Shani Nakshatra Parivartan 2023: शनिदेव हे कलियुगातील न्यायाधिकारी व दंड देवता म्हणून ओळखले जातात. प्रत्येक राशीच्या जातकांना शनिदेव आपल्या कर्मानुसार फळ देतात असे ज्योतिष अभ्यासक म्हणतात. शनिदेवाचे गोचर हे मानवी जीवनावर प्रचंड प्रभाव टाकतात अशी भाविकांची श्रद्धा असते. शनी हे सध्या कुंभ राशीत स्थिर आहेत. १५ मार्चला शनिदेवांनी शतभिषा नक्षत्रात प्रवेश घेतला होता हे नक्षत्र राहूच्या स्वामित्वाचे मानले जाते. येत्या १७ ऑक्टोबरपर्यंत शनिदेव हे शतभिषा नक्षत्रातच राहणार आहेत. त्यामुळे येत्या पाच महिन्यात काही राशींना अत्यंत सावध राहून या मोठ्या उलाढालींना सामोरे जावे लागू शकते. या राशी कोणत्या व त्यांना काय काळजी घ्यावी लागेल हे पाहूया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्क रास (Cancer Zodiac)

शनीचे नक्षत्र परिवर्तन कर्क राशीला काहीसे संकट घेऊन येऊ शकते. या काळात तुम्हाला आर्थिक उलाढाली करताना आंधळेपणाने विश्वास टाकणे टाळायला हवे. तुम्हाला अन्य ग्रहांच्या गोचराने लाभदायक स्थिती अनुभवता येऊ शकते पण तुम्हाला प्रत्येक काम हे फुंकून करावे लागणार आहे. तुम्हाला येत्या काळात उष्णतेमुळे काही आरोग्य समस्यां जाणवू शकतात विशेषतः त्वचेची काळजी घ्या. तुम्हाला नव्या मालमत्तेच्या खरेदीची संधी मिळू शकते पण अशावेळी कोणतेही कागदपत्रे साइन करताना नीट पडताळणी करून घ्या. कामाच्या ठिकाणी हितशत्रूंपासून स्वतःचा बचाव करण्याकडे लक्ष द्या.

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)

शनिदेवाचे नक्षत्र परिवर्तन वृश्चिक राशीला मानसिक तणावाची परिस्थिती निर्माण करू शकते. धन- संपत्तीची काळजी घ्या. नाहक खर्च टाळा. आरोग्याची हेळसांड टाळा. तुम्हाला निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो हे टाळण्यासाठी नीट रुटीन सेट करा. वाहन चालवताना व प्रवास करताना विशेष खबरदारी बाळगा. तुमच्या बोलण्यातून इतरांचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्या.

हे ही वाचा<<१४ जून पर्यंत ‘या’ राशींना सोन्याचे दिवस? लक्ष्मी धन देऊन नशिबाला मिळू शकते सूर्याची झळाळी

मीन रास (Pisces Zodiac)

शनीचा शतभिषा नक्षत्रातील प्रवेश तुम्हाला काही प्रमाणात तणावाचा अनुभव देऊ शकतो. आपल्या राशीत यंदा शनीच्या प्रभावाने साडेसाती सुरु झाली आहे. त्यामुळे आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. शनी जयंतीच्या निमित्ताने तुम्हाला काही काळ आराम मिळू शकतो. चारण्याची कोंबडी आणि भरण्याचा मसाला अशी परिस्थिती टाळण्यासाठी पुरेपूर मेहनत घ्यावी लागू शकते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)