Navpancham Yog: ज्योतिषशास्त्रात शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता म्हटले जाते. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शनी शुभ स्थितीत असतो अशा व्यक्तींना आयुष्यात अनेक सुख-सुविधा प्राप्त होतात. नवग्रहांमध्ये शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे. त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करण्यासाठी जवळपास अडीच वर्षाचा कालावधी लागतो. २९ मार्च २०२५ रोजी शनीने मीन राशीत प्रवेश केला असून २०२७ पर्यंत तो याच राशीत राहणार आहे. त्यामुळे अडीच वर्षाच्या काळात शनीची कोणत्याना कोणत्या ग्रहाबरोबर युती होईल किंवा त्याची दृष्टी एखाद्या ग्रहावर पडेल. ५ एप्रिल रोजी मंगळ आणि शनी एकमेकांपासून १२० डिग्रीवर असतील.

ज्योतिषशास्त्रानुसार, मंगळ आणि शनी एकमेकांपासून नवम आणि पंचम भावात म्हणजेच १२० डिग्रीवर असतात. ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होतो. ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. या योगाचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

शनी-मंगळ ‘या’ तीन राशींना करणार मालामाल

कर्क

कर्क राशीच्या व्यक्तींना नवपंचम राजयोग अत्यंत शुभ फळ प्रदान करेल. तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. कुटुंबात सुरू असलेला वाद मिटतील. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. घरात सुख, शांती नांदेल. भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. तीर्थक्षेत्रांना भेट द्याल. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. मित्रांसह चांगला वेळ घालवाल. आरोग्य चांगले राहिल.

कुंभ

कुंभ राशीसाठी नवपंचम राजयोग खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या मनातील अनेक इच्छा पूर्ण होतील. भौतिक सुख प्राप्त कराल. या काळात तुमची आर्थिक स्थिती उत्तम राहून, कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवन सुखमय असेल. नव्या वस्तू खरेदी कराल. वैवाहिक जीवन सुखमय राहिल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या मेहनतीचे कौतुक होईल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. नवीन नोकरी शोधणाऱ्यांना मनासारखी नोकरी मिळेल.

तूळ

तूळ राशीच्या व्यक्तींसाठी नवपंचम राजयोग खूप फायदेशीर असेल. आयुष्यातील अडचणी दूर होतील. या काळात तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. नव्या वस्तू खरेदी कराल. नोकरीत प्रमोशन मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल. तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. करिअरमध्ये चांगली प्रगती होईल. नवे लोक, नवे छंद यांच्याशी जोडले जाल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)