Weekly Horoscope: वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार येऊ घातलेला आठवडा म्हणजेच, १३ फेबुवारी ते १९ फेब्रुवारी हा अनेक महत्त्वपूर्ण घडामोडींनी भरलेला असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे १३ फेब्रुवारीला शनी व सूर्याची युती होणार आहे तर आठवड्याचा शेवट हा महाशिवरात्रीसह होत आहे. १४ फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे आणि कुंभ राशीत शनी- सूर्य- बुधाने बनलेला त्रिगही योग यामुळे अनेक राशींच्या कुंडलीत मोठे बदल होण्याचे संकेत आहेत. फेब्रुवारी महिन्याचा तिसरा आठवडा हा ४ राशींसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. केवळ आर्थिक किंवा करिअरच्या प्रगतीचाच नव्हे तर येत्या काळात तुमच्या मानसिक व कौटुंबिक सुखातही वृद्धी होण्याचे योग आहेत. या भाग्यवान राशी कोणत्या व त्यांना नेमका कसा फायदा होऊ शकतो हे जाणून घेऊयात.

मेष (Aries Zodiac)

मेष राशीत गुरु स्थित असल्याने येणारा आठवडा हा मेष राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो. आपल्याला वाणीवर नियंत्रण ठेवावे लागेल, जितकं गोड बोलून काम होईल तितकं करून घ्या, जेणेकरून तुम्हाला वादविवादाने प्रगतीत अडथळा येण्याचा प्रश्नच उरणार नाही. गुंतवणुकीसाठी येणारा आठवडा हा उत्तम ठरू शकतो. शेअर मार्केटमधुन धनलाभाचे योग आहेत पण सतर्क राहून तज्ज्ञांचा सल्ला घेणे उचित ठरेल

Shukra Nakshatra parivartan 2024
उद्यापासून पडणार पैशांचा पाऊस; शुक्राच्या नक्षत्र परिवर्तनाने ‘या’ तीन राशींना होणार भौतिक सुखाची प्राप्ती
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Rahu Gochar 2025
Rahu Gochar 2025 : राहु बदलणार चाल, पडणार पैशांचा पाऊस! ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
Surya Shani Yuti 2025
२०२५ ची सुरूवात ‘या’ तीन राशींसाठी नुकसानदायक; दोन मोठ्या ग्रहांच्या एकत्र येण्याने आर्थिक समस्या उद्भवणार
navpancham yog in kundali
शुक्र-गुरू बनवणार नवपंचम राजयोग; ‘या’ तीन राशींना मिळणार पैसाच पैसा
Surya Gochar 2024
Surya Gochar 2024 : १० दिवसानंतर पालटणार तीन राशींचे नशीब, सूर्य देवाच्या कृपेने मिळणार अपार पैसा अन् धन
Saturn-Venus gochar 2024
आजपासून शनी-शुक्र देणार नुसता पैसा ‘या’ तीन राशींचे चमकणार भाग्य
budh uday 2024
१२ डिसेंबरपासून नुसता पैसा; बुध ग्रहाचा उदय ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना देणार धन-संपत्तीचे सुख

वृषभ (Taurus Zodiac)

या वर्षाच्या सुरवातीलाच वृषभ राशीत मंगळ वक्री झाल्याने संपूर्ण २०२३ हे वर्ष वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. आपल्याला फेब्रुवारी महिन्यात जोडीदाराची साथ लाभू शकते. वैभव व सौभाग्य वाढवणारा हा आठवडा असू शकतो. करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्याची संधी आपल्या नशिबात येऊ शकते. नोकरदार महिलांसाठी अत्यंत शुभ योग तयार होत आहेत. व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होऊ शकतो. तुम्हाला जोडीदाराकडून मान- सन्मान व प्रेम भरपूर लाभू शकते. कौटुंबिक कलह दूर होण्यास साजेसा असा हा आठवडा असणार आहे.

कन्या (Virgo Zodiac)

कन्या राशीसाठी येऊ घातलेला आठवडा आरोग्याच्या समस्यांवर समाधान देणारा ठरू शकतो. कोर्टाच्या खटल्यांमध्ये तुमच्या बाजूने निर्णय येण्यासाठी उत्तम योग आहेत. तुम्हाला कामाच्या ठिकाणी मान- सन्मान लाभू शकतो. गुंतवणुकीसाठी अत्यंत शुभ काळ आहे. प्रेमात एक पाऊल पुढे जाण्याची संधी लाभेल. विचारपूर्वक निर्णय घ्या.

हे ही वाचा<< महाराष्ट्रात सत्ताबदल? पालिका निवडणुकांच्या आधी ज्योतिषांनी मांडली सेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादीसह ‘या’ पक्षांची कुंडली

तूळ (Libra Zodiac)

तूळ राशीला येणारा आठवडा हा तोलून मोलून संधी देणारा असेल पण संधीचे सोने केल्यास आपल्याला धनलाभाचे प्रबळ योग आहेत, कामाच्या ठिकाणी ज्यांना आपण शत्रू समजत होतात त्यांच्याकडून मदतीचा हात पुढे येऊ शकतो. नोकरदार मंडळींना वरिष्ठांची साथ लाभेल. पगारवाढीसाठी तुमचे येत्या आठवड्यातील काम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. प्रवासाचे योग आहेत.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader