Aquarius Rashi Bhavishya Marathi 2024: कुंभ राशीचा स्वामी शनी आहे. प्रगल्भ ज्ञान, बुद्धिमत्ता, सखोल अभ्यास आणि कष्ट करण्याची तयारी ही शनीची वैशिष्ट्ये आहेत. कुंभ राशीच्या व्यक्तींमध्ये या सगळ्या बाबी पुरेपूर भरलेल्या आढळतात. या व्यक्ती आपल्या कामात कायम मग्न असतात. कंटाळा म्हणजे काय ते यांना जणू ठाऊकच नसते. शिकणे, ज्ञान ग्रहण करणे, या ज्ञानाचा योग्य प्रकारे उपयोग करणे याची कुंभ राशीच्या व्यक्तींना मनापासून आवड असते. इतर छानछोकी, मानापमान यांचे त्यांना फारसे भान नसते. अशा या कुंभ राशीच्या व्यक्तींना २०२४ हे वर्ष कसे असेल हे पाहूया.

यंदा पूर्ण वर्षभर शनी आपल्या कुंभ राशीतूनच भ्रमण करेल. साडेसातीचा हा मधला टप्पा आहे. बऱ्याच कामांमध्ये दिरंगाई होईल. एप्रिल अखेरपर्यंत गुरू तृतीयातील मेष राशीतून भ्रमण करेल. आत्मविश्वास बळावेल. मोठ्या जबाबदाऱ्या स्वतःहून अंगावर घ्याल आणि पूर्ण कराल. १ मे रोजी गुरू चतुर्थ स्थानातील वृषभ राशीत प्रवेश करेल. गुरुबल कमजोर होईल. साडेसाती आणि कमजोर गुरुबल यांचा एकत्रित परिणाम अनुभवायला मिळेल. महत्त्वाची कामे रखडतील. लांबणीवर पडतील. पूर्ण वर्ष राहू आणि नेपच्यून द्वितीय स्थानातील मीन राशीतून भ्रमण करतील. आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जाईल. अष्टमातील कन्या राशीतून केतू वर्षभर भ्रमण करेल. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींनी बेजार व्हाल. वेळेवर औषधोपचार घ्यावेत. व्ययस्थानातील मकर राशीत प्लूटो भ्रमण करेल. मे अखेरीपर्यंत तृतीयातील मेष राशीतून हर्षल भ्रमण करेल. १ जून रोजी हर्षल चतुर्थातील वृषभ राशीत प्रवेश करेल, संमिश्र फळे मिळतील. प्रवासयोग येतील तसेच घराच्या बाबतीतील निर्णय विचारपूर्वक घ्यावे लागतील. अशा या महत्त्वाच्या ग्रहबदलांसह इतर ग्रहांच्या भ्रमणांचा विचार करता २०२४ या वर्षाचे ग्रहफल कसे असेल हे पाहूया…

Malavya Yoga and Kendra Trikon Rajyoga 2025
२०२५मध्ये ग्रहांचा अद्भुत संयोग! मीन राशीत निर्माण होईल केंद्र त्रिकोण-मालव्य राजयोग; नोकरीत होईल पदोन्नती, अचानक होईल आर्थिक लाभ
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Guru Asta 2025 Guru will set for 27 days in the new year
Guru Ast 2025: नवीन वर्षात २७ दिवसांनी अस्त होणार गुरू! ‘या’ राशींची होणार चांदी, झटपट वाढेल पगार
shani gochar 2025 zodiac sign today horoscope in marathi
Shani Gochar 2025 : २०२५ मध्ये शनीचे मीन राशीत गोचर, ‘या’ राशींच्या नशिबाचं टाळं उघडणार; रिकामी तिजोरी धनधान्याने भरण्याचे संकेत
surya gochar 2024 astrology horoscope in marathi
Surya Gochar 2025 : १५ डिसेंबरपासून करोडपती होऊ शकतात ‘या’ तीन राशींचे लोक; सूर्यदेवाच्या कृपेने जगू शकतात राजासारखे जीवन?
Mangal Rashi Parivartan 2024
४२ दिवसानंतर नुसता पैसा; मंगळाच्या राशी परिवर्तनाने ‘या’ तीन राशीच्या व्यक्ती होणार भाग्यवान
Budh Uday In Scorpio 2024 horoscope 2025
Budh Uday 2024 : ९ तासांनंतर बुध उदयाने एका झटक्यात ‘या’ राशींच्या लोकांच्या नशिबाला मिळेल कलाटणी; तुम्हीही व्हाल कोट्यधीश?
Guru gochar gajkesari rajyog horoscope 2025 in marathi
२०२५ चा गजकेसरी राजयोग ‘या’ तीन राशींची करु शकतो आर्थिक भरभराट, हत्तीवरुन वाटाल साखर

