Shani Mangal and Shukra Yuti in Kumbh: ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या स्थितीवर बारीक नजर असते. ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करताच राशीचक्रावर परिणाम दिसून येतो. मार्च महिना ग्रह-नक्षत्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. मंगळदेवाने या महिन्यात कुंभ राशीत प्रवेश केला आहे. जिथे आधीपासूनच कुंभ राशीत शुक्र-शनि विराजमान आहेत. त्यामुळे कुंभ राशीत शुक्र-शनि आणि मंगळदेवाची युती होणार आहे. हा दुर्लभ संयोग १४८ वर्षांनी बनत आहे. हा योग काही राशींसाठी खूप शुभ असणार आहे. त्यांना आयुष्यात अपार यश, बक्कळ पैसा, मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ राशींना अपार धनलाभ होण्याची शक्यता

मेष राशी

शुक्र-शनि आणि मंगळदेवाची युती मेष राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकते. या काळात तुम्हाला करिअर आणि बिझनेसच्या क्षेत्रात मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना नोकरीत बढतीच्या नवीन संधी मिळू शकतात. तुम्ही पैसेही वाचवू शकाल. तुमच्या व्यवसायालाही गती मिळू शकते. तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला फायदा होऊ शकतो. या राशीच्या लोकांच्या जीवनात सुख-समृद्धी लाभण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : Falgun Purnima 2024: फाल्गुन पौर्णिमेला ‘या’ ४ राशींच्या दारी येईल लक्ष्मी? तुमची रास कोणत्या रूपात होणार श्रीमंत?)

कन्या राशी

शुक्र-शनि आणि मंगळदेवाची युती कन्या राशीच्या लोकांसाठी लाभदायी ठरु शकते. एखादे अडकलेले काम या कालावधीत झटपट पूर्ण होऊ शकते. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. न्यायलयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना लाभ मिळण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती होऊ शकते. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. काम आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.

धनु राशी

शुक्र-शनि आणि मंगळदेवाची युती धनु राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरु शकते. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा मजबूत होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तसेच व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. आयुष्यातील अनेक संकटं दूर होऊ शकतात. या राशीच्या लोकांना संपत्ती आणि समृद्धी मिळू शकते. अविवाहित लोकांना यावेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani mangal shukra yuti kumbh these zodiac sing can get huge money astrology marathi pdb