Shani Jayanti 2023 Positive Impact on Zodiac Signs: शनिदेवाची यंदाची जयंती १९ मे २०२३ ला जुळून आली आहे. योगायोगाने हा दिवस अत्यंत शुभ व लाभदायक असल्याचे वैदिक ज्योतिषशास्त्र अभ्यासक सांगतात. याच दिवशी तब्ब्ल पाच मोठे राजयोग जुळून आले आहेत. मात्र यातील एक योग मात्र अत्यंत दुर्मिळ आहे. तब्बल ३० वर्षांनंतर शोभना योग व शनी जयंती असे समीकरण जुळून आले आहे. या काळात शनिदेव स्वराशीत म्हणजेच कुंभमध्ये असल्याने हा योग जुळून आल्याचे अभ्यासक सांगतात. हा राजयोग काही राशींसाठी अत्यंत लाभदायक व सकारात्मक ठरू शकतो. या तीन भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा लाभ होण्याची चिन्हे आहेत हे पाहूया…

मकर रास (Capricorn Zodiac)

मकर राशीचे स्वामी शनी देव स्वतः आहेत. मकर ही शनीच्या प्रिय राशींपैकी एक मानली जाते. मकर राशीवर शनीच्या ढैय्या व साडे सातीचा प्रभाव सुद्धा कमी होत असल्याचे ज्योतिष तज्ज्ञ सांगतात. मकर राशीचा मूळ स्वभाव नेतृत्व करणारा असतो. येत्या काळात याच स्वभावातून काही प्रमाणात धनलाभ होण्याचे सुद्धा योग आहेत. तुमचे संवाद कौशल्य सुधारल्यास तुम्हाला प्रचंड धनलाभ मिळू शकतो.

Gurupushyamrut yog
Gurupushyamrut Yoga : गुरुपुष्यामृताचा शुभ योग साधण्यासाठी उमेदवारांची धडपड, मुहुर्तावर कोण-कोण अर्ज भरणार?
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Friend s wife sexually assaulted
पिंपरी: मित्राच्या पत्नीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार; अत्याचाराचे चित्रीकरण, पीडितेसह सर्वजण उच्चशिक्षित
Sun Transit In Libra 2024
उद्यापासून सूर्याचा जबरदस्त प्रभाव; राशीपरिवर्तनाने ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा
Loksatta article on A Naxalist thought GN SaiBaba
लेख: बिनबंदुकीचा नक्षलवादी नायक की खलनायक?
GN Saibaba, GN Saibaba passes away,
बिनबंदुकीचा नक्षलवादी- नायक की खलनायक?
Charlotte Wood novel Stone Yard Devotional
बुकरायण: आस्तिक-नास्तिकतेचे मुक्त चिंतन…
AI godfather Geoffrey Hinton
अग्रलेख : प्रज्ञेचे (अ)प्रस्तुत प्राक्तन!

तूळ रास (Libra Zodiac)

३० वर्षांनी यंदा शनीदेव जेव्हा कुंभ राशीत स्थिर झाले तेव्हाच त्यांचा उच्च प्रभाव तूळ राशीत सुद्धा दिसू लागला. या व्यक्ती त्यांच्या उत्तम कामाचा मोबदला मिळवू शकतील असा हा कालावधी आहे. या दरम्यान तुम्हाला निरपेक्ष भावनेने प्रचंड यश, प्रसिद्धी, सुख समृद्धी लाभू शकते. आईवडिलांसह नाते आणखी घट्ट होण्याची ही वेळ ठरू शकते. तुम्हाला व्यवसायात अनेकनावर विश्वास ठेवावा लागेल पण त्याआधी पूर्ण तपास व अभ्यास अत्यंत महत्त्वाचा ठरेल.

हे ही वाचा<< ४८ तासांनी गजकेसरी राजयोगाने ‘या’ राशींना अचानक धनलाभ होणार? प्रचंड संपत्तीसह मिळू शकते लक्ष्मी कृपा

कुंभ रास (Aquarius Zodiac)

कुंभ राशीचे मूळ स्वामी स्वतः शनिदेव आहेत त्यात ते यंदा कुंभ राशीतच विराजमान आहेत. अर्थातच या दुग्ध शर्करा योगाचा तुम्हाला प्रचंड फायदा करून घेता येऊ शकतो. शनीने आपल्याला राशीला स्वाभिमान व मेहनतीचे गुण दिले आहेत. याच रूपातून तुम्हाला मान- सनम व धनलाभ मिळू शकतो. तुमची मूल्ये जपा. तुम्ही वाणीतून काही जणांची मने दुखावू शकता पण जे योग्य आहे त्याच बाजूने उभे राहा.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)