Mangal Gochar and Budh Uday 2023: वैदिक ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार मे महिन्यातील १० तारीख ही १२ राशींसाठी अत्यंत मोठे बदल घेऊन येणारी ठरू शकते. या दिवशीच मंगळ ग्रहा हा बुध ग्रहाच्या स्वामित्वाची रास म्हणजेच मिथुन मधून मार्गी होती चंद्राच्या स्वामित्वाची रास कर्क मध्ये प्रवेश घेणार आहे. १ जुलै २०२३ पर्यंत मंगळ कर्क राशीत स्थिरावणार आहे आणि त्यानंतर सूर्याच्या स्वामित्वाच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. १० मेलाच बुध ग्रह सुद्धा उदयस्थितीत येणार आहे. यामुळे येत्या ४ दिवसात काही राशींना भाग्योदयाचे योग आहेत, असे दिसतेय. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार ही उलाढाल मुख्यतः कर्क व मेष राशीत होत असली तरी शनी प्रभावाने याचे उत्तम परिणाम हे शनीप्रिय राशींमध्ये दिसून येऊ शकतात. आता या नशीबवान राशी कोणत्या हे ही पाहूया…
वृषभ रास (Taurus Zodiac)
मंगळ ग्रह गोचर होताच आपल्या व्यक्तिमत्वाला पराक्रम व साहसाचा साज चढू शकतो. आपल्या विरुद्ध उभी असणारी लोकं सुद्धा आपल्या बाजूने वळू शकतात. तुमच्या कुंडलीत प्रवासाचे योग दिसत आहेत. सामाजिक क्षेत्रात मान वाढून तुमच्या खांद्यावर नव्या जबाबदाऱ्या येऊ शकतात. घरात सुद्धा एखादे शुभ कार्य योजले जाऊ शकते. व्यर्थ वाद टाळावा व डोके शांत ठेवावे. खर्चावर नियंत्रण ठेवा. नव्या गुंतवणुकीची संधी आहे.
सिंह रास (Leo Zodiac)
मंगळ गोचर झाल्याने आपल्याला परदेश वारीचे योग दिसत आहेत, याचे मुख्य कारण म्हणजे मंगळ देव हे कर्क राशीत येताच आपल्या गोचर कुंडलीत ११ व्या स्थानी येणार आहेत, हे स्थान तुमच्या प्रगतीचे व स्थितीबदलाचे मानले जाते. कोर्टाच्या खटल्यांमध्ये तुमच्या बाजूने निकाल लागू शकतो. आपल्याला कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल पण त्यातही काही क्षण विसावा लाभू शकतो. तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. सूर्यदेवच आपल्या राशीला अधिक त्रासदायक ठरू शकतात.
कन्या रास (Virgo Zodiac)
मंगळ गोचर व बुध उदय हे कन्या राशीच्या आर्थिक प्रगतीला वेग देण्याचे काम करू शकतात. नोकरीच्या ठिकाणी आपली प्रशंसा झाल्याने हितशत्रू वाढण्याची शक्यता आहे. मित्रांसह नातं सुधारण्यास मदत होऊ शकते. तुम्हाला शेअर बाजारात गुंतवणुकीची सुरुवात करायची असल्यास आता एक मोठी संधी आपल्या दिशेने चालून येऊ शकते. आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढू शकतात.
कुंभ रास (Aquarius Zodiac)
वर म्हंटल्याप्रमाणे शनीच्या स्वामित्वाच्या कुंभ राशीत बुध ग्रहाचा उदय अत्यंत प्रभावी ठरू शकतो. आपल्या कामाच्या कक्षा रुंदावू शकतात. नोकरीबदलाचे संकेत आहेत. व्यवसायात आवड निर्माण होऊ शकते. खर्च सुद्धा वाढताना दिसत आहेत पण खर्चाप्रमाणेच मिळकत वाढल्याने तुम्हाला राजेशाही थाट अनुभवता येऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)