जानेवारी :

नव्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच नव्या उमेदीने कामाला सुरुवात कराल. गुरूच्या साहाय्याने मोठया जबाबदाऱ्या पार पाडाल. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात उत्तम गती मिळेल. सराव आणि उजळणी मनापासून कराल. नोकरी व्यवसायात व्यवहारापालीकडे जाऊन इतरांची मदत कराल. ज्येष्ठ व्यक्तींकडून वाहवा होईल. विवाहोत्सुक मुलामुलींनी जोडीदाराची निवड करावी. विवाहित दाम्पत्यांना एकत्रितपणे प्रवासयोग येईल. नातेवाईकांची साथ चांगली मिळेल. घर, प्रॉपर्टीचे काम वेग घेईल. संबंधीत कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. गुंतवणूकदारांना अभ्यासपूर्ण केलेल्या गुंतवणूकीतून चांगला लाभ मिळेल. सर्व गोष्टींचा अति विचार केल्याने वैचारिक थकवा येईल.

फेब्रुवारी :

नव्या संकल्पना अमलात आणताना इतरांचा रोष पत्करावा लागेल. आपले विचार काळाच्याही पुढे धावणारे आहेत. इतरांच्या पचनी पडायला वेळ लागेल. विद्यार्थी वर्गाच्या बुद्धिमत्तेची वाखाणणी होईल. परीक्षेची तयारी पूर्ण होईल. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हिमतीने पुढे जाल. नोकरी व्यवसायात उत्कर्षकारक घटना घडतील. अपेक्षित बदलीचे योग संभवतात. देशांतर्गत, परदेशात प्रवास कराल. विवाहोत्सुक मंडळींनी शोधकार्यात रस घ्यावा. विवाहित दाम्पत्यांनी जोडीदाराला समजून घेणे इष्ट ठरेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती योग्य मार्गदर्शन करतील. प्रॉपर्टीची कागदपत्रे , नियम अटी यांचे बारकाव्याने वाचन केल्यास आपल्या हिताचे ठरेल. डोळे आणि त्वचा यांची विशेष काळजी घ्यावी.

मार्च :

आर्थिक वर्ष पूर्ण होताना गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल. मेहनत आणि अभ्यास यांचे चांगले फळ मिळेल. विद्यार्थ्यांच्या एकाग्रतेला तोड नाही, त्यांचे कष्ट वाया जाणार नाहीत. नोकरी व्यवसायात आपली कामगिरी आणि दक्षता विशेष उल्लेखनीय असेल. काही महत्त्वाच्या बाबी निर्भीडपणे वरिष्ठांच्या निदर्शनास आणून द्याल. विवाहोत्सुक मंडळींनी सुयोग्य जोडीदार निवडण्याची चळवळ सुरू ठेवावी. विवाहित दाम्पत्यांच्या दृष्टीने हा महिना आनंदाचा असेल. सहवासाने प्रेम वाढेल. कौटुंबिक समारंभात सहभागी व्हाल. घर, मालमत्ता याबाबतची बोलणी सुरू होतील. आपले मत स्पष्टपणे मांडाल. उष्णतेचे विकार बळावतील. उत्सर्जन संस्थेवर ताण येईल.

