शनि हा महत्त्वाचा ग्रह मानला जातो. पौराणिक कथा आणि धर्मग्रंथांमध्ये शनिला सूर्यपुत्र आणि कर्माचा दाता म्हटले गेले आहे. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्यायाची देवता मानले जाते, ते व्यक्तीच्या कर्मानुसार फळ देतात. तर दुसरीकडे ज्या लोकांवर शनिदेव प्रसन्न होतात, त्यांना आयुष्यात कोणतीही भीती राहू देत नाहीत. त्या व्यक्तीला प्रत्येक क्षेत्रात समृद्धी, कीर्ती, आनंद आणि यश मिळते, असे मानले जाते. शनीदेव १७ जून रोजी कुंभ राशीत वक्री झाले आहेत. शनीदेव ४ नोव्हेंबरपर्यंत याच स्थितीत राहणार आहेत. त्यानंतर ते पुन्हा मार्गी होणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंचांगानुसार, ४ नोव्हेंबर रोजी सकाळी १२.३१ वाजता शनिदेव मार्गी होणार आहेत. यानंतर ३० जून २०२४ पर्यंत शनिदेव कुंभ राशीत राहतील. शनि मार्गी झाल्यावर ‘शश राजयोग’ तयार होणार आहे. याचा परिणाम सर्व राशींवर होईल. पण तीन अशा राशी आहेत, ज्यांच्यासाठी हा काळ फार चांगला ठरु शकतो. त्यांच्या आयुष्यात सुखाचे दिवस येण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींना होणार फायदा

वृषभ

शनीच्या संक्रमणादरम्यान, वृषभ राशीच्या लोकांना करिअरमध्ये मजबूत प्रगती आणि सुवर्ण संधी मिळू शकतात, ज्यामुळे त्यांना उच्च पद आणि मोठा पगार मिळू शकतो. त्यांच्या आर्थिक लाभातही वाढ होऊ शकते, ज्यामुळे त्यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी येऊ शकते. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो आणि विवाहित लोकांसाठीही हा काळ चांगला ठरु शकतो.

(हे ही वाचा : फक्त एक दिवस थांबा, ‘या’ लोकांच्या झोळीत पडेल पैसा? श्रावणातील ‘संक्राती’ला सूर्यदेवाच्या कृपेने होऊ शकतो धनलाभ )

सिंह

सिंह राशीच्या लोकांना शनीच्या मार्गामुळे शुभ संकेत मिळू शकतात. या दरम्यान त्याच्या आयुष्यात अनेक मोठे सकारात्मक बदल होण्याची शक्यता आहे. शनीच्या मार्गाने तयार झालेला शश राजयोग तुमच्या जीवनात कौटुंबिक संबंधांमध्ये सुख, समृद्धी आणि बळ देऊ शकतो. पती-पत्नीच्या नात्यात बळ येऊ शकते. आर्थिक लाभ होऊ शकतो. न्यायिक प्रकरणांमध्येही लाभ होऊ शकतो.

कुंभ

शनीच्या संक्रमणादरम्यान कुंभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. या राशीतील लोकांचे उच्चपदस्थ लोकांशी संबंध निर्माण होऊ शकतात. त्यांना आर्थिक लाभ मिळू शकतो आणि कार्यक्षेत्रातही चांगल्या संधी मिळू शकतात. भागीदारीच्या कामातही यश मिळू शकते, ज्यामुळे त्यांच्या करिअरमध्ये सकारात्मक बदल होऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani margi 2023 shani margi is going to be in aquarius good days will come for these zodic signs bank balance to raise money pdb