Shani Dev Margi Effect: शनीदेव हे वैदिक ज्योतिषशास्रानुसार न्याय व कर्म देवता म्हणून ओळखले जातात. शनीची चाल बदलताच सर्व १२ राशींवर त्याचा शुभ- अशुभ प्रभाव होत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या कर्माचा हिशोब शनी महाराज ठेवत असतात व त्यानुसार चांगल्या कर्मास चांगले व वाईटास वाईट असे फळ प्रत्येक राशीच्या व्यक्तीस मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार शनिवार हा शनीचा वार मानला जातो त्यामुळेच शनीच्या पूजेसाठी सुद्धा शनिवारचे विशेष महत्त्व आहे.

१७ जानेवारी २०२३ ला शनीने गोचर करून तब्बल ३० वर्षांनी आपल्या स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश केला होता. २०२५ पर्यंत शनी कुंभेतच स्थित असणार आहेत. ग्रह बदल झाला नसला तरी मागील दीड वर्षात शनीने अनेकदा नक्षत्र परिवर्तन केले आहे. मार्गी- वक्री, उदय- अस्त होताना शनीचा प्रभाव अनेक राशींवर पडत आहेच. आता २९ जूनला शनीदेव वक्री झाले आहेत आणि पुढील चार महिन्यांनी शनी महाराज मार्गी होणार आहेत. शनी मार्गी होताच काही राशींवरील साडेसातीचा प्रभाव कमी होणार आहे. या राशी कोणत्या हे पाहूया.

Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Shani Dev Margi 2024
१५ नोव्हेंबरपासून शनी होणार मार्गी; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळेल प्रत्येक कामात यश
R Madhavan Dubai Home Video
आर माधवनचं दुबईतील घर पाहिलंत का? मराठमोळ्या पत्नीबरोबर दिवाळीची पूजा, सरिताच्या मराठी लूकने वेधलं लक्ष
Shani Sadesati is Going on Which Zodiac Signs When Will Sadesati End Saturday Daily Horoscope in Marathi
शनिची साडेसाती कोणत्या राशीत सुरु आहे? नेमके किती दिवस टिकून राहणार प्रभाव, जाणून घ्या
Sharad Pawar Workers Angry over Anushakti nagar
Anushakti Nagar : “आमच्यापैकी कोणाची बायको हिरॉइन नाही म्हणून आम्हाला टाळलं असावं”, शरद पवारांचे कार्यकर्ते आक्रमक; मुंबईत बंडखोरी होणार?
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
Lakshmi Puja Worship Guide in Marathi| Steps for Lakshmi Puja at home
Lakshmi Puja 2024 : लक्ष्मीची पूजा कशी मांडावी? घरी व कामाच्या ठिकाणी लक्ष्मीपूजन कसे करावे? जाणून घ्या सविस्तर

वक्री झालेले शनी महाराज कधी होणार मार्गी?

शनी महाराज २९ जूनला वक्री झाले होते व आता ते वक्र चाल करत कुंभ राशीत भ्रमण करत आहेत. शनी चार महिन्यांनी म्हणजेच १५ नोव्हेंबरला पुन्हा मार्गी होणार आहेत. २९ मार्च २०२५ पर्यंत शनी कुंभेतच स्थित असणार आहे. त्यामुळे शनी मार्गी झाल्यावर सुद्धा त्यांचे मूळ वास्तव्याचे स्थान हे कुंभच असणार आहे. १५ नोव्हेंबरला संध्याकाळी ८ वाजून ७ मिनिटांनी शनी मार्गी होणार आहेत. या कालावधीत काही राशींना महत्त्वपूर्ण फायदे होणार आहेत. ज्योतिषशास्त्रानुसार, या राशींवरील साडेसातीचा प्रभाव आता सौम्य होणार आहे.

‘या’ राशींवरील साडेसातीचा प्रभाव होणार कमी

ज्योतिषशास्रानुसार, शनी जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो, तेव्हा त्याला साधारणत: अडीच वर्षाचा कालावधी लागतो. जेव्हा शनि तुमच्या चंद्र राशीपासून १२ व्या घरात प्रवेश करतो तेव्हा तुमची साडेसाती सुरू होते आणि जेव्हा शनी तुमच्या चंद्र राशीपासून दुसरे घर सोडून तिसऱ्या घरात प्रवेश करतो तेव्हा तुमची साडेसाती संपते.

हे ही वाचा<< श्रीकृष्ण जन्माष्टमी २०२४ पासून ‘या’ तीन राशी दुःखातुन होतील मोकळ्या; लक्ष्मी ‘या’ रूपात देऊ शकते दही साखरेचा प्रसाद

सध्या मकर राशीवर शनीच्या साडेसातीचा सर्वाधिक प्रभाव आहे. मीन राशीचा सुद्धा शनीच्या साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे, तर कुंभ राशीत साडेसातीचा दुसरा टप्पा सुरु आहे. शनी नोव्हेंबरमध्ये मार्गी झाल्यापासूनच मकर राशीच्या मंडळींवरील शनीच्या साडेसातीचा प्रभाव कमी होऊ लागेल व शनीने मीन राशीत प्रवेश करताच मकर राशीची साडेसाती संपुष्टात येईल. यानंतर मेष राशीत साडेसातीचा प्रभाव सुरु होईल.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Story img Loader