एप्रिल :

संयम आणि हिंमत यांचा सुयोग्य समतोल साधून महत्त्वाचे निर्णय घेता येतील. या निर्णयाचा भविष्यात मोठा लाभ होणार आहे. विद्यार्थी वर्गाने जिद्दीच्या बळावर उंच झेप घ्यावी. अभ्यास, परीक्षा यांमध्ये व्यग्र राहाल. उच्च शिक्षणासाठी घेतलेली मेहनत फलित होईल. नोकरी व्यवसायात चांगली भरभराट होईल. कामानिमित्त प्रवास कराल. या प्रवासामुळे आर्थिक लाभ होतील. वरिष्ठांकडून कामाची दखल घेतली जाईल. विवाहोत्सुक मंडळींना वधुवर संशोधनात यश मिळेल. विवाहित दाम्पत्यांना आपल्या जोडीदाराचा अभिमान वाटेल असे कार्य त्याच्या हातून घडेल. घर, प्रॉपर्टीच्या संबंधीत कामकाजासाठी कायदेशीर मार्गदर्शन मिळेल. अडचणी येतील पण त्यातून मार्ग निघेल. अचानक ताप, सर्दी, संसर्गजन्य आजारांनी त्रस्त व्हाल.

मे :

१ मे रोजी गुरू चतुर्थातील वृषभ राशीत प्रवेश करेल. गुरुबल कमजोर होणार आहे. अडीअडचणी, दिरंगाई असे परिणाम अनुभवास येतील. साडेसातीचा प्रभाव देखील असेलच. यातूनच मार्ग काढत पुढे जायचे आहे. विद्यार्थी वर्गासाठी नवी आव्हाने पुढे उभी राहतील. स्पर्धा परीक्षा, उच्च शिक्षणातील प्रवेश परीक्षा यांचा अभ्यास करताना एकाग्रता, मेहनत आणि व्यवहार ज्ञान यांची गरज पडेल. नोकरी व्यवसायात व्यवस्थापनाची महत्वपूर्ण जबाबदारी पार पाडाल. कामाचा ताण जाणवेल. अशावेळी जवळचा मित्र, मैत्रीण, पालक वा जोडीदारासह आपल्या भावना व्यक्त केल्यास हलके वाटेल. विवाहित मंडळींना जोडीदाराची साथ महत्वपूर्ण ठरेल. घराच्या बाबतीत वाद वाढतील. मोठी जोखीम टाळा.

जून :

१ जून रोजी हर्षल चतुर्थातील वृषभ राशीत प्रवेश करेल. तसेच मंगळ तृतीय स्थानातील मेष राशीत प्रवेश करेल. हिंमत आणि आत्मविश्वास यांच्या बळावर अनेक कामे यशस्वीपणे पूर्ण कराल. साडेसातीमुळे विलंब झाला तरी चिकाटी टिकवून ठेवाल. विद्यार्थी वर्गाने नव्या शैक्षणिक वर्षात सुरुवातीपासूनच कंबर कसून मेहनत घ्यावी. शनी कर्मकारक ग्रह असल्याने मेहनतीचे योग्य फळ देईल. नोकरी व्यवसायात आपले मत ठामपणे मांडाल. हितशत्रूंना दणदणीत शह द्याल. विवाहोत्सुक मंडळींना गुरूचा राशीबदल तितकासा अनुकूल नाही. त्यामुळे धीराने घ्यावे. विवाहित दाम्पत्यांचे सहजीवन विश्वासाच्या पायावर खुलेल, बहरेल. घर, मालमत्तेसंबंधी व्यवहार फलदायी ठरतील. ओटीपोटाचा त्रास वाढेल.

जुलै :

ऋतुमानानुसार हवेतील बदल लहानमोठे आजार विकार देईल. आहारात शिस्त आणि सातत्य ठेवलेत तरच त्रासाचे प्रमाण कमी होईल. विशिष्ट व्यायामही उपयोगी पडेल. नोकरी व्यवसायात किती तरी गोष्टी आपल्या तत्वात बसणार नाहीत. याचा त्रागा करण्यापेक्षा त्याविरुद्ध आवाज उठवाल. विद्यार्थी वर्गाला तज्ज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन मिळेल. कष्टाला पर्याय नाही हे तर आपण जाणताच. विवाहित मंडळींमध्ये समज गैरसमज वाढतील. शब्दाने शब्द वाढवू नये. घराच्या, प्रॉपर्टीच्या संबंधात बोलणी पुढे सरकतील. गुंतवणूक करताना अतिदक्षता घ्यावी लागेल. नफा तोटा यांचा समतोल साधणे आवश्यक !

ऑगस्ट :

विवाहित मंडळींच्या सहजीवनातील सहजता विचलित होईल. आपल्याकडून समजुतदारीचे पाऊल पुढे टाकावे. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात प्रयत्नपूर्वक लक्ष केंद्रित करावे लागेल. आसपासची अनेक प्रलोभने आपणास ध्येयापासून दूर नेण्याचा प्रयत्न करतील. नोकरी व्यवसायात स्वबळावर मोठी झेप घ्याल. कामानिमित्त केलेला प्रवास लाभदायक ठरेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळणे सोपे नाही. हितशत्रूंचे टोमणे सध्या फक्त ऐकून घ्याल. आपल्या कामातूनच त्यांना योग्य उत्तर मिळेल. घर, प्रॉपर्टी, मालमत्ता याबाबतची कागदपत्रं काळजीपूर्वक वाचावेत. कायदेशीर कार्यवाही करावी लागेल. सर्दी, ताप, कफ यांचा त्रास बळावेल.

सप्टेंबर :

आपले बोलणे स्पष्ट आणि मुद्देसूद असावे. अन्यथा आपल्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेतला जाईल. विद्यार्थी वर्गाला मेहनत आणि सातत्याचे महत्व पटेल. शालेय वा महाविद्यालयीन प्रकल्प ठरलेल्या वेळेत उत्तम प्रकारे पूर्ण कराल, शिक्षकांची शाबासकी मिळवाल, यातून आपला आत्मविश्वास बळावेल. नोकरी व्यवसायात तंत्रज्ञानाच्या मदतीने मोठे आणि महत्त्वाचे काम आखीव रेखीवपणे पूर्ण होईल. विवाहोत्सुक मंडळींनी वधुवर संशोधन सुरू ठेवले तरी मनपसंद जोडीदार मिळणे थोडे कठीण जाईल. विवाहित दाम्पत्यांमधील गैरसमज दूर होऊन एकमेकांशी सूर जुळतील. गुंतवणूकदारांचे भाग्य उजळेल. अर्थिक लाभ होईल. मित्रमैत्रिणींच्या भेटींमुळे कामातील ताणतणाव दूर होईल.

हे ही वाचा<< वृश्चिक राशीत यंदा सर्वात मोठा ग्रहबदल! ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत धनलाभ, हितशत्रू व आरोग्याची स्थिती कशी असेल, वाचा

ऑक्टोबर :

मित्रमंडळी, आप्तेष्ट यांच्या भेटी झाल्याने नवा उत्साह मिळेल. नव्या विषयांचा अभ्यास कराल. कलागुणांना वाव मिळेल. विद्यार्थी वर्गाला परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी, उजळणीसाठी वेळ अपुरा पडेल. यासाठी वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. नोकरी व्यवसायात वरिष्ठ मंडळी अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतील. पण आपल्या बुद्धीमत्तेच्या जोरावर तोडीसतोड उत्तरे सादर करून त्यांचा हल्ला परतवून लावाल. विवाहित दाम्पत्यांच्या नात्याबाबत चढ उतार अनुभवास येतील. तत्त्वांपेक्षा नात्याला महत्व दिलेत तर प्रश्न लवकर सुटतील. तुटेपर्यंत ताणणे योग्य नाही. मालमत्तेसाठी कायदेपंडितांकडून निर्णायक सल्ला घ्यावा. पडझड झाल्यास जखमेत पाणी होऊन पू होण्याची शक्यता, काळजी घ्या.

