Shani Mangal Shadashtak Yog 2025: न्यायदेवता, कर्मदाता शनी हा नवग्रहांमधील सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो. त्याची चाल ही अत्यंत संथ गतीची असून एका राशीतून दुसन्यायदेवता, कर्मदाता शनी हा नवग्रहांमधील सर्वांत शक्तिशाली ग्रह मानला जातो. त्याची चाल ही अत्यंत संथ गतीची असून, एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना शनीला किमान अडीच ते कमाल साडेसात वर्षांचा कालावधी लागतो. त्यामुळेच एखाद्या राशीत शनी सध्या स्थित असेल तर त्याच राशीत त्याला पुन्हा प्रवेश करण्यासाठी ३० वर्षांचा कालावधी लागू शकतो. अशा या कर्मदाता शनीने ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार २९ मार्च २०२५ रोजी रात्री ११:०१ वाजता कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश केला आहे.

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचा सेनापती मंगळ कर्क राशीत स्थित आहे. ७ जून रोजी तो कर्क राशीतून निघून सिंह राशीत प्रवेश करील. मंगळ सिंह राशीत प्रवेश करताच, मीन राशीत शनि असल्याने एक शक्तिशाली षडाष्टक योग तयार होईल. मंगळ आणि शनीचा षडाष्टक योग काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकतो. मग पाहू कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

‘या’ तीन राशींचं नशीब उजळणार?

मीन

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने षडाष्टक योगामुळे मीन राशीच्या लोकांची आर्थिक समस्येपासून सुटका होऊ शकते. या राशीच्या लोकांना करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात. त्याचबरोबर तुमच्या बोलण्यातही सकारात्मकता दिसून येऊ शकते. इतरांना तुमच्याकडे आकर्षित करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. नोकरदार लोकांना वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला अनेक अद्भुत संधी मिळू शकतात. वैवाहिक जीवन आणि लव्ह लाईफच्या दृष्टीने हा काळ छान असू शकतो.

वृश्चिक

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने षडाष्टक योगामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला ठरू शकतो. काही चांगली बातमी मिळू शकते. प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक होऊ शकते. प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. वैवाहिक जीवनात आनंद राहू शकतो. आर्थिकदृष्ट्या या राशीचे लोक मजबूत स्थितीत असू शकतात. प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती सुधारू शकते. या राशीतील लोकांच्या पदोन्नतीची शक्यता प्रबळ असणार आहे.

मिथुन

ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने षडाष्टक योगामुळे मिथुन राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. या काळात तुमचे तुमच्या पार्टनरबरोबर चांगले व्यवहार असतील. तसेच, समाजात तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळू शकतो. उत्पन्नाचे अनेक नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होऊ शकतात. त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा झालेली दिसून येऊ शकते. या काळात अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांनाही नफा मिळू शकेल. स्वप्ने पूर्ण करण्याची संधी मिळू शकेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)