Shani Margi 2024 : कलियुगाचा न्यायाधीश मानला जाणारा शनी लोकांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनी हा एकमेव असा ग्रह आहे, ज्याचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे प्रभाव पडत असतो. नऊ ग्रहांपैकी शनी हा सर्वांत संथ गतीचा ग्रह मानला जातो. तो एका राशीत सुमारे अडीच वर्षे राहतो. अशा स्थितीत एक राशिचक्र पूर्ण होण्यासाठी त्याला सुमारे ३० वर्षे लागतात. त्यामुळे प्रत्येक राशीच्या लोकांच्या आयुष्यात शनीचा प्रभाव दीर्घकाळ राहतो. शनिदेव राशिबदल करण्याव्यतिरिक्त वेळोवेळी अस्त, उदय, वक्री व मार्गी होत असतो. त्यात १५ नोव्हेंबरला शनिदेव मार्गी होत आहे. त्यामुळे काही राशींचे भाग्य उजळू शकते. चला जाणून घेऊ शनी मार्गी होण्यामुळे कोणत्या राशींचे भाग्य उजळू शकते…

न्यायाची देवता शनी १५ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजून ०९ मिनिटांनी कुंभ राशीत मार्गी होणार आहे. अशा स्थितीत काही राशींच्या लोकांना विशेष लाभ मिळू शकतो.

mangal planet transit in cancer
‘या’ तीन राशीच्या लोकांना होणार आकस्मिक धनलाभ; पुढील १४२ दिवस मंगळाची असणार कृपा
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार कोणाची मनोकामना आज पूर्ण होणार; वाचा तुमचे राशिभविष्य
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
Shani Gochar 2025
शनीदेव देणार बक्कळ पैसा; २०२५ मध्ये ‘या’ तीन राशी कमावणार पैसा, प्रेम आणि प्रतिष्ठा
surya gochar 2024 sun transit in vrishchik rashi these zodiac sign will be shine
ग्रहांचा राजा सूर्य करणार वृश्चिक राशीत प्रवेश! कोणत्या राशींचे नशीब उजळणार? करिअर, बिझनेसमध्ये मिळणार पैसा अन् यश
Vinayak Chaturthi special 5th November Rashi Bhavishya
५ नोव्हेंबर पंचांग: विनायक चतुर्थीला ‘या’ राशींना होणार फायदा, भाग्याची साथ ते धनलाभाचे योग; वाचा तुमच्या नशिबात कसं येईल सुख?
Dev deepawali 2024
देव दिवाळीपासून शनी-गुरूचा जबरदस्त प्रभाव; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

मिथुन

शनीचे मार्गी होणे मिथुन राशीसाठी फलदायी ठरू शकते. या राशीमध्ये शनी थेट नवव्या घरात म्हणजेच भाग्यस्थानात मार्गी होणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांच्या जीवनात संमिश्र परिणाम दिसून येतील. थोड्या गडबडीने काही चांगल्या गोष्टीही घडू शकतात. म्हणून आपण सर्व काही नियोजन केल्यास त्याप्रमाणे चांगले घडून येईल. नोकरीबद्दल बोलायचे झाल्यास, जर तुम्ही बदल करण्याचा विचार करीत असाल, तर तुम्हाला अनेक संधी मिळू शकतात. यासह तुम्हाला पदोन्नती आणि पगारवाढीसह काही मोठी जबाबदारी मिळू शकते. व्यवसायाच्या क्षेत्रातही तुमची रणनीती उपयोगी पडू शकते. अशा स्थितीत तुम्हाला बरेच फायदे मिळू शकतात. आर्थिक स्थिती चांगली राहील. या काळात तुम्हाला भरपूर पैसा मिळू शकतो.

कन्या

कन्या राशीच्या लोकांना शनीचे मार्गी होणे फायदेशीर ठरू शकते. या काळात कन्या राशीच्या लोकांनाही प्रत्येक क्षेत्रात आणि कार्यात यश मिळू शकते. पण, आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज लागू शकते. करिअरबद्दल बोलायचे झाले, तर तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. याचबरोबर नोकरीच्या अनेक नवीन संधी मिळू शकतात. शनीचे मार्गी होणे व्यावसायिकांसाठीही अनुकूल ठरू शकते. व्यवसायातील तुमचे प्रयत्न आता यशस्वी होऊ शकतात. त्यासह आर्थिक स्थिती चांगली राहील. तसेच तुम्ही मोठ्या प्रमाणात बचत करण्यात यशस्वी होऊ शकता.

तूळ

शनी मार्गी होताच तूळ राशीच्या लोकांचेही भाग्य उजळू शकते. तुमची अनेक अपूर्ण कामे आता पूर्ण होऊ शकतात. त्यासह एकाग्रता आणि बौद्धिक क्षमता वाढू शकते; ज्यामुळे तुम्ही अनेक कामांमध्ये यश मिळवू शकता. करिअरमध्ये सुरू असलेल्या समस्या आता संपू शकतात. त्यासह काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायातही भरपूर फायदा होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीच्या माध्यमातून तुम्ही चांगली कमाई करू शकता. लव्ह लाईफमध्ये चांगले क्षण येऊ शकतात.

Story img Loader