हे ही वाचा<< Sagittarius Yearly Horoscope 2024 : धनु राशीच्या लोकांचे २०२४ हे वर्ष कसे जाईल? कोणत्या महिन्यात चमकेल भाग्य? जाणून घ्या…

नोव्हेंबर :

काटेकोरपणा, नेमकेपणा आणि सखोलपणे विचार करणे या आपल्या स्वभाव वैशिष्ट्यांमुळे अडचणींवर मात करणे शक्य होईल. हिंमत न हरता जिद्दीने आगेकूच कराल. विद्यार्थी वर्गाच्या साथीला शनीची चिकाटी उपयोगी पडेल. साडेसातीच्या प्रभावामुळे अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरी व्यवसायातील कामकाजाच्या पद्धतीत बदल होईल. वेळेची गणिते बदलतील. व्यावसायिक संबंध कामी येतील. कामानिमित्त जोडीदारापासून, कुटुंबापासून दूर राहावे लागेल. गुंतवणूकदारांनी मर्यादित जोखीम पत्करून गुंतवणूक करावी. उष्णतेमुळे डोळे, त्वचा यांचे आरोग्य बिघडेल. तसेच पित्ताचा त्रास होईल.

हे ही वाचा<< या’ महिन्यात खुलणार भाग्य अन् करिअरमध्ये मिळणार नव्या संधी; वाचा मकर राशीचे वार्षिक भविष्य

डिसेंबर :

२०२४ या वर्षातील हा शेवटचा महिना बऱ्याच चांगल्या गोष्टी देईल. विद्यार्थी वर्गाला मेहनतीचे उत्तम फळ मिळेल. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे परीक्षेचे तंत्र आत्मसात करता येईल. नोकरी व्यवसायातील कामात स्वतःला झोकून द्याल. मेहनत आणि श्रम यासह विश्रांतीसाठी सुध्दा वेळ राखून ठेवावा. त्यामुळे आपल्या कामाची पत कायम चांगली राहील. विवाहित दाम्पत्यांचे सहजीवन आनंददायी असेल. संतानप्राप्तीचे योग खडतर आहेत. १३ डिसेंबरला चतुर्थातील हर्षल वक्र गतीने तृतीयातील मेष राशीत प्रवेश करेल. आत्मविश्वास वाढेल. परिस्थितीशी टक्कर द्यायची तयारी दाखवाल. अन्यायाविरुद्ध आवाज उठवाल. गुंतवणूकीतून भरपूर लाभ मिळेल. हवामानाचे तंत्र बिघडल्यामुळे आणि प्रचंड प्रदूषणामुळे श्वसनाचे त्रास वाढतील.

अशा प्रकारे २०२४ या वर्षात गुरुबदलाचा आणि साडेसातीचा विशेष प्रभाव दिसून येईल. विवाहोत्सुक मंडळींचे विवाह ठरणे , संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करणाऱ्या दाम्पत्यांचे प्रयत्न सफल होणे तसेच नोकरी व्यवसायात स्थैर्य मिळणे या गोष्टींचा लाभ एप्रिल अखेरपर्यंत कुंभ राशीच्या व्यक्तींना होईल. १ मे नंतर गुरुबल कमजोर झाल्याने या संबंधित फळ मिळण्यास विलंब होईल, अडथळे येतील. घर, प्रॉपर्टी संबंधित कामे लांबणीवर पडतील. दिशाभूल सुद्धा होऊ शकते. सतर्क राहणे महत्त्वाचे ! काळजीपूर्वक पावले टाकल्यास हे वर्ष आपणास आनंदाचे जाईल!

Story img Loader