Shani Margi 2024 : ज्योतिषशास्त्रानुसार शनि देवाला न्यायधीश व कर्माफळ दाता मानले जाते. कर्मानुसार तो सर्व राशींना फळ देतो. सध्या शनि देव त्याच्या कुंभ राशीमध्ये विराजमान आहे आणि सरळ चालीमध्ये गोचर करणार आहे. शनिची शुभ स्थिती काही राशीच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरेन. १५ नोव्हेंबरला शनिने कुंभ राशीमध्ये मार्गी गोचर केले आहे. पंचागनुसार शनि १२ जुलै २०२५ पर्यंत मार्गी चालीमध्ये गोचर करणार आहे. जाणून घेऊ या, शनि ग्रह कुंभ राशीमध्ये मार्गी चालीमध्ये गोचर केल्यामुळे कोणत्या राशींना फायदा होऊ शकतो. (Shani Margi 2024 in kubh rashi three lucky zodiac will get money and wealth)
मिथुन राशी
मिथुन राशीच्या लोकांसाठी शनिच्या कुंभ राशीमध्ये मार्गी चाल अत्यंत शुभ लाभदायक ठरणार आहे. शनि देवाचा शुभ प्रभावामुळे करिअरमध्ये यश मिळेन. लव लाईफ अत्यंत रोमँटिक होईल. या लोकांचे त्यांच्या जोडीदाराबरोबर संबंध दृढ होतील. मनाप्रमाणे गोष्टी घडतील. त्यामुळे अनेकदा यांना आर्थिक फायदा होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती उत्तम राहीन. या लोकांसाठी हा काळ अतिशय उत्तम राहीन. त्यांना जवळच्या लोकांचे चांगले सहकार्य लाभेल.
तुळ राशी
शनिच्या कुंभ राशीमध्ये सरळ चाल तुळ राशीच्या लोकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. शनि या लोकांना नवनवीन गोष्टी करण्याच्या संधी प्रदान करतील. या लोकांना पैसे कमावण्याचे नवीन स्त्रोत मिळेन. या लोकांना अपार धन अन् पैसा मिळेन. कुटुंबाचे पूर्ण सहकार्य मिळेन. करिअरमध्ये आपल्या कलेच्या जोरावर हे लोक यश संपादन करतील. जोडीदाराबरोबर यांचे संबंध आणखी दृढ होतील. प्रेम संबंधामध्ये गोडवा वाढेन. या लोकांच्या कौटुंबिक जीवनात समृद्धी नांदेल.
कन्या राशि
कन्या राशीच्या लोकांसाठी शनिचे कुंभ राशीमध्ये मार्गी स्थितीमध्ये गोचर होणे फायदेशीर ठरू शकते. या दरम्यान या लोकांमध्ये भरपूर आत्मविश्वास दिसून येईल. प्रत्येक कामात हे लोक यशस्वी होतील. नशीबाची साथ मिळू शकते. भरपूर सकारात्मक वाटेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम आहे. त्यांना परिक्षेत चांगले यश मिळेल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)