहून मऊ तर कधी कठीणाहून कटीण अशा दोन टोकात यांची मानसिकता विभागली जाते. म्हणून अशा लोकांच्या स्वभावाचा खरा थांगपत्ता लागत नाही अशा व्यक्ती खूपच मेहनती साहसी व पराक्रमी असतात.

हे ही वाचा<< ११ ते १७ डिसेंबरच्या आठवड्यात ‘या’ राशींना शनी- बुध- शुक्रासह लाभेल लक्ष्मीकृपा; चुटकीसरशी कामं लागतील मार्गी

मूलांक ८ असल्यास २०२४ मध्ये काय फायदा होऊ शकतो?

जरी या लोकांना त्यांच्या आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असला, परंतु २०२४ च्या वर्षात या व्यक्तींवर शनी ग्रहाचा चांगला प्रभाव पडणार आहे. यावर्षात तुमच्या कर्माला नशिबाची साथ लाभू शकते. आपण जर नव्या नोकरीच्या शोधात असाल तर येत्या वर्षात पहिल्याच तिमाहीत आपल्याला मोठी संधी चालून येऊ शकते. तुम्हाला नात्यांमध्ये नव्याने सुरुवात करायची संधी मिळू शकते. परदेश प्रवासाचे योग आपल्या भाग्यात आहेत. तुम्हाला व्यवसायात यश गावसण्याची चिन्हे आहेत. गुंतवणुकीवर भर द्या.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader