Shani Margi Mahapurush Rajyog: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, शनि देव यंदा १७ जानेवारीला आपल्या मूळ राशीत गोचर करून दुर्लभ योग साधणार आहेत. शनि मार्गी होऊन कुंभ राशीत महापुरुष योग निर्माण होत आहे, याचा केवळ कुंभ राशीवरच नव्हे तर अन्यही तीन राशींवर शुभ प्रभाव दिसून येणार आहे. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार शनि मार्गी झाल्याने तीन राशींच्या कुंडलीत सोन्याहुनही पिवळा असा शुभ काळ सुरु होण्याची शक्यता आहे, या मंडळींना मेहनतीचे फळ मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. करिअर व शिक्षणात प्रगतीमुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभणार असल्याचेही संकेत आहेत. शनिदेवाच्या कृपादृष्टीने समृद्ध होणाऱ्या या तीन राशी कोणत्या येऊ जाणून घेऊयात..
शनिदेव साकारणार महापुरुष राजयोग, ‘या’ तीन राशींचा शुभ काळ होऊ शकतो सुरु
मकर
शनिने गोचर करून साकारलेला महापुरुष राजयोग हा मकर राशींसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो, मकर व कुंभ या शनिच्या मूळ व प्रिय राशी आहेत. मकर राशीच्या प्रभाव कसंख्येत दुसऱ्याच स्थानी शनि गोचर करत आहेत यामुळे आपल्याला लाभाचे संकेत आहेत. सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे मकर राशीच्या मंडळींना अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. तुम्ही दिलेले उधारीचे पैसे सुद्धा परत मिळण्याची शक्यता आहे. करिअरच्याबाबतही शुभ काळ सुरु होऊ शकतो. तुम्हाला कामाच्या ठिकाणी मान सन्मान मिळून प्रगतीचे योग आहेत. जमीन व प्रॉपर्टीशी संबंधित खटले सुरु असल्यास त्यात तुमच्या बाजूने निर्णय लागण्याची प्रबळ संकेत आहेत.
मिथुन
मिथुन राशीसाठी महापुरुष राजयोग अनेक शुभ वार्ता घेऊन येऊ शकतो. व्यवसायाच्या व नोकरीच्या क्षेत्रात मिथुन राशीच्या मंडळींना लाभदायी योग आहेत. शनिदेव मिथुन राशीच्या कुंडलीत नवव्या स्थानी स्थिर होणार आहेत. हे विदेश स्थान म्हणून ओळखले जाते, याचा अर्था येत्या काळात आपल्याला प्रवासाचे योग आहेत. आपण हात घालाल त्या कामात यश मिळण्यासाठी हा काळ शुभ ठरू शकतो, पण यात तुमची मेहनत व बुद्धी सुद्धा तितकीच महत्त्वाची भूमिका साकारेल. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी वैवाहिक सुखाने समृद्ध काळ आता सुरु होण्याची शक्यता आहे.
वृषभ:
महापुरुष राजयोगासह शनि आपल्या राशीत दहाव्या स्थानी स्थिर होत आहे, हे नोकरी व कार्यक्षेत्राशी संबंधित स्थान आहे. व्यवसाय वृद्धीसाठी हे स्थान अत्यंत शुभ मानले जाते. तसेच शैक्षणिक प्रगतीचे योग आणखी शक्तिशाली होण्यासाठी हे स्थान लाभदायी ठरू शकते.
Tulsi Vivah 2022: यंदा तुळशीचं लग्न कधी? कार्तिकी एकादशीची तारीख, शुभ मुहूर्त, पूजा विधी जाणून घ्या
शिक्षण व व्यवसाय या दोन्ही क्षेत्रात प्रगतीमुळे आपल्याला धनलाभाचे अनेक स्रोत खुले होऊ शकतात.
(टीप- वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे, यातून अंधश्रद्धा पसरवण्याचा हेतू नाही)