Shani Dev Margi 2024: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीत एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या ग्रहांमध्ये शनिदेवाला महत्त्वाचा ग्रह मानला जातो. सर्व ग्रहांमध्ये सर्वात संथ गतीने जाणारा हा ग्रह, एका राशीत दीड वर्षे राहतो आणि नंतर राशी बदलतो. ज्योतिषशास्त्रात शनि हा न्याय ग्रहदेखील मानला जातो. शुभ फळ देणारे शनिदेव जूनमध्ये कुंभ राशीत वक्री झाले होते. वक्री म्हणजे उलटी चाल. शनिदेव १३५ दिवस वक्री स्थितीत, म्हणजेच उलट स्थितीत राहिले. आता ते ऑक्टोबर म्हणजेच दिवाळीनंतर मार्गी होणार आहेत. याचा सर्व राशींवर परिणाम होईल, परंतु अशा तीन राशी आहेत, ज्यांच्यासाठी शनिदेवाच्या स्थिती बदलाचा लाभ मिळू शकतो. या लोकांना करिअर आणि बिझनेसमध्ये विशेष प्रगती साधता येऊ शकते. चला जाणून घेऊया या तीन भाग्यशाली राशींविषयी…
कुंभ
शनिचे प्रत्यक्ष संक्रमण कुंभ राशींच्या लोकांना फलदायी ठरू शकते. या काळात तुमचा आत्मविश्वास वाढलेला दिसेल. तसेच, यावेळी तुम्हाला सन्मान आणि प्रतिष्ठा वाढू शकते. व्यवसायात उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. तुमच्या पगारात वाढ होण्यासह नोकरीत बढतीची शक्यता आहे. तसेच विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहू शकते. या काळात तुम्हाला नातेसंबंधात फायदा होईल. तसेच जे अविवाहित आहेत, त्यांना त्यांचा जीवनसाथी मिळू शकतो.
More Stories On Astrology : १० वर्षांनंतर शनी गोचर अन् सूर्यग्रहण एकाच दिवशी; २०२७ पर्यंत येतील ‘या’ तीन राशीधारकांना सुखाचे दिवस? होऊ शकतो धनलाभ
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शनिदेवाची प्रत्यक्ष हालचाल शुभ ठरू शकते. या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळेल. तसेच तुम्ही वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, यामुळे तुमचे उत्पन्नदेखील वाढेल. नोकरदार लोकांना पदोन्नती मिळू शकते. तसेच जर तुम्ही रिअल इस्टेट, मालमत्ता आणि रिअल इस्टेटशी संबंधित व्यवसाय करत असाल तर तुम्हाला यावेळी चांगला नफा मिळू शकतो. या काळात तुमचे तुमच्या आईबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल.
मिथुन
शनिदेवाची प्रत्यक्ष हालचाल मिथुन राशीसाठी फायदेशीर ठरू शकते. मेहनतीबरोबर नशीबही तुमच्या पाठीशी असेल. तसेच तुमची प्रलंबित कामे पूर्ण होतील. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील आणि पैसे कमावण्याच्या अनेक संधी उपलब्ध होतील. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना यश मिळू शकते. तसेच या काळात तुम्ही देश-विदेशातही प्रवास करू शकता. तसेच तुमच्या कुटुंबात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रम होऊ शकतात. व्यावसायिकांना यावेळी चांगला फायदा होऊ शकतो.