Shani Margi Date: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा कोणत्याही राशीत भ्रमण करत असताना सरळ मार्गाने प्रवास करू लागती तेव्हा त्याला मार्गी होणे असे म्हणतात. शनीदेव सध्या वक्र स्थितीत आहेत व येत्या काही महिन्यात त्यांची चाल पुन्हा सरळ होणार असून ते कुंभ राशीतच प्रवास सुरु ठेवतील. दरम्यान शनिदेवाची चाल सरळ होताच काही राशींना अत्यंत लाभदायक स्थिती अनुभवता येऊ शकते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शनीला सर्व राशींच्या कुंडलीत महत्त्वपूर्ण स्थान आहे त्यामुळे शनीदेव मार्गी होऊन जरी कुंभ राशीत भ्रमण करणार असले तरी त्याचा प्रभाव सर्वच राशींवर दिसून येऊ शकतो. शनी मार्गी झाल्यावर काही राशींच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे तर काहींचा अडीच वर्षाचा कष्टाचा कालावधी संपुष्टात येणार आहे. या भाग्यवान राशींमध्ये आपला समावेश आहे का हे जाणून घेऊया..
शनी मार्गी होताच ‘या’ राशींना होणार अपार धनलाभ?
वृषभ रास (Taurus Zodiac Horoscope)
शनी मार्गी होताच वृषभ राशीच्या लोकांचे नशीब बदलण्याची चिन्हे आहेत. शनीच्या प्रभावाने आपण सुरु केलेल्या प्रत्येक कामात यश मिळू शकते. अनेक कामे मार्गी लागल्याने अडकून पडलेले पैसे सुद्धा परत मिळू शकतात, नोकरदार मंडळींना एखादी मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी लागू शकते पण याचा थेट प्रभाव आपल्या पद व पगारावर सुद्धा दिसून येऊ शकतो. शनी मार्गी होताच आपल्याला आजवर केलेल्या कठीण परिश्रमाचे शुभ व लाभदायक फळ प्राप्त होऊ शकते. आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील.
मिथुन रास (Gemini Zodiac Horoscope)
शनीच्या मार्गी अवस्थेत मिथुन रास ही सर्वात सुखी रास ठरू शकते. याचे मुख्य कारण म्हणजे २०२३ च्या सुरुवातीलाच मिथुन राशीची शनीच्या साडेसातीतून मुक्ती झालेली आहे. शनी आपल्याला वाडवडिलांच्या व स्वतःच्या गुंतवणुकीच्या रूपातील मोठा धन परतावा मिळवून देऊ शकतो. व्यवसायात मोठा फायदा व अत्यंत कामाचे काही लोक जोडले जाण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला वाणीवर नियंत्रण ठेवून तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. प्रवासाचे योग आहेत. घसा सांभाळावा.
तूळ रास (Libra Zodiac Horoscope)
शनी मार्गी झाल्याने तूळ राशीच्या कौटुंबिक सौख्यात भर पडू शकते. विवाहइच्छुक मंडळींना लवकरच एखादे उत्तम स्थळ चालून येऊ शकते. कामाच्या ठिकाणी मात्र तुमची गती कमी राहील. तुम्हाला मूळ नोकरीच्या शिवाय अन्य माध्यमातूनच धनलाभ होऊ शकतो. गुंतवणुकीवर भर द्या व आर्थिक निर्णय घेताना एखादा तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.
धनु रास (Sagittarius Zodiac Horoscope)
शनीची सरळ चाल तुम्हाला आनंदाचा काळ अनुभवण्याची सुवर्णसंधी देऊ शकते. या काळात तुम्हाला काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. नोकरदार मंडळींना कामामध्ये प्रगतीचे योग आहेत. ऑफिसमध्ये एखादी मोठी जबाबदारी अंगावर येऊ शकते. तुम्हाला सहकाऱ्यांचे मोठे पाठबळ मिळू शकते. शनीची चाल तुम्हाला शैक्षणिक प्रगतीसाठी बूस्ट देऊ शकते. व्यवसायात वृद्धी होऊ शकते.
हे ही वाचा<< शुक्र वक्री होऊन ‘या’ राशींच्या लोकांना बनवणार मालामाल? ‘या’ दिवसापासून तिजोरीत लक्ष्मी कृपा राहू शकते
शनी मार्गी कधी होणार? (Shani Margi)
शनीदेव १७ जून २०२३ ला वक्री झाले होते आणि आता थेट १४० दिवसांनी म्हणजेच ४ नोव्हेंबर २०२३ ला मार्गी होणार आहेत विशेष म्हणजे या दिवशी शनिवार सुद्धा आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यास अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू समजू नये)